Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नकोस विसरू

अ — अनन्त्_यात्री, Fri, 08/05/2022 - 04:00
नकोस विसरू- कोसळणार्‍या प्रपातातल्या जलबिंदूच्या खोल आतवर कल्लोळाच्या अब्जांशाचा निनाद असतो नकोस विसरू- माथ्यावरती ओणवलेल्या निळ्यासावळ्या घुमटावरल्या नक्षत्रांच्या दंतकथांना शेवट नसतो नकोस विसरू- दाट धुक्याच्या पल्याडचे जग धूसरताना अस्तित्वाच्या काचेवरती आभासाचा चरा उमटतो नकोस विसरू- पैलतिराच्या अनाहताशी ऐलतिराच्या कणाकणातील कोलाहलही रुणझुणणारे ध्रुपद साधतो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1624 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/05/2022 - 05:01 नवीन
आवडली, नटसम्राट मधील स्वगताच्या चालीवर वाचायला अजून मजा येते पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 08/05/2022 - 07:06 नवीन
सुरेख रचना. आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 08/07/2022 - 08:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 08/07/2022 - 08:51 नवीन
एकाही कडव्याचा सरळ स्पष्ट अर्थ लागत नाही . उगाचच काहीही . आणि हो , अद्भुत हा शब्द न वापरल्याबद्दल फाऊल धरण्यात येत आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 08/08/2022 - 06:38 नवीन
नकोस विसरू- कोसळणार्‍या प्रपातातल्या जलबिंदूच्या खोल आतवर कल्लोळाच्या अब्जांशाचा निनाद असतो
खूप छान! वरील मार्कस ऑरेलियस यांच्या निरिक्षणाशी सहमत :-) अद्भुत आहेत शब्द सर्व!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा