एकदा
अक्षयाचा डोह भरुनी
वाहतो जेथे सदा
सांडवा तिथला कुठे ते
सांगशिल का एकदा?
अद्भुताचा ढग निळा
ओथंबतो जेथे सदा
बरसतो केव्हा, कुठे ते
सांगशिल का एकदा?
नीरवाचा घुंगरू
बघ रुणझुणे येथे सदा
सातही स्वर वर्ज्य तरिही
ऐकशिल ना एकदा!
💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/23/2022 - 13:40
नवीन
छान शब्दबद्ध झाली आहे भावना
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sat, 07/23/2022 - 21:54
नवीन
असं कोणतं ठिकाण ते,
कोणी सांगेल का एकदा
:-)
----
पूर्ण समजली नाही पण छान वाटली कविता!
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sun, 07/24/2022 - 15:06
नवीन
+१
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 07/24/2022 - 07:50
नवीन
यातील सांडवा चा अर्थ काय ?
अवांतर :
शुद्धलेखनाच्या चुका टाळणे श्रेयस्कर. एक कवी म्हणून व्याकरणावर / शुद्धलेखनावर जास्त लक्ष द्या असे सुचवेन.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 07/24/2022 - 08:41
नवीन
शुद्धलेखनातील नेमक्या चुका दाखविल्यास अधिक आवडेल.
सांडवा
सांडवा sāṇḍavā m (सांडणें) A sluice, watergate, floodgate; a vent (as through a dam or mound): also a built-up channel or passage of masonry for flowing water generally.
मोल्सवर्थ शब्दकोश
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 07/25/2022 - 07:04
नवीन
कविता आवडली.
सं - दी - प
- Log in or register to post comments