Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सन्तूर

अ — अनन्त्_यात्री, Wed, 07/06/2022 - 19:00
स्वरतत्वाचे तुषार अगणित भवतालाला व्यापुनी उरले रोमरोम पुलकित करणार्‍या स्वरपुंजांनी गारूड केले स्वरचित्रातील अवकाशाच्या सुप्त मितीचे दर्शन झाले स्वरलहरींचे जललहरींशी निगूढ नाते पुनश्च कळले स्वरशिल्पातील अमूर्ततेचा चिरंतनाशी घालुनी मेळ शब्दावाचून सहज रंगला विलक्षणाचा अद्भुत खेळ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2154 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/07/2022 - 05:33 नवीन
अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपूर्वी चिंतामणी जयंती समारोहाच्या वेळी उस्ताद रईसखान यांचे सतार वादन ऐकताना झाली होती. ते दोन तासांहुन अधिक काळ वाजवत होते आणि श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते, इतके की मैफिल संपली तरी टाळ्या वाजवण्याचेही कोणाला भान उरले नव्हते. तुम्ही ती भावना शब्दात चपखल उतरवली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 07/07/2022 - 14:11 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 07/09/2022 - 18:09 नवीन
भान हरपून जायला लावतात. उदा. महेश काळे यांनी (सारेगमप दरम्यान) सादर केलेलं कानडा राजा पंढरीचा. किंवा आशा भोसलेंचं जीवलगा.. किंवा भीमसेन जोशींचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा किंवा लता मंगेशकरांचं सख्या रे घायाळ मी हरिणी
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 54 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा