Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अलक

म
मालविका
Mon, 07/18/2022 - 18:05
💬 10 प्रतिसाद
अलक 1 "करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले. अलक 2 "नेहमी शुभ बोलावं रे, वास्तू तथास्तु म्हणत असते", आई कळवळून सांगायची. पण कधी कोणी ऐकलं नाही. इस्टेटीवरून दोन भावांत झालेली भांडणं विकोपाला गेली. "मी मेलो तरी मला बघायला येऊ नको", दोघांपैकी एकाच्या तोंडून निघून गेलं. लाॅकडाऊनमुळे धाकटा भाऊ शहरात अडकला आणि दुर्दैवाने मोठा भाऊ गावी कोरोनाने मरण पावला. धाकट्याला राहून राहून आईचे शब्द आठवत होते. पण वास्तू आधीच 'तथास्तु' म्हणाली होती. - धनश्रीनिवास

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2739 views

💬 प्रतिसाद (10)
स
सुखी Mon, 07/18/2022 - 18:56 नवीन
दोन्ही आवडल्या
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 07/19/2022 - 04:19 नवीन
दोन्ही अलक आवडल्या. दुसरीचा अनुभव खूपदा घेतला आहे. सहज बोलून गेलेलं खरं होऊन जातं.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/19/2022 - 04:39 नवीन
दोन्ही आवडल्या
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/19/2022 - 04:53 नवीन
आवडल्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 07/19/2022 - 06:12 नवीन
दोन्ही छान साध्यासरळ गोष्टी! ..पहिली जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 07/19/2022 - 06:16 नवीन
छान आहेत
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 07/19/2022 - 06:47 नवीन
दोन्ही आवडल्या
  • Log in or register to post comments
न
नगरी Wed, 07/20/2022 - 14:31 नवीन
दोन्ही आवडल्या आणि त्या निमित्ताने अलक म्हणजे काय हे पण कळले
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 07/20/2022 - 15:15 नवीन
आवडल्या दोनही
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 07/20/2022 - 16:45 नवीन
दोन्ही कथा आवडल्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा