Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

श्रावण

क — कर्नलतपस्वी, Fri, 07/29/2022 - 14:44

काळ्याशार पाटीवर
पांढरी शुभ्र रेघ
ग्रीष्माच्या पाठीवर
काळे काळे मेघ
खरपुस ताबुंस मातीवर
हिरवी चंद्रकळा
प्राजक्ताच्या झाडाखाली
मोतीयाचा सडा

सुखावली धरती
सुखावली मने
इवल्या इवल्या रोपानी
डुलती हिरवी राने

चिंब झाले मन
रुंजी घालतो साजण
उभा भाऊ दारी म्हणे
आला पंचमीचा सण

मन पाखरू पाखरू
पोचले आईच्या पायाशी
डोळ्यात श्रावण भरून
उभा साजण दाराशी

२९-७-२०२२


  • Log in or register to post comments
  • 3773 views


वाचनखूण लावा
| 3773 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Fri, 07/29/2022 - 14:45 नवीन
खूपच सुरेख.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 07/29/2022 - 14:48 नवीन
मन सुखावलं.
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 07/29/2022 - 15:53 नवीन
आवडली खूप
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 07/31/2022 - 18:51 नवीन
खूपच सुघड, अर्थगर्भ कवन. एक समजले नाही:
उभा भाऊ दारी म्हणे
आणि
उभा साजण दाराशी...
हे दोन्ही एकदमच, म्हणजे एका दारात भाऊ आणि दुसर्‍यात साजण, असे म्हणायचे किंवा कसे ? किंवा आमच्या बालबुद्धीला उमगलेले नाही असे ?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 08/01/2022 - 03:23 नवीन
उभा भाऊ दारी म्हणे आणि उभा साजण दाराशी... चित्रगुप्त जी धन्यवाद. तीचा भाऊ तीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आलाय.ती मनाने केव्हाच आईकडे पोहोचली असून, तीला भावाबरोबर जाताना पाहून पाणावलेल्या डोळ्यानी तीचा साजण दाराशी उभा आहे. जणू म्हणतोय लवकर ये मले तुझ्याविना करमणार नाही. आसे दृश्य आहे. " चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा " शांताबाई शेळके
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 08/01/2022 - 09:36 नवीन
मन पाखरू पाखरू पोचले आईच्या पायाशी डोळ्यात श्रावण भरून उभा साजण दाराशी
खूप छान!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 08/02/2022 - 11:45 नवीन
आवडले श्रावण गीत! --- (बालकवींची क्षमा मागून) तपस्वी कर्नल लिहितो सुंदर श्रावण महिन्याचे गीत, मिपा वरती वाचुनिया मग हर्ष माइना हृदयात!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 32 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 37 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा