Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आत

अ — अनुस्वार, Wed, 06/08/2022 - 17:43
आत मी, बाहेर कोण? जगण्याच्या अवस्था किमान दोन. कधी पाखरू, कधी मुंगी, तरी उतरत नाही जगण्याची धुंदी. वाटेने तुडवले, लाटांनी बुडवले, पावसाने झोडपले, थंडीने थिजवले.‌ संकटांचा उन्हाळा दरवर्षी आला निजलेलं माणूसपण जागवून गेला. ध्यानाच्या समाधीतही चाचपडतो, अंगावरून हात फिरवत स्वतःला शोधतो. भर दुपारी सूर्य डोक्यावर घेतला आतला अंधःकार तरी नाही मिटला. माणसाचं अंतःकरण म्हणजे सिंहाची गुहा स्वतःला जिंकलं तरच बाहेर यायची मुभा. अंतरंगातला देव जसा चंदनाचा गाभा ज्याला गवसला तो विटेवरी उभा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1675 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/09/2022 - 05:42 नवीन
मिटर मधे बसवताना काही शब्द बहुतेक मागेपुढे झाले असावेत. पण तरीसुध्दा वाचाविशी वाटली, जो विचार मांडायचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आवडला. लिहित रहा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 06/09/2022 - 14:13 नवीन
पुढच्या प्रयत्नात उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 06/09/2022 - 05:50 नवीन
स्वतःचा शोध घेण्याची कल्पना सांगणारी कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनुस्वार गुरुवार, 06/09/2022 - 14:22 नवीन
आपल्याला कविता आवडली आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा