Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

T
Trump
Sun, 05/15/2022 - 11:05
💬 14 प्रतिसाद
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल. मिपावरील त्याचा आयडी: विसोबा खेचर - https://www.misalpav.com/user/6 आणि त्यांचे सर्व लेखन - https://www.misalpav.com/user/6 त्यांची लेखनवही (ब्लॉग) http://tatya7.blogspot.com/ त्यांची चित्रवाहिनी Tatya Abhyankar a.k.a Visoba Khechar - - https://www.youtube.com/watch?v=YjiB-cKDLUA - https://www.youtube.com/user/tatya7/videos - https://www.nghenhachay.net/artist/UCHkQVSmnudzuIJVDT2fXOGA --------------------------- इतर रसिकांनी, मित्र-मैत्रींणीनी व्यक्त केलेल्या भावना:
  • https://www.yinbuzz.com/tatya-abhyankar-i-did-everything-wrong-8879
  • http://anandghan.blogspot.com/2019/05/blog-post_17.html
  • https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D/
  • https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6017 views

💬 प्रतिसाद (14)
T
Trump Sun, 05/15/2022 - 11:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sun, 05/15/2022 - 12:34 नवीन
त्यांच्या पुज्य मातोश्रींच कसं काय आहे आता?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 05/15/2022 - 13:01 नवीन
तात्यांचे ही मिसळपाव टपरी सदा गजबजलेली राहो. तात्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/16/2022 - 07:13 नवीन
मिपाच्या आद्य संस्थापकांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली __/\__
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/16/2022 - 08:31 नवीन
मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना भावपुर्ण श्रध्दांजली. तात्यांना भेटता आलं नाही याचं कायमच शल्य राहील. हॉटेल मिपा नेहमीच हाऊसफुल्ल राहो!
  • Log in or register to post comments
न
नगरी Mon, 05/16/2022 - 11:38 नवीन
कोणालातरी आठवण आहे हे पाहून बरे वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली,खरेच ग्रेटच माणूस होता
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Mon, 05/16/2022 - 13:12 नवीन
श्री तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Mon, 05/16/2022 - 13:36 नवीन
विनम्र श्रद्धान्जलि _/\_
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 05/16/2022 - 15:41 नवीन
आपण आज व्यक्त होऊ शकतो. माझा कधीही संबंध आला नाही, पण त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहीन.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Mon, 05/16/2022 - 22:03 नवीन
कित्येक सिध्दहस्त लेखकांना मिपा वर बोलावुन त्यांनी मिपा एका उंचीवर नेले होते. ईतरांच्या तुलनेत मिपा अजुनही उंचच आहे ..
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 05/17/2022 - 19:28 नवीन
२००८ साली अमेरिकेत आलो आणि माय मराठीचा संपर्क तुटला. घरात जे काही मराठीत बोलायचो तेव्हढेच. मराठीत बोलायची, संवाद साधायची प्रचंड निकड भासत होती आणि माझ्या एका मित्राने (महेश अभ्यंकर) मिपा सुचवले. आधी बिचकत बिचकत नंतर बिनधास्तपणे लिहू लागलो. वाचकांच्या प्रतिक्रियेप्रमाणे लेखनात सुधारणा करू लागलो व आजमितीला ५०-६० लेख कविता लिहून झाल्यात. मिपावरचा वेगवेगळ्या विषयांवरचा लेखकांचा गाढा व्यासंग पाहता इतर कोणत्याही साईटवर जावेसे वाटत नाही. येथे कौतुकाची थाप लाभते तर कधीकधी पाठीत दणका देखील बसतो. कोणताही विषय मिपाला वर्ज्य नाही आणि प्रत्येक विषयावरचे पंडित मिपावर आहेत. कोणतीही नवी वस्तू, तंत्रज्ञान विकत घ्यायचे असो, वापरायचे असो, अचूक असे सल्ले नेहेमी मिळतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे तात्यांनी आपल्यावर मिपा सुरु करून अगणित उपकारच केले आहेत. मी मिपाकर असल्याचा मला अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 05/17/2022 - 23:12 नवीन
मिपासंस्थापक अन मराठी आंतरजालावरचे प्रसिद्ध लेखक स्व. तात्यां अभ्यंकर यांच्या स्मृतीस अभिवादन. तात्या आपल्यात नसले तरी त्यांच्या लेखनाच्या व त्यांनी लावलेल्या मिपाच्या रोपट्याच्या स्वरुपात ते कायमच आपल्यासोबत असतील. सर्व मिपाकरांच्या सहकार्‍याने मिपाची पताका उंचावत ठेवणे ही तात्यांच्या कार्याला उत्तम श्रद्धांजली ठरेल.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 05/18/2022 - 03:56 नवीन
तात्यांना सश्रध्द श्रध्दांजली. खादाडी सदर आणि सोबत एका नव्या ललनेचा फोटो व त्यावर "ही आमची अमुक तमुक. हिच्यावर आमचा फार जीव" ही तात्यांची ट्रेडमार्क कॉमेंट नेहेमीच स्मरणात राहिल.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/18/2022 - 08:07 नवीन
त्यांना कधी भेटायचा योग आला नाही पण माणूस मोठा रसिक आणि दिलदार होता हे त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या बद्दल इतरांनी जे लिहिले आहे त्यातून समजते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 14 hours ago
  • सुंदर !!
    3 days 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा