खेळणी उद्योग आणि भारत
LKY ह्याचा एक विचार आहे. "Figure out what works and do it. ". चार्ली मुंगर ह्यांनी भारतावर टीका करताना ह्यावर भाष्य केले होते. भारतांत हा विचार कुणी रुजवला असेल तर तो HPMSNMJ* ह्यांनीच. फक्त हा विचार त्यांनी भारतीय प्रशासनासाठी न वापरता इलेक्शन कशी जिंकावी ह्यासाठी वापरला आणि त्यांत त्यांना भरपूर यश सुद्धा मिळाले.
भारताचे व्यापार मंत्री आहेत श्री पियुष गोयल जी. ह्यांचे एक जवळचे मित्र आमचे सुद्धा चांगले मित्र आहे. HPMSNMJ सरकारांत गोयल पेक्षा कुणी जास्त मठ्ठ असेल तर तो फक्त राम माधव असे ते म्हणत असत. पियुष गोयल म्हणे दर रोज सकाळी उठून शहादा पढतात. "अल्लाह सोडून दुसरा कुणीच देव नाही ! पैगंबर हा सर्वांत श्रेष्ठ देवदूत आहे". आणि ह्या प्रकारे इस्लाम काबुल केल्यावर ते म्हणे पूजा करतात.[१] त्यामुळे एकतर मठ्ठ असावेत नाहीतर खोटारडे. ते असो, कुणाला अल्ला पावतो तर कुणाला राम.
गोयल ह्यांच्या मंत्रालयाने हल्ली IT सेल इत्यादी मंडळींना वापरून मोठे कॅम्पेन पसरवले.
एकूण असे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे कि जणू अचानक भारतीय व्यापारी देशांतच खेळणी निर्माण करू लागले आणि त्यामुळे आयात कमी झाली.
> According to the governmnet data, the import of toys has declined 70% while 61% surge in exports seen in the last three years.
आयात कमी झाली ह्याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारने खेळण्यांच्या वरील आयात कर तिप्पट केला म्हणजे २०% वरून ६०%. ह्या करामुळे विविध खेळण्यांचा किमती वाढल्या आणि त्यामुळे आयात कमी झाली. खेळणीच काय पण कुठल्याही गोष्टीची आयात कमी करण्याचा हा सोपा उपाय आहे. त्याशिवाय BIS लायसन्स अनिवार्य केले आहे. त्याचाही परिणाम खेळणी उद्योगावर झाला आहे.
> while 61% surge in exports seen in the last three years.
हा आकडा चांगला वाटतो पण ६०% निर्यात वाढ पण हि ३ वर्षांत. म्हणजे दर वर्षी साधारण १७% !
१७% सुद्धा चांगला आकडा आहे. पण ह्या आधी निर्यात कशी होती ?
म्हणजे साधारण २०११ पासूनच वेगाने हि वाढ सुरु आहे. २०१५ साली निर्यात साधारण १३% वाढली म्हणजे १७% च्या आसपासच !
थोडक्यांत देशांतील सर्व खेळणी महाग झाली, तुलनेने निर्यात जास्त काही वाढली नाही. तरी सुद्धा मोठ्ठा तिर मारल्याप्रमाणे प्रोपागंन्डा सुरु आहे.
* HPMSNMJ - Honorable Prime Minister Shri Narendra Modi Ji.
[१]- https://youtu.be/-m1y6iQPgRc

- चीन: US$३३.५ अब्ज (निर्यात पारंपारिक खेळण्यांपैकी ६२%)
- झेक प्रजासत्ताक: $२.९ अब्ज (५.४%)
- जर्मनी: $२.४ अब्ज (४.५%)
- हाँगकाँग: $१.९ अब्ज (३.४%)
- नेदरलँड: $१.३ अब्ज (२.५%)
- युनायटेड स्टेट्स: $१.१२ अब्ज (२.१%)
- व्हिएतनाम: $१.०५ अब्ज (२%)
- युनायटेड किंगडम: $९१८.५ दशलक्ष (१.७%)
- पोलंड: $९११.४ दशलक्ष (१.७%)
- बेल्जियम: $७३७.८ दशलक्ष (१.४%)
- फ्रान्स: $६८९.८ दशलक्ष (१.३%)
- मेक्सिको: $६१८.३ दशलक्ष (१.१%)
- स्पेन: $६१३.८ दशलक्ष (१.१%)
- डेन्मार्क: $४७७.५ दशलक्ष (०.९%)
- इटली: $४६६.७ दशलक्ष (०.९%)
अगदी इटली सारख्या लहानशा फलतू देशाने ही खेळण्यांची भरपूर निर्यात केली आहे. भारताने किमान सुरूवात तरी केली आहे. हेच महत्त्वाचे आहे - आणि पीयुष गोयल या मंत्री महोदयांनी धोरणात्मक काम केले आहे हे निश्चित आहे. अन्यथा आयात घसरली नसती! प्रमुख खेळणी उत्पादक पाहू या- हसब्रो (पॉटकेट, युनायटेड स्टेट्स)
- पॉप मार्ट (बीजिंग, चीन)
- मॅटेल (एल सेगुंडो, युनायटेड स्टेट्स)
- स्पिन मास्टर (टोरंटो, कॅनडा)
- कोकुयो (ओसाका, जपान)
- टॉमी कंपनी (टोकियो, जपान)
- FIYTA होल्डिंग्ज (शेन्झेन, चीन)
- रास्ता ग्रुप (ग्वांगझो, चीन)
- बानबाओ (शांताउ, चीन)
- ग्वांगडोंग क्युनक्सिंग खेळणी (शेन्झेन, चीन)
यात भारत कुठेही नाही. हे आपले दुर्दैव आहे. सध्यातरी चीन ने यात आपले निर्विवाद वर्चस्व जगावर लादलेले दिसते. आशा आहे की कधीतरी यातही भारत आपला ठसा उमटवेल. या विषयी अधिक महिती येथे पण महत्त्वाचे हे आहे की भारताने आपली आयात मात्र सुमारे ७०% ने कमी केली आहे. ही आयात अजून कमी होत जाईल असे दिसते आहे. हा यातला सर्वात चांगला भाग आहे. २०२० मध्ये, सरकारने खेळण्यांवरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढवले. पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क हे सुटसुटीत करण्याचे कामही झाले आहे. आता हे काम मंत्री महोदयच करणार ना? भारतीय मूल्य प्रणाली, भारतीय इतिहास आणि संस्कृती यावर आधारित खेळण्यांचे डिझाईन करणे, देशांतर्गत रचना मजबूत करणे आणि भारताला खेळण्यांचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान देणे हे त्यांचे उद्देश आहेत. यात मला काही गैर दिसत नाही. आता हे ही काम मंत्री महोदयच करत असणार - किमान बाबूंना तसे निर्देश तर दिले जात असणार. सरकारी यंत्रणा त्यातल्या त्यात त्यांच्या वेगाने काम करणार. त्यातूनही इतकी आयात घट्वल्याबद्दल माझ्या कडून तरी श्री पीयुष गोयल यांना पैकीच्या पैकी मार्क आहेत.