Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)

म
मदनबाण
Sun, 08/21/2022 - 17:31
🗣 175 प्रतिसाद
आधीच्या धाग्याचे २००+ प्रतिसाद झाल्याने हा धागा उघडला आहे. कॉपीवुड ची लोकांनी व्यवस्थित ठासणे सुरु केले आहे, चड्डी सिंग सुपर डुपर फ्लॉप झाल्याचा मला विशेष आनंद झाला आहे. :) जे जे माज करतात त्यांची ठासणे हे सध्या पाहण्यात येत आहे.एक महाफ्लॉप व्यक्तीने [ त्याला अभिनेता म्हणणे इतपत देखील त्याची पत नाही ] लोकांना चक्क धमकावायचा प्रयत्न केला. याच बरोबर दोबारा ला पहिल्या बारीतच घरी पाठवले. या पुढे बॉयकॉट कसे होईल ? तसे करण्यास यश मिळेल का ? याची उत्तरे येत्या काळातच मिळेलच. जाता जाता :- मैने कहा था न, एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे. :- इति चतुर रामलिंगम :)))

मदनबाण.....


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34115 views

🗣 चर्चा (175)
क
कंजूस Sun, 08/21/2022 - 18:03 नवीन
पण हिंदी सिनेमाचे हिरो कुणाला करायचं हे दुबईतले प्रड्युसर ठरवतात असं ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 08/21/2022 - 18:22 नवीन
आपण सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद शोधतो नाही काय ? असो. बॉलीवूड चे चित्रपट फ्लॉप ठरत आहेत याचे कारण हिंदू / मुस्लीम, बॉयकॉट यापेक्षा पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) एकच उत्तर- ‘न फिरविल्यानें’ हे आहे असे मला व्यक्तीशः वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/21/2022 - 19:03 नवीन
आपण सर्वसामान्य लोक छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद शोधतो नाही काय ? सामान्य माणसातच असामान्य गोष्टी घडवुन आणण्याची शक्ती असते. :) दु:ख शोधण्या पेक्षा आनंद शोधणे उत्तम ! :) पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) एकच उत्तर- ‘न फिरविल्यानें’ हे आहे असे मला व्यक्तीशः वाटते. कावळ्याचा शाप आणि गाय मेली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnan
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/21/2022 - 18:47 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnan
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/22/2022 - 08:34 नवीन
हिंदी सिनेमाचे इस्लामिकरण याचे मला नेहमी नवल वाटते. हीरो हीरोईन व्हिलन यातील कोणीच मुस्लीम नाही. तरीही गाण्यात सगळे जण इन्शाअल्ला असे ओरडतात ( चित्रपट वेलकम) हीरो हीरोईन व्हिलन यातील कोणीच मुस्लीम नाही. तरीही गाण्यात हीरॉईन मुझे प्यार हुवा अल्लामिया असे म्हणते ( चित्रपट जुदाई) हे अर्थात आजचे नाहिय्ये. अगदी दीवार चित्रपटात देखील आहे. देवाला प्रसंगी जाब विचारणारा ,पूर्णपणे नास्तिक असणारा नायक ७८६चा बिल्ला खिशात जपत असतो. एखाद्या सिनेमाततरी बिगरहिंदू हीरो हीरोईन ने गणपतीला , शंकराला साकडे घातल्याचे कधीच दिसत नाही. हल्ली तर कपाळाला कुंकू / टिकली लावलेली हीरॉईन दिसतच नाही. हिजाब , जाळीदार टोप्या, पठाणी ड्रेस असलेले लोक सिनेमात बरेच वेळा दिसतात.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Mon, 08/22/2022 - 09:11 नवीन
एक गाणे आठवले. शिर्डीवाले साईबाबा. चित्रपट अमर अकबर ॲंथनी.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/23/2022 - 01:00 नवीन
या असल्या भगव्या आतंकवाद्यांच्याया प्रपोगंडाला ला भुलून जाऊ नका भाऊ छ्या छ्या .. असल काही नाही हो आम्ही हिंदू फार म्हणजे फार प्रेमळ आहोत ... आम्हाला जगाला दाखवून द्यायचं कि आम्ही किती "आ बैल मुझे मार" या तत्वावर जगतो .... आमच्य्या किनई राष्ट्रपित्यानी आम्हाला लहानपणी पाजलंय ( न्नानामृत ) कि एकदा डाव्या गालावर थप्पड खाल्ली कि उजवा पुढे करावा ! आणि इंग्रजीत म्हणतात तसे रिपीट अँड रिंनझ वॉशिंग मशिन सारखे चालू .. खा थपडा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/22/2022 - 08:41 नवीन
आज टीव्हीवर बातमी ऐकली " समोरून जर तयारी दाखवली तर आम्ही टाळीद्यायला तयार आहोत " हे शर्मिला ठाकरेंनी एका मुलाख्कतीत सांगितले. मनसे या क्षणी तरी उद्धव सेनेसोबत युती करेल असे वाटत नाहिय्ये. उद्धव सेना या वेळेस सेनेच्या इतिहासात सर्वात अप्रिय बनलेली आहे. अशा वेळेस पवार आणि सोनीयांच्या सोबत असलेल्या उद्धव सेनेशी युती करणे ही मनसे साठी सर्वात मोठी चूक होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/22/2022 - 10:00 नवीन
शून्य कोणत्याही संख्येत मिळविले किंवा कोणत्याही संख्येतून वजा केले तरी मूळ संख्येत बदल होत नाही. मनसे शून्य आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/22/2022 - 14:50 नवीन
पण एखाद्या संख्येला शून्याने गुणले तर ते त्या सम्ख्येला शून्याला मिळवते. मनसे मते खाणारी पार्टी होऊ शकते. शरदपवारांनी हा खेळ खेळला होता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 08/22/2022 - 15:04 नवीन
१ पेक्षा कमी मूल्य असलेल्या संख्येने कोणत्याही दुसऱ्या संख्येला गुणले तर दुसऱ्या संख्येचे मूल्य कमी होते. भाजपने हा वाईट अनुभव महाराष्ट्रात अनेकदा घेतलाय. तरीही अक्कल येत नाही.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 08/22/2022 - 09:25 नवीन
एका शेतकर्‍याच्या हातावर सतरा पिशव्या फ्लॉवरसाठी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका व्यापार्‍याने साडेनऊ रूपये टेकवले आहेत अशी बातमी आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/farmer-in-pune-spending-1300-rupees-for-cauliflower-vegetable-crop-vashi-apmc-market-trader-gives-only-9-rupees/articleshow/93699600.cms?utm_source=liveblog&utm_medium=mweb&utm_campaign=hyperlink पूर्वी असल्या बातम्या आल्या की वाईट वाटायचे. पण आता काहीही वाटत नाही. एपीएमसी मधील दलालांचे वर्चस्व मोडून काढायला कृषी कायदे आणले होते त्याला त्या दलालांनी विरोध केला तेव्हा सगळे विरोधक 'मोदी अडचणीत सापडले आहेत' म्हणून टाळ्या पिटत होते. शेतकर्‍यांनीही कुठेही आम्हाला कृषी कायदे हवे आहेत अशी मागणी केल्याचे फारसे कुठे वाचले नाही. समजा अगदी कृषी कायद्यांचा उपयोग झाला नसता तरी साडेनऊ रूपयांपेक्षा आणखी किती रक्कम मिळणार होती? मिळाली असती तर ती किमान तेवढी किंवा जास्तच असती ना? मग कृषी कायदे राहिले असते तर काय बिघडणार होते? अशा लोकांसाठी अश्रू ढाळायची अजिबात गरज नाही.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 08/22/2022 - 10:11 नवीन
कृषी कायद्यात कृषी उत्पादनाला हमीभावाचे संरक्षण नव्हतेच, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच नसते किंवा कमी झाले असते अशी खात्री देऊ शकत नाही. खूप पळवाटा आहेत शेतकऱ्यांना लुटायला, खासकरून नाशवंत मालाच्या बाबतीत. शेतकऱ्यांना फक्त दलालच फसवतात असे नाही, सरकारही फसवते. जे सरकार कांद्याला जीवनावश्यक वस्तूमधून वगळते आणि महिन्याभरात कांद्याचे भाव वाढल्यावर कांदा निर्यातबंदी आणि कांद्याचे भाव पडायला मदत करते अशा सरकारने आणलेले कृषी कायदे काय शेतकऱ्यांचे भले करणार? राज्य सरकारही अपवाद नाही.महाराष्ट्राच्या नवीन सरकारने पावसाची आकडेवारी शेतकऱ्यांसाठी बंद केली आहे. हे सगळे विमा कंपन्यांसाठी केले आहे. अशी हिम्मत महाराष्ट्र सरकार कसे करू शकले? दिल्ली वाऱ्या फुकट नाही केल्या.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 08/22/2022 - 14:44 नवीन
कांद्याच्या बाबतीत सहमत. केंद्र सरकारनें लय धरसोड वृत्ती दाखवली आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांचा विरोधामुळे नाहीतर पंजाब निवडणुकीमुळे रद्द केले असतील. पावसाच्या आकडेवारीच माहिती नव्हतं. गेल्या वर्षी आम्हालातरी भरपूर विमा मिळाला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला असताना पेट्रोलवर्ती काहीतरी टॅक्स लावला होता दुष्काळ संपूण २-३ महिने झालेतरी फडणवीसांनी काढला नव्हता. पावसाची आकडेवारी ची बतमी खरी असेल तर विमा कंपन्या फायदा उचलणार
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 08/22/2022 - 16:16 नवीन
पावसाची बातमी https://www.mymahanagar.com/maharashtra/ajit-pawar-suspects-state-government-has-taken-a-decision-for-the-benefit-of-insurance-companies/474366/
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 08/22/2022 - 14:36 नवीन
भारताने नागरिकत्व न दिल्यामुळे १५०० पाकिस्तानी हिंदू नागरिकांनी परत पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकत्व द्यायचंच नव्हते तर एवढा विरोध करून कायदा कशाला केला काय माहिती.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 08/22/2022 - 15:25 नवीन
त्यांच्यातील काही पूर्ण धर्माचे नाव मातीत घालतात पाकिस्तानी हिंदू आहे हा, २०१६ साली ह्याला नागरिकत्व दिलं आहे आणि ह्या बहाद्दर बुवाने असे पांग फेडले आहेत. आयतं कोलीत विरोधकांच्या हाती.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 08/22/2022 - 15:44 नवीन
भारतीय नागरिकत्व देण्यासाठी काही निकष असतील, काही तपासण्या करत असतील ना ...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 08/22/2022 - 15:49 नवीन
खानावळीला आणि एकूणच बॉलीवूडला चांगलाच झटका मिळालेला आहे. हिंदू धृवीकरण होत आहे हे नक्कीच सुचीन्ह आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 08/22/2022 - 16:05 नवीन
हिंदू धृवीकरण होत आहे हे नक्कीच सुचीन्ह आहे धर्माचे ध्रुवीकरण झाले की पुढे जातींचे ध्रुवीकरण सुरू होते, ते थांबवणे अशक्य होऊन जाते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 08/23/2022 - 01:40 नवीन
"जातींचे ध्रुवीकरण सुरू होते," या भीती पोटी हिंदू म्हणून एकत्र यायचं नाही का? अगदी धार्मिक म्हणून नको, पण एक "सामाजिक समूह" म्हणून तरी एकत्र आले आणि त्यायोगे "दुसऱ्यांनी गृहीत धरून सतत टपली मारणे" या प्रवृत्तीला आळा बसला तर काय हरकत आहे ? अनेक हिंदूंना तुम्ही विचार त्यांना टोकाची धार्मिकता नकोच आहे एवढेच काय भारत हा हिंदुराष्ट्र सुद्धा व्हावा असे सुद्धा वाटतं नाहीये .. पण हिंदूंना योग्य तो मान देणारे राष्ट्र हवे आहे .... खरा सर्वधर्मसमभाव हवा आहे . , सामान कायदा हवा आहे , कांग्रेस ने हे केले असते तरी चालले असते ... त्यासाठी संघ आणि भाजप सत्तेत यायची वाट पाहण्याची जरुरीचं नवहती मी एक हिंदू म्हणून " आधी देश मग धर्म" हे कधीही मान्य कार्याला तयार आहे बघा लक्षात येत का काय म्हणतोय ते (हिंदूंचा असा बुद्धिभेद आधीच करायचा हे हि एक टूल किट मधील टूल दिसतंय त्यामुळे या म्हण्यायचा कितपत परिणाम होणार आहे हे कोण जाणे )
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/23/2022 - 16:00 नवीन
तुम्हाला हिंदू धर्म, बिगर हिंदू धर्म, हिंदुत्ववादी राजकारण, तुष्टीकरण इत्यादी इत्यादी कशाचा सर्वाधिक राग येतो त्याची एक जंत्री करून त्याला एकदमच टूलकिट मधील विविध टूल्स, एक संकीर्ण सूची ह्या नावाने ती प्रसिद्ध करता येतील का सर ?? सेम विरोधक पण बोंबलत असतात, काहीही केलं तरी त्याला टूलकिट म्हणणे ही भाजपने त्यांच्या समर्थकांना शिकवलेली टूलकिट आहे म्हणतात, नेमकं काय ह्यावर आम्हा सामान्यजन लोकांची फारच गैरसोय होते समजायला राव.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/25/2022 - 08:47 नवीन
काहीही केलं तरी त्याला टूलकिट म्हणणे प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत आहे टूलकिट.. ठराविक हास्यस्पद/ मगरीचे अश्रू अश्या पद्धतीचं गोष्टींना म्हणले जाते सूची करू कि त्यात काय अवघड आहे कुठून सुरु करू मिया खलिफा ( मी भाजी खाते म्हणून मी शेतकरी आंदोलनाशी जोडलेली) मल्लाला युसूफ - ३०३ आले हे नाकारत येत नाही मग घाला काड्या - मोदींपेक्षा वाजपेयी कसे चांगले - पगडी नको पागोटे ( महाराष्ट्र्र स्पेशल ) - - हिंदू धर्मातील अंधश्रद्धा फक्त दिसणे , (वेचक ( सिलेक्टिव्ह ) इतर धर्मातील वाईट गोष्टीं बद्दल मौन वांड साहेब करा तुम्ही चेष्टा माझ्य मुद्याची पण मूळ मुद्दा बघा... आणि त्याचे उत्तर द्या कि धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ? का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहे भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतात
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/25/2022 - 08:56 नवीन
एक मिनिट, मी तुमची चेष्टा वगैरे अजिबातच करत नाहीये किंवा
धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ? का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहे
असेही मी अजिबातच म्हणत नाहीये, किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते, फक्त सतत अन्याय झाला हो म्हणत बसलो तर एकत्र यायला काँक्रिट बेस काय तयार होतोय ते मला कळत नाहीये, एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा की, म्हणजे आंतरजातीय विवाह, जाती अंत इत्यादी काही तरी, हे झालं एक, दुसरं म्हणजे
भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतात
जनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ? मी जनता नाही का मी अमान्य आहे जनता म्हणून आपणांस ? उगाच काहीही काय राव बोलता!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/25/2022 - 12:00 नवीन
एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा हे एकत्र येणं जे मी म्हणत आहे ते काही हिंदुत्व कसा श्रेष्ठ आहे/ धर्माचा प्रसार या साठी नाहीये हे आधी स्पष्ट करतो स्पेसिफिक पॉइंट्स १) समूह म्हणून आपणास कोणी उगीच ढकलत नाहीये ना आणि असले तर एकत्र आल्याने तसे होण्यावर आळा बसेल म्हणून २) हलाल खद्य सारखया गोष्टींची ची सक्ती अप्रत्यक्ष पणॅ होते अश्या गोष्टींना आळा घालने ( अर्थात " हलालचं प्रसारामागे काही हेतू नाहीये" असे कोणाचे म्हणणे असले तर प्रश मिटला ) उदाहरण म्हणून मी आणि माझे मीत्र येथील भारतीय दुकानात जाऊन मुद्डमून विचारतो कि आम्हाला हलाल नसलेल्या गोष्टी पाहिजेत .. हा प्रसार करताना आम्ही कोणाला सांगायला जात नाही कि तुम्ही घेऊ नका , आम्ही फक्त ग्राहक म्हणून आमचे मत मांडतो ३) एक धर्म म्हणून या या प्रसारामध्ये हे गृहीत आहे कि " जातीतील भांडणे टाळा आणि जातिभावं कमी करा" ( मला वाटते यात आपले एकमत असावे ) मी स्वतः संघात कधी गेलो नाही पण मीत्रान्चातून ऐकले आहे कि तिथेही फक्त धर्म / राष्ट्र आणि समाज याबद्दल बोलले जाते - ना भाषा ना जात ( असो संघ हा काय कसा हा विषय येथे नाही ) तुम्हाला फक्त तोच मुद्दा दिसतो असे मला वाटते ... मला त्याबरोबर अनेक इतर हि मुद्दे दिसतात (चला हे मान्य हि करतो कि तुम्हाला हि दिसत असतील पण तुम्हीं लिहितांना फक्त "मग जातीचे ध्रुवीकरण होयील " असे लिहिलेत म्हणून हे सगळे पुढे ४) हिंदू धर्माबद्दल ( विशेषसा करून पाश्चिमात्य देशात) जो चुकीचा प्रसार केला जातो त्याला थांबवणे आपले मुल्य वाढवणे किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते, पटते ना मग यात "जात" यावरच का बोललात म्हणून मी प्रतिसाद दिला ... जेव्हा आपण हिंदू आणि इतर धर्म या बाबत बोलतो तेवहा हिंदू धर्मातील जात विवाद हे सतत उकरून जर कोणी काढत असले तर कोण्ही विचारणारच कि "काय रे बाबा तुला तेवढेच दिसते का ???" जनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ? म्हणजे आज जो हिंदू उघड्पणे एकत्र येऊन म्हणतोय " कि आमच्या चांगुलपणाचा फायदा घेणं बस झाल" ते तुमचं सारखया "जनतेला " दिसत नाही का?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/25/2022 - 12:19 नवीन
तर जाती अंतावर का बोलू नये ?? तुम्हाला मी जातीवर बोललेले दिसते पण तुम्ही स्वतः अतिशय docile पॉइंट्स ते पण दरवेळी पाश्चिमात्य देशांतील परिस्थितीला अनुसरून मांडत बसता असेही म्हणायला स्कोप आहेच ना ? कसं आहे चौकस जी, लोकल ग्रोसरिज मध्ये जाऊन नॉन - हलाल प्रमाणित वस्तू मागणे हे तुमच्या इको सिस्टम मध्ये नक्कीच स्तुत्य असेल किंवा परिणामकारक असेल, इथे भारतात तो सीन नाही, हलाल हराम पेक्षा मोठे प्रश्न आहेत इथे, आणि मी टीपिकल भूक गरिबी वगैरे डावे प्रश्नच मोजत नाहीये तर शिस्तीत जातीचा उल्लेख करतोय, का करतोय ? हे पण explain करतो. एकत्र कोणाला आणायचं आहे ? हिंदूंना ? बरोबर ? मग जगातील सर्वाधिक नंबर्स मध्ये हिंदू कुठे राहतात ?? भारतात बरोबर ?? भारतात हिंदू एकतेला बाधा कोण आणतोय ? तथाकथित हलाल समर्थक का जात ?? माझ्यामते दोन्हीही तुल्यबळ आहेत हिंदूंच्या एकीला बाधा आणण्यात. तुमच्या ऑस्ट्रेलियन हिंदू perspective मध्ये जात महत्वाची फॅक्टर नाही म्हणून सर्वाधिक हिंदू असणाऱ्या भारतात आम्ही ती दुर्लक्षित का करावी ? इथं जरा काही झालं का जातीनिहाय गट, दबावगट, वगैरे कामाला लागतात, तेव्हा कोणाच्या डोक्यात हिंदुत्व नसते, मला वाटते पहिले ते ओक्के केले तर नंतर ते एकत्र येणे अन् हलाल हराम ला विरोध शक्य होईल सुलभपणे. फक्त तुमचं परसपेक्टिव मी अमान्य करतो म्हणून मला तुमच्यासारखे लोक वगैरे बोलण्याची आपणांस काही खास गरज नाही इतके बोलून रजा घेतो जाता जाता - जात अंत करण्याची सगळ्यात पहिली गरज सावरकरांनी बघितली होती, आता फक्त त्यांना कायम जात जात करत म्हणून दोष तितका देऊ नका. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/25/2022 - 15:59 नवीन
इथं जरा काही झालं का जातीनिहाय गट, दबावगट, वगैरे कामाला लागतात, भारतात हिंदू एकतेला बाधा कोण आणतोय ? तथाकथित हलाल समर्थक का जात ?? हलाल विरोधी भूमिकेचा भारतातील हिंदू एकत्रीकरनांशी कुठे तसा असंबंध जोडला मी फक्त एक लांबचा फायदा सांगितला मी ऑस्ट्रेलियातील संधर्भ दिला त्याचा अर्थ तो भारताला लागू होतो असे कुठे म्हणलय ? ... जात विवाद निश्चितच या एकीकरणामध्ये आड येतो हे खरे पण याचा अर्थ हिंदू एक होऊ द्या म्हणले कि लगेच त्याचे रूपांतर "जातीचे ध्रुवीकरण" हेच का बर सुचत ? एवढच मला विचारायच होत तुम्ही तो सन्धर्भ लावलात म्हणून मला तुम्ही "हिंदू एकतर व्हावा" या कल्पनेचं विरोधात आहात असे वाटले म्हणून जात अंत करण्याची सगळ्यात पहिली गरज सावरकरांनी बघितली होती हे तर मनातलं बोललात जाता जाता " तुम्ही स्वतः अतिशय docile पॉइंट्स ते पण दरवेळी पाश्चिमात्य देशांतील परिस्थितीला अनुसरून मांडत बसता " अ सयुक्तिक किंवा दर्पोक्ती असले तर दाखवा ! मी खूप काळजी पूर्वक उल्लेख करतो प्रत्येक ठिकाणी इथे असे आहे म्हणून भारतात असे वैगरे म्हणत नाही आणि मिपाकर जगभरातील आहेत जिथे संबंध आहे एकाद्या चर्चेत आंतरराष्ट्रीय गोष्टींचा तेव्हा उल्लेख केलं तर काय बिघडले ? रेल्वे च्या धाग्यवर रेल्वे संबंधित उयेथील माहिती दिली तर चुकलं का ? किंवा चुकून कधी पाकक्रियांत येथील उप लब्ध पदारथाचा उल्लेख केला ते चुकलं का ? अरे बापरे ,, माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणार
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/26/2022 - 03:21 नवीन
माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणार
माझ्या बोलण्याचा तिसराच अर्थ काढण्याचे आपले ठरले असेल तर माझा खरेच नाईलाज आहे पण स्पष्ट करतो की संदर्भ देण्याचा त्रास मुळीच नाही, फक्त तुमचा अन् माझा परस्पेक्टिव हा अतिशय वेगळ्या कोनातून एकच मुद्दा पाहणे आहे, असे असते बऱ्याचवेळा, एकमेकांचे दृष्टिकोन कमजून घेणे उत्तम नसल्यास जर आपले म्हणणेच "My way or the Highway" असेल तर मला नाही वाटत बोलायला काही उरेल. - (लेखन सीमा) वांड
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 08/23/2022 - 15:55 नवीन
पाकिस्तानात चुकून मिसाईल फायर करण्याच्या घटनेत ३ वायुसेना अधिकाऱ्यांवर ठपका ठेऊन त्यांची सेवा समाप्त करण्याचा (Termination) निर्णय घेतला आहे. सदर ०३ अधिकाऱ्यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे नीट पालन न केल्यामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे असे समजते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 08/26/2022 - 02:02 नवीन
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे नीट पालन न केल्यामुळे त्यांना बडतर्फ करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे हे बरोबर केले आहे. बाँब न बसवता मिसाईल फायर करणे अगदी चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/26/2022 - 03:23 नवीन
उद्या अहमदनगरच्या के के रेंजेस वर लोडेड मिसाईल वापरून "शत्रूला टार्गेट करा" म्हणाल तुम्ही सर. थंड घ्या जरा.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 08/23/2022 - 20:58 नवीन
नुपूर शर्मा प्रकरणासंबंधीचा धागा वाचनमात्र झाला !!
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/24/2022 - 03:30 नवीन
का हो ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 05:16 नवीन
व्हायलाच पाहिजे होता. नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी? इथे नुपूर शर्माचेही चुकलेच. समोरचा उचकवतोय म्हटल्यावर आणखी थंड डोक्याने उत्तरे द्यायला पाहिजे होती. तीचे पद तिला ती जबाबदारी घ्यायला लावत होती. किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले. _/\_
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 08/24/2022 - 14:13 नवीन
नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी?
अगदी बरोबर आहे. गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी
अगदी बरोबर आहे. मोदींनी, त्या टीव्ही शोमध्ये ज्या इसमाने श्री शंकराबद्धल अपमानजनक वक्तव्य केले त्याला इसमाला सोडून दिले, आणि त्या इसमाला प्रत्युत्तर देणाऱ्या नुपूर शर्मांना मात्र सर-तन-से-जुदा होण्याच्या मार्गावर पाठवले.
किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले.
तुम्ही राजदीप सरदेसाईंबद्धल बोलताय का? ते जर गुन्हेगार असतील तर गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आज ना उद्या जनता हे करणारच आहे.
बंदोबस्त जर जनताच करणार असेल तर मोदींचे काय काम आहे? मला वाटलं होतं की शासन चालवण्यासाठी जनतेने मोदींना निवडून दिलेलं आहे! --- स्पष्टीकरणे मोदी = केंद्र सरकारची यंत्रणा वगैरे मिपा = सामान्य नागरिक वगैरे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 16:45 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 16:46 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/24/2022 - 11:25 नवीन
अहो का म्हणून काय विचारताय.. त्या CSMT चौकात जशी पोलिसांची हाणामारी झाली तशीच तगड्या मिपाकरांची हाणामारी टळावी म्हणून चौक म्हणजे धागाच बंद केला असावा गृहमंत्र्यांनी बोले तो संपादकांनी. ..ना रहेगा बास ना लडेगी लाठी (बासूरी तर दूर राहिली आता !!) टीप : प्रतिसाद उगाच गांभीर्याने घेवून माझ्या डोक्यात कुणी लाठी हाणू नये विनंती !! नाहीतर मी आपला शिरस्त्रण घालून बसतो 🪖
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/24/2022 - 04:47 नवीन
घ्या हो महाराजा CSMT चौकात आराम वडापाव सिग्नलला ऑन ड्युटी आणि ऑफ ड्युटी पोलीसच एकमेकांत भिडले, फुल चौकातच लठ्ठा लठ्ठी झाली, नंतर पूर्ण वरात पोलीस स्टेशनला पोचली, FIR नाही का दंगा करणाऱ्या ५ पोलिसांची मेडिकल नाही फक्त दोन हवालदार कंट्रोल रूमला attach केले ट्रान्स्फर करून. कसं म्हणतात बरं ते, हां! ह्या राज्यात पोलीसच असे वागू लागले तिथे जनतेकडे कोण बघणार असे काहीसे, नाही का ? गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य काय म्हणतील इकडे लक्ष लागून आहे, कुठल्यातरी अविकसित राज्याच्या पोलिसांसारखे राजधानीच्या मुख्य चौकात पोलीस आपापसात मारामाऱ्या करून राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर टांगतायत तिथे सदनात पावसाळी अधिवेशन अनायासे सुरू आहेच त्यामुळे सदर प्रकरणावर गृहमंत्र्यांचे निवेदन अपेक्षित आहे असे वाटते मला तरी.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 05:07 नवीन
मविआच्या सरकारात असे कधी झालेच नाही. त्यामुळे असं कधी लिहिण्याची वेळच आली नव्हती. हे नवीन सरकार आले आणि काय काय सुरू झाले. अबा तुम्ही कुठे आहात? लवकर या. अशी संधी सोडू नका. तुमची जागा कोणीतरी बळकावील बर का.? :)) कृ.ह.घ्या.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 08/24/2022 - 06:18 नवीन
माविआ गेले हे एक बरे झाले बुवा. आता सगळ्यांचेच मेंदू अधिक कार्यक्षम होऊन काय बोलावं हे वेळोवेळी सुचेल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 07:50 नवीन
अरे बापरे वांडोबा. सॉरी बरका. माझे काम झालंय. :) पुन्हा एकदा क्षमस्व.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/24/2022 - 08:32 नवीन
फक्त अबांबद्दलच्या तुमच्या टिपणीबाबत असहमत. त्यांच्यामुळे मला बराच फायदा झालेला आहे. त्यांची मते खोडून काढण्याच्या नादात इतरांनी बरीच महत्वाची व अधिकृत माहिती टेबलावर आणली. जी मला सहजगत्या उपलब्ध झाली नसती. त्यांचे बाबत मी एकदा कृतज्ञताही व्यक्त केली होती. फक्त त्यासाठी मिपावरून काय घ्यायचे व काय इथेच ठेवायचे हे कळले की झाले. :)) असो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाल्या असल्यास परत एकदा मनापासून क्षमस्व. _/\_
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 08/24/2022 - 08:35 नवीन
तुम्ही मला ज्या सभासदांची जागा घेऊन तसे व्हायला (हलक्यात घ्या म्हणत) सांगता आहात ते व्हायला अंगभूत उद्धटपणा, बिना वाचनाचा अतिरेकी आत्मविश्वास लागतो, ते काही जमणार नाही, त्यामुळे हलक्यात पण यापुढे असले काही सुचवू नका
जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 08/24/2022 - 08:36 नवीन
जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...
करा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/24/2022 - 06:45 नवीन
यात गृहमंत्र्यांचे काय निवेदन अपेक्षित आहे? जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील. कोणेतेही सरकार आले तरी हीच स्थिती असेल. पाच पोलिसांनी मारामारी केली म्हणून म वि आ सरकारचा गृहमंत्री असता तरी काय केले असते? यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही. त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही. प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल. थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल. ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/24/2022 - 06:50 नवीन
नक्की ना ? तुमचं पण चालू द्या मग, प्रतिसाद संग्राह्य ठेवायला उत्तम आहेत आपले ! =))
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/24/2022 - 07:29 नवीन
जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील.
तुमचं त्यांचं काही तसं ठरलं आहे का आपापसात ? नसल्यास त्यांना तितकं तरी सांगू देत इतकी नम्र विनंती करतो. यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही. थोडा चष्मा बाजूला सारून अभ्यास वाढवा, कळेल. त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते अतिशय बाळबोध प्रतिवाद न करण्यालयाक वाक्य, गृहमंत्री तर हाय प्रोफाईल केसमध्ये पण कोणाला गुन्हा करा सांगत नाही, शीना बोरा मर्डर करायला गृहमंत्र्यांनी सांगितले नव्हते टाईप अतार्किक विधान करताय तुम्ही, पोलीस रक्षक असावेत ही अपेक्षा आहे, असे होणे अन् त्याचा प्रेस रिपोर्ट येणे ह्याने optics खराब होतात सरकार अन् प्रशासनाचे, लक्षात आले तर बघा पण हे मारामारी प्रकरण कुठंतरी एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द मध्ये घडलेली नाही तर मुंबईत एका मोठ्या ठिकाणी घडली आहे. दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही. पोलिस लायनीत आणि सी एस एम टी चौकात आपल्याला फरक कळत नसेल तर खरेच चष्मा काढण्याची किंवा नंबर तरी तपासण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल. हो का ? मग काय करायला हवं तितकं बोला, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यावर सरकार बदलेपर्यंत सकाळ ते संध्याकाळ आगपाखड होत होती. थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल. म्हणून झाल्या प्रकारावर एक नागरिक म्हणून अपेक्षा पण व्यक्त करू नयेत असं ? ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही जर तर मंडीत असल्यामुळे जरतारी वाक्य फाट्यावर हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत. मिपावर चर्चा होणाऱ्या विषयांत बहुसंख्य विषय अशी उघड गुपिते असतात, करतो का मग मेगा बायटी बंद तुम्ही आम्ही ? राजकीय चर्चा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता अलिप्त राहून करता येतात बुआ आम्हाला तरी, कारण शेवटी मवीआ येऊ का भाजप का ई. डी. सरकार लटकणार आम्ही लोकलमध्ये आहेच रोज, हे आमचं तरी क्लिअर आहे. बाकी चालू द्या हे पालुपद दरेक प्रतिसादात न लावले तरी चालेल अशी नम्र सूचना सर, एव्हाना, तुम्ही स्वतः सोडून पूर्ण जगाला अन् खासकरून थोडं विरोधी बोलणाऱ्या मिपाकर जनतेला तुच्छ समजता हे बऱ्यापैकी क्लिअर आहे, त्यामुळे लेखन कष्ट नाही घेतलेत तरी चालेल, तुमच्यालेखी आम्ही तुच्छ आहोत हे कळले आहे आम्हाला नीट. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 08/24/2022 - 07:50 नवीन
तो आय डी जी जी विशेषणं दुसऱ्यांसाठी वापरतात आणि ज्या प्रकारे इतरांची संभावना करतात ते सर्व त्यांनाच चपखल लागू पडते. त्यांची आवडती पालुपदं अशी: या बोटावरची थुंकी त्या बोटावर घेणे, आपण हसे दुसऱ्याला शेम्बुड आपल्या नाकाला वगैरे. यांचे पंतप्रधान महागाईला जबाबदार नसतात, चीनी आक्रमणाला जबाबदार नसतात, स्त्रियांवरील अत्याचाराला जबाबदार नसतात, धार्मिक विद्वेषाला जबाबदार नसतात, यांचे राज्यातील गृहमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार नसतात. आणि रामराज्य चालवण्याची जबाबदारी फक्त भूतपूर्व अथवा विद्यमान नावडत्या पक्षाच्या नेत्यांची असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/24/2022 - 15:41 नवीन
@सर टोबी घाव वर्मी लागलेला दिसतोय. संबध नसताना येथे दुसरीकडचं सगळं धुणं धुवायला काढलंय उगी उगी
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा