Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सुंदर ते ध्यान

B
Bhakti
गुरुवार, 07/07/2022 - 19:36
💬 8 प्रतिसाद
ध्यास सावळ्या विठूचा मनी वाट पंढरीची चालावी चालावी... समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत. त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे. गळ्यात विराजमान तुळशी हार विठूला सदैव सुगंधित करतात.इकडे वारकर्याच्या डोयीवरच्या तुळसहीचा श्वास आसमंत दरवळत राहतो.विठुच्या गळ्यात रुळनार्या तुळशीच्या श्वासाशी एकरूप होत या माथ्यावरच्या तुळशी मार्ग काहीसा सुसाह्य करीत राहतात. विठूचे रूप सावळे ! आषाढातले मेघही सावळे !हे धावणारे सावळे मेघ ,मेघातल्या सरी ,विठूच्या भक्तीरसात वारकऱ्यांनाही विठूचे सावळे रुपडं देतात. विठूच्या कपाळीचा टिळा,केशर सुवास वाटेतल्या नदीच्या स्नानात सुगंधित करीत राहतात. मजल दरमजल नामघोषात ,मनाचे कोष तोडीत चंद्रभागेच्या काठाशी भाव दान समर्पित करतात.कळसाच्या त्या दर्शनाने मनातील पुढच्या अनेक हेतूंना उंची देतात.तर विटेवर उभ्या त्या विठूच्या पावलांशी दोन क्षण नतमस्तक भक्ती केंद्रित मना ,त्या मन गाभाऱ्याचा विस्तार अनंत करतो. पुन्हा पुढच्या वर्षी तेच सुंदर रूप,तोच ध्यास ,तोच श्वास ,पंढरीची वाट! -भक्ती

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2609 views

💬 प्रतिसाद (8)
भ
भागो Fri, 07/08/2022 - 01:36 नवीन
छान लिहिले अहे.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 07/08/2022 - 06:22 नवीन
छान लिहिलं आहे, तुमचं नाव सार्थ करणारं :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/08/2022 - 06:43 नवीन
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय!!!!!!! पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Fri, 07/08/2022 - 06:52 नवीन
छान लिहीता तुम्ही
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/08/2022 - 07:16 नवीन
छान लिहलयं... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekar
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 07/08/2022 - 07:23 नवीन
छान लिहिलयं
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Fri, 07/08/2022 - 08:21 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 07/08/2022 - 08:33 नवीन
विठ्ठल विठ्ठल! सर्वांना _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा