Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

विठू माउली

म — मालविका, Fri, 07/01/2022 - 17:12
रखुमाई विठ्ठलावर होती थोडी नाराज ठरवले तिने फार बोलायचे नाही आज ठरले होते आधी ते वेळ मला देणार मग जाऊन भक्तांना दर्शन ते देणार भक्त आपले सारखे काही ना काही मागतात विचार न करता हे देऊन सगळे टाकतात आधीच मला ठेवली यांनी स्वतःपासून दूर आषाढीला येईल आता भक्तांचा मोठा पूर लांबूनच मी यांच्यावर लक्ष ठेवून असते कोण येतंय कोण जातंय सगळं बघत बसते हे सुद्धा दिवसभर उभे राहून दमतात मिटल्या डोळ्यांनी सुद्धा जग सगळं पाहतात कधी एकदा हात खाली घेईन असं त्यांना होत पण भक्तांकडेच मन यांचं सारखं ओढ घेत आषाढीच्या आधी जरा विसावू त्यांना म्हटलं दोन घटका चार शब्द बोलावं जरा वाटलं पण आता यांना भलतीच काळजी लागली कोण करणार पूजा यावर पैज लोकांची लागली का होतो स्वार्थी माणूस काहीच कसं कळेना देव जरी असलो तरी चिंता काही सुटेना क्षणभर विश्रांती घेऊ असं आमचं ठरलं पण वारकर्यांच्या प्रेमाने मन यांचं भरलं मला म्हणाले रखुमाई काळजी का करी माझा वारकरी येतो नेहमीच माझ्या दारी त्याचा आहे माझ्यावर विश्वास केव्हढा ठाम माझ्यासाठी येतो इथवर सोडून त्याच काम खरा वारकरी असतो तो काही न मागता जातो दर्शनाने फक्त माझ्या आनंद त्याला मिळतो त्याच्यासाठी मी बाकीच्यांना सहन करतो त्याच्याचमुळे तुझा विठू राऊळात रमतो माझं दर्शन होताच तो होईल सुखी त्याच्यासाठी राग तुझा सोडून दे सखी धनश्रीनिवास

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1143 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Fri, 07/01/2022 - 18:34 नवीन
गृहस्थांच काही खर नाही दोन डोळे बायकोचे cctv वाटतात नाका समोर चालायला देवाला सुद्धा भाग पाडतात
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 07/01/2022 - 23:45 नवीन
चांगली कल्पना. आवडली कविता. :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा