Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जाणिवांची बाराखडी

च — चक्कर_बंडा, Sat, 08/13/2022 - 11:49
कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????..... कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब..... कसा शमवता येईल शब्दांतून ??? भर दुपारी उन्हाने तापलेल्या एकाकी डांबरी रस्त्यावर चालताना छोट्या अनवाणी पायांची होणारी लाही-लाही आणि त्यात मध्येच पायाखाली आलेल्या चुकार टोकदार दगडाच्या दंशाने पापण्यांच्या कडांमध्ये दाटून आलेला वेदनांचा पूर.... कसा अडवता येईल शब्दांचे बांध घालून ?? भेगाळल्या भुईच्या छाताडावर नांगराच्या रेघोट्या ओढणाऱ्या बापाच्या फाटक्या धोतरातून दूरवर दिसणारं भकास कोरडं आभाळ आणि अहिर्निश आग ओकणाऱ्या सुर्याच्या क्रोधात करपून गेलेली कोवळ्या डोळ्यांमधील स्वप्न.... कशी उजवतील शब्दांच्या छायेत ??? हे आणि असंच काही, आणखी ही बरंच काही-बाही, कुठंतरी लपून बसलेलं, आत खोल काहीतरी रुजलेलं शब्दांच्या आधाराने अंकरून येईल असं वाटत नाही आता गिरवावी लागेल जाणिवांच्या भाषेची बाराखडी... ©चक्कर_बंडा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 719 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा