Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

रविवार आणि खून का बदला खून

ध
धर्मराजमुटके
Sun, 07/24/2022 - 09:34
💬 4 प्रतिसाद
आज रविवार.. आज कामाचा कंटाळा........... आलाय, आज तु स्वयंपाक बनव ना ! अगं कंटाळा आलाय तर नको करु स्वयंपाक. आज आपण बाहेर जेवायला जाऊया. नक्को. रविवारी मंदिराबाहेर भिकार्‍यांची गर्दी असते त्यापेक्षा जास्त हॉटेलबाहेर टेबल रिकामं होण्याची वाट बघणार्‍यांची गर्दी असते. मग आपण पार्सल मागवूया का ? नक्को. पार्सल पण फार उशीरा येतं आणि ते पदार्थ पण थंड झालेले असतात. मग काय करायचं ? तुला जेवायचं असतं तेव्हा मी तुला हॉटेलचा पर्याय देते काय ? घरी जेवण बनवते ना ? मुझे खून का बदला खून से चाहिए | हट पगली, ऑख के बदले ऑख मांगोगी तो पुरी दुनिया अंधी हो जायेगी ! एवढा वाद घालायच्या वेळात मस्त खिचडी भात बनवून झाला असता. ठीक आहे. मी खिचडी भात बनवतो. सोबत दही किंवा ताक घेऊ. आणि मी भांडी पण घासतो आज. मस्तच रे माझ्या राजा. चल मी तुला डाळ, तांदूळ निवडून देते. बायकोला डाळ, तांदूळ निवडायच्या कामाला लावून मी मस्त बायकोच्या जीवावर मजा मारणार. रविवारची दुपार डोळ्यांवर झापड घेऊन आलीय. झोपा आता. गुडनाईट ! (थोडे सत्य आणि थोडे काल्पनिक. नावाला जागून 'नरो वा कुंजरो वा' भुमिका घेतलीच पाहिजे कधी कधी)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2460 views

💬 प्रतिसाद (4)
म
मुक्त विहारि Sun, 07/24/2022 - 13:35 नवीन
कधीही आणि केंव्हाही .... My All Time Favourite
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 07/24/2022 - 14:56 नवीन
छान आहे,एकमेका साह्य करू.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 09/22/2023 - 11:32 नवीन
'खून का बदला' पासून सुरू होऊन 'खिचडी' वर येऊन थांबलेला प्रवास आवडला.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 09/22/2023 - 16:45 नवीन
बापरे ! तब्बल एक-सव्वा वर्षांनी लेखावर प्रतिक्रिया मिळाली :) कुठे सापडला तुम्हाला हा ? मी तर विसरुनच गेलो होतो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा