Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

राष्ट्रहीतासाठी.

अ — अमरेंद्र बाहुबली, Sun, 06/26/2022 - 18:54
चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी! पेट्रोल ११०, डिझेल ९५, सीएनजी ९०, सहण करा! राष्ट्रहीतासाठी! भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे, मरती जनता सहण करा! राष्ट्रहीतासाठी! निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी, शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा! राष्ट्रहीतासाठी! पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा! राष्ट्रहीतासाठी! आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5586 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sun, 06/26/2022 - 21:09 नवीन
अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे हिशोब.. माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ढिगळ.. भगवा.. निळा.. पिवळा..हिरवा..विखुरला भारत.. तिरंगा शान आपली हे विसरला भारत.. चेहरा शांत..चेहरा निष्पाप..मुखवट्यांचेच रंग फकीर म्हणुनी उगा, म्यानात मौनाची तलवार खोटी नीती.. खोटा विठ्ठल..खोटाच राम.. राष्ट्रहित फुकाचे, फक्त पैशाचा बाजार.. - गणेशा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 06/26/2022 - 21:23 नवीन
जबरजस्त गणेश सर.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/27/2022 - 04:40 नवीन
लिहिते राहा. राष्ट्रहितासाठी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/27/2022 - 06:49 नवीन
बरोबर प्रा डॉ सर! राष्ट्रहीतासाठी हे अशुद्ध लेखन आपण "राष्ट्रहितासाठी" असे सुधारले, हे मराठी हिता साठी उपयोगी आहे ! कृ ह घे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/28/2022 - 08:49 नवीन
उष्ट्राणां विवाहेषु , गीतं गायन्ति गर्दभाः । परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः You scratch my back and I'll scratch yours
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/28/2022 - 09:34 नवीन
बाकी चिनची घुसखोरी वगैरेवर तुम्ही सैन्यदलात होतात तरीही बोलत नाहीत. ती घुसखोरी “राष्ट्रहीतासाठी” होती असं तुमचं मत आहे का??
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/28/2022 - 15:34 नवीन
भुजबळ बुवा संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 06/28/2022 - 15:40 नवीन
+1
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/28/2022 - 15:58 नवीन
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का? भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना? मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात बरोब्बर त्यावरच कशी चुप्पी साधली जाते? काॅंग्रेस चं सरकार असतं तर आपण ईतके चुप बसलो असतो का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/28/2022 - 16:06 नवीन
भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना? यासाठी काही पुरावा कि आपल्या आवडीच्या संपादकांसारखे हवेतील वायबार? मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात यासाठी काही पुरावा?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/28/2022 - 16:32 नवीन
तुम्ही बातम्या नी वृत्तपत्र वाचतच नसाल त्यामुळे चिने ने गाव वसवलं, पुल बांधले वगैरे बातम्या तुमच्या पर्यंत पोहोचल्याच नसतील. तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच वाखाणण्याजोगं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/28/2022 - 16:44 नवीन
आपणच इथे भाजप बद्दल सतत गरळ ओकत असता आणि तिघाडी सरकारचे टोकाचे समर्थन करत असता. मागत यात कणभर सुद्धा पुरावा नसला तरी चालतो. चालू द्या
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/29/2022 - 06:48 नवीन
तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच वाखाणण्याजोगं आहे.

सेना म्हणजेच महाराष्ट्र

आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकाला
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 06/29/2022 - 07:19 नवीन
भाजपमाता म्हणज भारत माता! पुढील वाक्य जसेच्या तसे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/29/2022 - 08:46 नवीन
भाजपमाता म्हणज भारत माता! हि आपली मुक्ताफळे आहेत माझी नाहीत. मी कधीही असे म्हटलेले नाही. तेंव्हा नसलेले शब्द माझ्या तोंडात टाकू नका
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 06/27/2022 - 07:12 नवीन
पेट्रोल ११०, डिझेल ९५, सीएनजी ९०, सहण करा! काय तो कांगावा जगात हि इंधने २५रु प्रतिलिटरच मिळतात जणू नाही नाही फुकटच मिळत असतील कि ..... https://www.globalpetrolprices.com/Australia/gasoline_prices/
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 06/27/2022 - 07:28 नवीन
काही दिवसापूर्वीच नायगारा फॉल्स बघून आलो. पेट्रोल १०५-११० रूपये लिटर भावाने भरले. लवकरच भटकंतीत धागा टाकतोय जरूर वाचा. कमी अशुद्ध लेखन व भरपुर फोटो टाकण्याचा मानस आहे
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 06/27/2022 - 08:48 नवीन
तुम्ही णायगारा फॉल बघुण आलात. पेट्रोल १०५-११० रुपये भावाणे भरले. पण कृपा करुण अशुद्ध लेखण व भरपुर फोटो टाकन्याचा माणस ठेवु नका. पिलीज.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/27/2022 - 07:13 नवीन
शिर्षक थोडे बदलले असते तर....."राष्ट्रहितासाठी" ऐवजी "राष्ट्रवादीहितासाठी" इतकाच काय तो बदल केला असता तर महाभारता पेक्षा मोठे खंडकाव्य लिहिता आले असते. ये कुछ जम्या नही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 06/27/2022 - 07:36 नवीन
१९४७,६२,६५ का आ तिवारी नसबंदी इमर्जन्सी इत्यादी सोयिस्करपणे विसरले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 06/27/2022 - 09:50 नवीन
ईमर्जन्सी?? अनूशासनपर्व .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 06/27/2022 - 07:15 नवीन
आमदारांची पळवापळवी २.५ वर्षांपूर्वी आज ट्रायडंट उद्या ताज आणि तोंडदाखवयायला यशवंतराव चव्हाण सेंटर .. हे चालत होता ? हा तेव्हा ट्रायडंट काह भाव बहुतेक २०० रु खोलीला असावा !!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 06/27/2022 - 07:22 नवीन
अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे हिशोब.. माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ढिगळ.. थोडा बदल केलातर... अहिंसेच्या पुतळ्याखाली..हिंसेचे ओघळ.. माणुसकीच्या सदऱ्याला.. धर्माचे ठिगळ..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 06/27/2022 - 08:53 नवीन
भारी.. जान आणली कडव्यात तुम्ही..
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 06/29/2022 - 16:41 नवीन
राष्ट्रहितासाठी अजुन एक कन्हय्याने आपली जान गमावली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा