Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आज्जी गेलीय सोडून

च — चांदणे संदीप, Tue, 06/14/2022 - 18:24
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6179 views

💬 प्रतिसाद
स
सौन्दर्य Tue, 06/14/2022 - 19:34 नवीन
आजी म्हणजे एक हळवा कोपरा.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 06/15/2022 - 02:41 नवीन
आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/15/2022 - 05:17 नवीन
ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 06/15/2022 - 05:25 नवीन
का बॉ सोडले लैकराला एकट्यालाच आज्जीने ?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 06/15/2022 - 06:31 नवीन
कविता वाचून हाच प्रश्ण पडला होता. कोणती बरं अशी मजबुरी असेल आज्जीची की लेकराला असे सोडून दिले? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/15/2022 - 06:32 नवीन
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.
  • Log in or register to post comments
आ
आंबट गोड Wed, 06/15/2022 - 08:13 नवीन
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 06/15/2022 - 13:23 नवीन
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 06/19/2022 - 08:11 नवीन
हो की.. मान गये!! जुन्या पिढीतल्या जुन्या विचारांत वाढलेल्या आजीला नसेल पटत हे. काढलंन घरातून बाहेर..
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 06/19/2022 - 08:03 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sun, 06/19/2022 - 08:54 नवीन
हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/25/2022 - 10:48 नवीन
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 12 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 16 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 20 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा