Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नाते प्राजक्ताचे

क
कर्नलतपस्वी
Wed, 08/10/2022 - 08:51
💬 34 प्रतिसाद
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले. अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ? प्राजक्ताच्या झाडाकडे निघालो.झाडा जवळ पोहोचलो,फुलांचा सडा पडला होता.पाय ठेवायला जागा नव्हती.त्या पारिजातकाच्या सड्याचे कवी अनिल यांनी केलेले वर्णन किती खरे आहे हे लक्षात आले. बाई या पावसानं, लावियली झीमझीम भिजविलं माळरान, उदासलं मन बाई या पावसानं ! फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई पारिजातकाची बाई, कशी केली दैन मातीत पखरण बाई या पावसानं ! कानात पु. ल. देशपांड्यांचा आवाज रुंजी घालू लागला. पावसाच्या रिपरिपी बरोबर फूलं सुद्धा अंगावर पडत होती. भानावर आलो आणी पटापटा फूले वेचू लागलो. 'बहु चंचल चपळ। जाता-येता नलगे वेळ।।' अचानकच एकदम लहान झाल्या सारखे वाटू लागले. मन साठ वर्ष मागे गेले. एकवर्षी चातुर्मासात महादेवाला प्राजक्ताची लाखोली वाहीन म्हणून आईने संकल्प सोडला.त्यावेळेस फारच थोड्या लोकांच्या परसात प्राजक्ताचे झाड असायचे.संकल्प सोडण्या आगोदर त्यांना सांगावे लागायचे म्हणजे जास्तीत जास्त फुले त्या घराला मिळायची. रोज सकाळी पाच वाजता उठून फूले गोळा करणे,मोजणी करून त्याची नोंद वहीत ठेवणे हे माझे काम."जेवढी मिळतील तेवढाच आकडा लिही,जास्त लिहू नकोस",आई अधून मधून सुचना देत असे. एक दिवस अशीच पावसाची रिपरिप चालू होती.आई म्हणाली डोक्यावर काहीतरी घेऊन जा. त्यावेळेस छत्री,रेनकोट श्रीमंतीचे चोचले होते. सुतळीचे बारदानच आमचा रेनकोट असे. "होय आई ",म्हणत डोक्यावर पातेले ठेऊन पावसात धूम ठोकली.दोन पातेली भरून फूले गोळा करताना ओला चिंब,नखशिखांत भिजलो होतो." मी म्हटंले होते की डोक्यावर काहीतरी घेऊन जा", म्हणत आईने पदराने डोकं पुसायला सुरवात केली. आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला. आठवणीने डोळ्याच्या कडा पाणावल्या, पाऊस पडत होता म्हणून इतरांना दिसल्या नाहीत. घरी आलो,आईच्या फोटोकडे नजर टाकली,उगाचच ती गालातल्या गालात हसते आहे असा भास झाला.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7342 views

💬 प्रतिसाद (34)
B
Bhakti Wed, 08/10/2022 - 09:58 नवीन
सुंदर प्राजक्त सडा!
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Wed, 08/10/2022 - 10:50 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Wed, 08/10/2022 - 10:51 नवीन
म्हणत आईने पदराने डोकं पुसायला सुरवात केली. आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.
छान...आवडेश...
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 08/10/2022 - 11:18 नवीन
सुंदर ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Wed, 08/10/2022 - 11:49 नवीन
नाते प्राजक्ताचे
खूप छान जपून ठेवली आहे आठवण!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 08/10/2022 - 11:49 नवीन
@भक्ती,सुजीत,कुमारेक सर धन्यवाद. आजही चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 08/10/2022 - 11:52 नवीन
भक्ती,सुजीत,गणेशा,कुमारेक सर. आज सुद्धा चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 08/10/2022 - 14:03 नवीन
प्रतिसाद वाचतांना, अक्षरे धूसर झाली...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/11/2022 - 05:07 नवीन
अगदी अशीच अवस्था झाली, लेख वाचल्यावर लगेच हा प्रतिसाद वाचताना, लिहित रहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 08/12/2022 - 06:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/10/2022 - 14:54 नवीन
खरंय मुवि. डोळे एकदम ओले झाले वाचताना. खुप छान आणि तरल लिहीता हो कर्नलसाहेब
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/10/2022 - 14:55 नवीन
पुलंनी गायलेले हे गाणे माझ्या वडिलांना खूप आवडाय्चे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 08/14/2022 - 19:29 नवीन
मुवी,माऊली रंगीला रतन ,विजूभौ प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. क लो आ
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/10/2022 - 18:45 नवीन
व्वा ! सुंदर ! वाचताना जणू प्राजक्ताच्या सुंगधाचा शिडकावा झाला ! ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️ लगे रहो कर्नल भाय ! ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 08/11/2022 - 06:11 नवीन
छान लिहिलंय __/\__
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 08/11/2022 - 06:51 नवीन
निरागस आठवण!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 08/11/2022 - 07:52 नवीन
वरील सर्वांशी सहमत. खूपच तरल भावस्पर्शी लेख.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 08/11/2022 - 08:19 नवीन
खुप छान लिहिलंय!!! Image removed.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 08/14/2022 - 19:34 नवीन
अंनंतयात्री,आकाश भौ,सौंदाळा प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 08/12/2022 - 07:57 नवीन
खूप छान लिहिलंय, तुमच्या आठवणीने आमच्या पण डोळ्याच्या कडा पाणावल्या.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 08/12/2022 - 13:18 नवीन
सुरेख आणी सुरेल लेखन .
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 08/14/2022 - 19:32 नवीन
सिरूसेरी,सुखी,श्वेता प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 08/12/2022 - 14:36 नवीन
पेढे आवडले हो काका.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 08/12/2022 - 14:39 नवीन
चुकीच्या जागी पोस्ट झाला प्रतिसाद :=)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 08/13/2022 - 08:48 नवीन
वाह कर्नल साहेब. आईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेली मदत आणि,
आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.
हे वाचल्याचार मला बाहुबली (१) मधला शिवलिंग उचलून आणतानाचा प्रसंग आठवला एकदम! हृदयस्पर्शी लेखन 👍
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 08/14/2022 - 19:35 नवीन
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 08/14/2022 - 04:30 नवीन
खूप छान. तुम्ही खरं तर संरक्षण दलातले सैनिक मग एवढं मराठी साहित्य कधी हो आत्मसात केलेत? सहसा निवृत्त सैनिक लढाईच्या कथा सांगतात. प्रत्येक ठिकाणी अतिशय समयोचित साहित्य दाखले देता. अभिमान आहे. तुम्हांला दीर्घ आयुष्य लाभो. Pl यांच्या आवाजात ते गाणं तर अधिक उदास वाटतं. विनंती कधी लढाईच्या कथा पण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 08/14/2022 - 20:03 नवीन
प्रमोद, साली जीदंगी बडी सतरंगी हैl अगर अंतरंगी बन के जीयो तो ठिक वरना बेरंग सी लगती हैl आई माय मराठी,बाळकडू तीनेच पाजले. हिन्दी आमची मावशी,पोटापाण्यासाठी मावशीकडे रहावे लागले. हिन्दी साहित्य थोडेफार वाचले. सेवानिवृत्त झाल्यानंतर पुन्हा आईच्या कुशीत, भरपुर वाचन करतो,आता फक्त मराठीच. पहिल्यांदा गद्य पण बोरकर,शातांबाई, मोघे, भट,पाडगावकर इ. वेड लावले. पहिल्यांदा हिन्दीत लिहायचो,अजुनही लिहीतो,मिपा मराठीशी प्रतिबद्ध म्हणून मराठीत लिहीतो. मिपावरच आमची जीवनी आम्हीच लिहीली आहे.वाचून कळेल. https://www.misalpav.com/node/48266/backlinks पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे आता आपुली कांचनसंध्या मेघडंबरी सोनपुटें. -कवी बोरकर त्यामुळे वेळच वेळ,स्वानंदा करता व्यासंग म्हणून खेद ना खंत. आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे ओवीत ओवीत त्याची ओढतो स्मरणी - कवी बोरकर बरेच काही लिहीता येईल. वाचकांच्या प्रतिसादाने मुठभर मांस चढते. पुन्हा एकदा धन्यवाद .
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/15/2022 - 15:17 नवीन
पहिल्यांदा गद्य पण बोरकर,शातांबाई, मोघे, भट,पाडगावकर इ. वेड लावले.
अगदी मराठी पद्य रसाळ आणि प्रेमात पाडणारे आहे.गद्यही दर्जेदार! मराठी साहित्य वाचत राहा,असेच सुंदर लिहित राहा.
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Mon, 08/15/2022 - 04:25 नवीन
छान लिहीलं आहे. वाचताना मला पण आईच्या पदराचा स्पर्ष झाला आणि आईच्या पदराचा तो गंध आठवला. निशब्द.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 08/15/2022 - 14:41 नवीन
सुंदर, भावस्पर्शी लिखाण. बाई या पावसानं .... हे गीत प्रथमच वाचनात आले. मग तूनळीवर शोधून ऐकले: https://www.youtube.com/watch?v=ZB790ugPdSQ मात्र हे पुलंनी गायले आहे की संगीतबद्ध केलेले आहे, हे समजले नाही. आईने 'प्राजक्ताची लाखोली' वाहण्याचा केलेला संकल्प आणि तुम्ही लहानपणी त्यात घेतलेला सहभाग सारेच काही आता अद्भुत वाटते.
आजही चिंब भिजलोय पण डोक्यावरचा पदर मात्र हरवलाय.
आजकाल एकूणातच 'पदर' ही संस्थाच (नागरी संस्कृतीतून तरी) नामशेष झालेली आहे, याचे वैषम्य आमच्या पिढीला वाटतेच.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/15/2022 - 15:11 नवीन
+१ बाहेर फिरायला गेलो होतो. मुलगी म्हणाली आई थंडी वाजतेय, मी जिन्स top पेहराव केला होता.मग माझ्या आईनेच (तिच्या आजीने)तिला पदराखाली घेतले आणि माझी चांगलीच खरडपट्टी काढली.लहान लेकराला पदराची भारी ऊब मिळते हे खरं!
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Mon, 08/15/2022 - 16:46 नवीन
खूप सुंदर लिहिलंय
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 08/17/2022 - 10:27 नवीन
भक्ती सरीताजी,चित्रगुप्त आणी विचार माणूस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. पदर खुपच उपयोगी असायचा. खणा नारळानी ओटी भरता यायची. बाळाला पांघरूण म्हणून पदर. अंगठा चोखताना पदराशी खेळणे बाळाचा आवडता खेळ. इत्यादी.. जे आजची पिढी मीस करते किंबहुना माहीतच नाही.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा