Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...

म
मनिष
Sun, 05/01/2022 - 10:53
🗣 77 प्रतिसाद
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम. Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत. Maharashtra काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्‍यांचा द्वेष नको. :-)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17078 views

🗣 चर्चा (77)
क
कंजूस Sun, 05/01/2022 - 16:16 नवीन
महाराष्ट्र तारतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 05/01/2022 - 17:45 नवीन
अविकसीत, पवारांनी ४० वर्षापासून खड्डयात घातलेला महाराष्ट्र ३८ रूपये देतो. तर अतिविकसीत मोदींचा गुजरात ४ रूपये तर त्याहुनही जास्त विकसीत योगींचा युपी ३ रूपये देतो. महाराष्ट्र, मुंबई, शिवसेना, मावळे ह्यांचा द्वेष करानर्यांनी जरा डोळे ऊघडून पहावं.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 05/01/2022 - 18:21 नवीन
हाच विचार करत होतो.पण महाराष्ट्रावरचा केंद्राकडुन होत असणारा अन्याय हा आदिम काळापासुन चालत आलेला आहे.केंद्रात कोणाचेही सरकार असो महाराष्ट्राला नेहेमीच सापत्न वागणुक मिळाली आहे.(काका केंद्रात मंत्री असताना सुध्दा.)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 05/01/2022 - 19:04 नवीन
आता कोळसा मिळण्याची ही मारामार आहे, ३८ रूपये हवेत फक्त केंद्राला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 05/01/2022 - 19:05 नवीन
लोकसंख्येचे गुणोत्तर पाहिले तर २ कोटी लोकसंख्या असलेले दिल्ली राज्य १३.७% प्रत्यक्ष कर जमा करते, तर दिल्लीच्या ७ पट लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातून ३८% प्रत्यक्ष कर जमा होतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 05/02/2022 - 07:50 नवीन
म्हणजे शिलादिक्षीत तसेच केजरीवालांची दिल्ली मोदींच्या अतिवकसीत गुजरात तसेच योगांच्या युपी पेक्षा जास्त टॅक्स देते. અરે મારા ગુજરાતને ક્યાં લઈ ગયા? (अरे कुठे नेऊन ठेवला गुजरात माझा??) :)
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Mon, 05/09/2022 - 10:38 नवीन
प्रत्यक्ष कर उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा ३८/१०० आहे यात पवारांचे काय कर्तृत्व आणि गुजरातचा हिस्सा ०४/१०० इतका आहे यात मोदींची काय चूक हे उलगडून सांगाल का? कावीळ झालेल्या सर्व जग पिवळे दिसते अशी म्हण आहे तसा तुम्हाला मोदीफोबिया झाला आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/10/2022 - 08:25 नवीन
पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे मागे अमितशहा बोलून गेले होते. पवारांनी महाराषट्रासाठी काय केले हे ३८ रूपये दाखवत आहेत तर मोदींनी गुजरात ला किती विकसीत केले हे ४ रूपये दाखवत आहेत. खरा कर्तृत्ववान कोण हे मोदीभक्तांना समजावे हा ऊद्देश. राष्ट्रहीत वगैरे हे मोठमोठ्या गप्पा मारून नाहीतर प्रत्यक्ष कामे करून सिध्द करावे लागते. ०४/१०० इतका आहे यात मोदींची काय चूक हे उलगडून सांगाल का? मोदी गुजरातचा निच विकास करू शकले नाहीत ह्यासाठीही आता नेहरूंना जबाबदार धरायचे का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/02/2022 - 09:12 नवीन
छान माहिती. अशीच माहिती महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नात मुंबई चा वाटा किती किंवा पुणे किंवा इतर शहरांचा वाटा किती अशा प्रकारे मिळेल काय ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/02/2022 - 10:11 नवीन
नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे जाहीर वक्तव्य आहे(पुरावा नाही नका सर्व मीडिया नी ते प्रसिद्ध केले होते आणि आज पण उपलब्ध आहे) गुजरात नी केंद्र सरकार लं टॅक्स का द्यावा. गुजरात नी स्वतच्या कष्टावर राज्य प्रगत केले आहे. केंद्राला टॅक्स आम्ही का द्यावा नालायक राज्यांना वाटण्यासाठी . असा त्या वक्तव्याचा आशय होता. आता ते प्रधान मंत्री आहेतं पण कोठून निवडणूक लढवली आहे. यूपी मधून .. ज्या राज्याला ते नालायक राज्य समजत होतें अती प्रचंड लोकसंख्या आणि अक्कल कमी असे यूपी चे वर्णन करता येईल. तिथे काही ही न करता फक्त भावनिक थापा मारून . कोणताही गया गुजरा फालतू माणूस निवडून येवू शकतो. सोनिया .मतदार संघ यूपी. इंदिरा मतदार संघ यूपी. नरेंद्र मतदार संघ यूपी स्मृती इराणी .. मतदार संघ यूपी जया बहादुरी. मतदार संघ यूपी अजून खूप आहेत. पण जर देश म्हणून आपण भारत मान्य केला असेल तर कोणता भाग किती टॅक्स देतो हा वाद अयोग्य आहे देश म्हणजे एकत्रित कुटुंब च असते. चार भावांचे कुटुंब असेल तर एक नालायक असतो एक रुपया पण कमवत नाही. ऐश करत असतो तीन भावांच्या जिवावर. स्वतःची लायकी झीरो. तरी हा नालायक ब्रदर स्वतःला च ग्रेट समजत असतो. यूपी,बिहार,राजस्थान,झारखंड, chhatisgadh,mp , ह्या राज्या न सारखा. पण एकत्रित कुटुंब टिकावे वाटत असेल तर संयम ठेवावा लागतो पण नालायक भावाला . तू काही कामाचा नाहीस तुला ज्या सुविधा मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त तीन मोठ्या भावांमुळे . नाही तर तू जगण्याच्या अन लायकीचा राहणार नाहीस .. ह्या सत्य स्थिती ची जाणीव त्याला करून देणे गरजेचे असतें इथे उलट आहे. नालायक,देशावर बोजा असणारी, देशाला dubavnari ,देशामध्ये नसती तर भीक मागून पण पोट भरले नसते. असे हे नालायक देशाचे मालक असल्या सारखे वागत आहेत. आणि त्याचा तीव्र संताप बिगर हिंदी राज्यात आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/02/2022 - 10:19 नवीन
मला वाटले की हिंदी भाषिक राज्यांवरचा राग फक्त तिकडच्या हिंदी च्या धाग्यावर काढायचा असतो. सगळीकडेच तेच ते लिहायचे असते काय ? लेखकाने एवढी मेहनत घेतली आहे तर त्यांचा काहितरी सन्मान ठेवा ना.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 05/02/2022 - 10:57 नवीन
(टॅक्स देत नसले/आयतखाऊ असले तरी) हिंदी भाषीक नी त्यांच्य् राज्यांचे प्रतयेक धाग्यावर समर्थन करणे गरजेचेचे आहे का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/02/2022 - 11:55 नवीन
इथे तुम्हाला कुठे समर्थन दिसले बुवा ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 05/02/2022 - 12:17 नवीन
वर तुम्हाला जसं ते हिंदी भाषकांचा राग करताय ते दिसलं तसंच.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/02/2022 - 12:25 नवीन
वर तुम्हाला जसं ते हिंदी भाषकांचा राग करताय ते दिसलं तसंच.
अच्छा ! मला तर मी असं काही इथे लिहिल्याचं दिसत नाही. असो ! भावना पोहोचल्या.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 05/02/2022 - 13:38 नवीन
http://misalpav.com/comment/1139643#comment-1139643 ही प्रतीक्रीया कुणीतरी दुसरेज धर्मराज देऊन गेले असावेत. मिपावर एकाच नावाचे दोन आयडी कसेकाय?? खिक्क.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 05/02/2022 - 13:43 नवीन
या प्रतिक्रियेत मला तरी मी हिदी भाषिकांचे समर्थन केले आहे असे दिसत नाही. कोणा तरी त्रयस्थाचे मत घेतले पाहिजे. असो ! चांगल्या धाग्यावर निष्फळ प्रतिसाद काही कामाचे नाहीत म्हणून थांबतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/03/2022 - 08:51 नवीन
चुकीचे चित्र वरील चित्र मिस लीडींग आहे कारण जसे दिल्ली एन.सी.आर. ला स्वतंत्र राज्य पकडुन त्यांचे टॅक्स मधील योगदान दाखवले आहे तसेच मुंबई अन बृहन्मुंबै ला स्वतंत्र राज्य पकडुन , त्यांचे योगदान स्वतंत्र रित्या दाखवल्यास उर्वरीत महाराष्ट्र फार काही दिवे लावत असेल असे वाटत नाही. एकट्या मुंबईचा अर्थ्संकल्प अख्ख्या केरळ राज्या पेक्षा मोठ्ठा असतो म्हणे. मुंबई ही भारतातील बहुतांश मोठ्ठ्या कंपन्या ंचे हेडक्वार्टर असल्याने त्यांचे प्रॉफिट्स तिथे दाखवले जातात आणि तेथुन टॅक्स कलेक्ट होतो , त्यात मुंबई चे काही विशेष कौतुक नाही. तसेच सेम फॉरेन इन्वेस्ट्मेंट बाबत आहे . एखाद्याला फॉरेन इन्टिटीला समजा टाटा मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ते काय जमशेदपुरला जाऊन पैसे गुंतवणार आहेत काय ? किंव्वा रिलायन्स मध्ये गुंतवायचे असतील तर ते काय जाम नगर मध्ये जाऊन गुंतवणार आहेत काय ? जिथं मुंबंईत हेड ऑफिस आहेत तिथेच पैसे गुंतवले जाणार ना , त्यात महाराष्ट्राचे काय कौतुक ? आणि ही मुंबई महाराष्ट्राचा फायदा कमी अन नुकसानच जास्त करते , ह्या मुंबईला पाणी देण्यासाठी तानसा भातसा वगैरे ठाण्यातील तलावांवर डल्ला मारलेला आहे, ह्या मुंबईला वीज देण्यासाठी आमच्या कोयना प्रकल्पावर डल्ला मारलेला आहे. हे म्हणजे महाराष्ट्राला ओरबाडा , मुंबईला गोंजारा अन त्यातुन आलेला टॅक्स केंद्राला पाठवुन त्यांची चाटत बसा असे काहीसे आहे. मुंबई जर स्वतंत्र राज्य / केंद्रशासित प्रदेश असेल , तर हीच हीच वीज , हे पाणी महाराष्ट्रातील अन्य विभागात देता येईल , तिथे विकास घ्डवता येईल . आपण वरील चित्र महाराष्ट्र वजा मुंबई असे दाखवल्यास चर्चा करता येईल . माझ्या अंदाजे , महाराष्ट्र वजा मुंबई केल्यास उर्वरीत महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडु च्या लेव्हलला जाऊ शकणार नाही . पण असो , पॉलिटिक्स इज ऑल अबाऊट इकोनॉमिक्स अ‍ॅन्ड इकॉनॉमिक्स इज ऑल अबाऊट पॉलिटिक्स. मुंबईतील मलिदा कोण खातो आपल्याला माहित आहे, त्यांच्या दहशतीपुढे बोलायची काही सोय नाही. त्यामुळे - तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/03/2022 - 10:12 नवीन
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे सर.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/03/2022 - 12:03 नवीन
बरं मग ? मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे ह्याने काय फरक पडतो? ही संमृद्धीची बेटं सामान्य मराठी लोकांच्या काय उपयोगाची ? प्रश्न इतकाच आहे की मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्र चे टॅक्स कलेक्शन किती ? जी.डी.पी किती ? पर कॅपिटा इनकम किती ? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती ? एक्ट्या मुंबईमुळे (अन त्यातही परराज्यात चालणार्‍या त्यांच्या ऑफिसेस मुळे ) वाढीव टॅक्स कॉन्ट्रिब्युशन दिसत असेल तर त्याचा काय उपयोग ? ३६ विद्यार्थ्यांच्या वर्गात ३५ विद्यार्थी ३४ मार्क मिळवुन नापास होत आहेत अन एक विद्यार्थी १०० मार्क मिळवत आहे तर अ‍ॅव्हरेज काढल्यास प्रत्येकाला ३५.८३ मार्क्स पडत आहेत म्हणुन सगळेच विद्यार्थी पास करता येतील का ? मुंबईने महाराष्ट्राचे जेवढे भले केले आहे त्यापेक्षा जास्त नुकसानच केलेले आहे असा माझा विश्वास आहे . मुंबई केंद्रशाशित प्रदेश असता अन महाराष्ट्राची राजधानी अहमदनगर किंव्वा औरंगाबाद असती तर जास्त भलं झालं असतं महाराष्ट्राचे असे माझे ठाम मत आहे . आणि हो मला ह्याबाबतीत राजकारणाशी घेणेदेणे नाही. दिल्लीत मनमोहन सिंग ह्यांच्या नेट्रुत्वाखाली सोनिया गांधींचे सरकार होते तेव्हाही मी हेच म्हणत होतो अन उद्या भविष्यात संपुर्ण मुंबई भाजपाच्या हातात आली तरीही मीच हेच म्हणत असेन. मुंबईला सोडा , उर्वरीत महाराष्ट्राचा विचार करा . त्यातल्या त्यात आमच्या पश्चिम महाराष्ट्रात "साहेबां"च्या कृपेने जरातरी प्रगती आहे. कसे का असेना पण सहकारी संस्थांचे जाळे आहे, उसकारखाने आहेत , दुध महासंघ आहेत, एम.आय.डी.सी आहेत. तिकडे मराठवाड्यात , अमरावती मध्ये , विदर्भात , उत्तर महाराष्ट्रात काय अवस्था आहे पहा . एकट्या मुंबईच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्राची लाल असे म्हणण्यात काही एक अर्थ नाही .
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 05/03/2022 - 12:39 नवीन
पटतंय.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 13:03 नवीन
भारतातील प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे. राज्यातील सर्व भागांचा समतोल विकास झाल्याचे कोणत्याच राज्यात दिसणार नाही. प्रतेक राज्यात अत्यंत मागास असे जिल्हे असतात. काही तर पूर्ण राज्य च मागास असतात. पुणे,नाशिक,औरंगाबाद,कोल्हापूर,नवी मुंबई,मुंबई,ठाणे, अशी अनेक शहर महारष्ट्र मध्ये आहेत. त्या पेक्षा कमी प्रगत. असा सातारा,रत्नागिरी,सिंधू दुर्ग,कराड, कोल्हापूर चा ग्रामीण भाग .शिर्डी, नागपूर,असे अनेक भाग पण विकसित आहेत अनेक राज्यातील सर्वात जास्त विकसित भागा पेक्षा पने भाग जास्त विकसित आहेत. गडचिरोली, रायगड मधील आदिवासी भाग,विदर्भातील काही भाग अविकसित आहे. पण इतका पण नाही की त्यांची तुलना यूपी,बिहार ,राजस्थान मधील ग्रामीण भागाशी करता येईल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/04/2022 - 12:42 नवीन
मुंबई ही भारतातील बहुतांश मोठ्ठ्या कंपन्या ंचे हेडक्वार्टर असल्याने त्यांचे प्रॉफिट्स तिथे दाखवले जातात आणि तेथुन टॅक्स कलेक्ट होतो , त्यात मुंबई चे काही विशेष कौतुक नाही.
वरील चित्रांत जीएसटी सुद्धा घेतले आहे. जीएसटी मध्ये तसे होत नाही. इतर राज्यात प्लेस ऑफ बिझनेस असल्यास जीएसटी नंबर काढावा लागतो. जीएसटी कलेक्शन सुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 10:30 नवीन
सर्व चित्रावरून एकच स्पष्ट होते.देशाचा पूर्ण भार. गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक,तमिळ nadu, केरळ ,आंध्र ह्याच राज्यांवर आहे. देशाची अर्थ व्यवस्था च ह्या राज्यांवर अवलंबून आहे. मुंबई वेगळी काठून बोला असे टोमणे मारले जातात. पण मुंबई ही मुंबई आहे त्याला महाराष्ट्र चा त्याग च कारणीभूत आहे. मुंबई हा पांढरा हत्ती आहे त्याचा राज्याला खूप मोठा फायदा नाही. खूप मोठा टॅक्स भारत सरकार वसूल करते आणि .हा गुजरात,दक्षिण भारत,महाराष्ट्र ह्यांचा पैसा उर्वरित राज्यांना वाटला जातो. काही ही contribution नाही तरी त्यांना खूप मोठा पैसं मिळतो. ही पद्धत बदलली आणि राज्यातील वसूल होणारा टॅक्स त्याच राज्यांना 60 ते 70 टक्के परत केला तर हा दक्षिण ,पश्चिम भाग .जगातील श्रीमंत देशांची बरोबरी करेल. पण बाकी भागाचे लोढणे गळ्यात असल्या मुळे काही फायदा होत नाही. आज पर्यंत मुंबई मुळे महाराष्ट्र जात्यात होता पण आता.गुजरात,कर्नाटक,केरळ,तमिळ nadu supat आहेत. त्यांना त्याची जाणीव होवू लागली आहे. बंगलोर साठी कर्नाटक लं पण खूप मोठी नैसर्गिक साधन संपत्ती खर्च करावी लागत आहे. आणि फायदा दुरेच घेत आहेत. बंगलोर आणि मुंबई ह्यांच्या समस्या same आहेत. स्थानिक लोकांचे शोषण.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 12:38 नवीन
मुंबई जे आज देशातील सर्वात प्रगत शहर आहे त्याचे श्रेय भारतातील कोणत्याच प्रदेशातील लोक महाराष्ट्र ल देत नाहीत.त्यांच्या मनात खूप प्रचंड तिरस्कार आहे महाराष्ट्र विषयी. कारण मुंबई च्या दर्जा चे शहर उभे करण्याची कुवत देशातील कोणत्याच राज्यात नाही. मुंबई जे आज सर्वात प्रगत शहर आहे त्याचे पूर्ण श्रेय मी तरी ब्रिटिश लोकांनाच देईन. त्यांच्या मुळे मुंबई प्रचंड विकास करू शकली. आणि दुसरे श्रेय महाराष्ट्र ल. महारष्ट्र नी वीज,पाणी,कचरा नियोजन, हे सर्व खूप उत्तम रित्या केले. आणि कायदा सुव्यवस्था महारष्ट्र नी . उत्तम रित्या राखली उद्योगपती,दुकानदार ,व्यापारी तर जगातून पण इथे आले असते. नवी मुंबई तर पूर्ण पने. महारष्ट्र नीच वसवली आहे. भारतातील बाकी राज्यांचा काही संबंध नाही. मुंबई चे वेगळे करून महाराष्ट्र चे भारत सरकार लं देत असलेल्या contribution च हिशोब करा हा युक्तिवाद च अत्यंत चुकीचा आहे. मग अहमदाबाद,गांधी नगर वगळून गुजरात चे टॅक्स collection pan बघा.बंगलोर,वगळून कर्नाटक चे बघा,चेन्नई वगळून तमिळ nadu चे बघा. तरी माझी पूर्ण खात्री आहे मुंबई वगळून बाकी महारष्ट्र चे gst collection he. उत्तरेतील सर्व राज्य. यूपी,बिहार आणि इतर पेक्षा नक्कीच जास्त असेल. उर्वरित महारष्ट्र चे टॅक्स कलेक्शन. पण यूपी,बिहार,mp, rajsthan,ह्यांच्या एकत्रित collection पेक्षा पण जास्त असेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/03/2022 - 19:24 नवीन
मराठमोळे लोक उ.प्र. व बिहारच्या लोकांपेक्षा प्रामाणिक आहेत असे म्हणायचे आहे? महाराष्ट्रातून मुंबई बाजुला केली तर ईतर जिल्हे काय दिवे लावतात ते पाहणे उचित ठरेल. फारतर पुणे. पण ही दोन्ही शहरांच्या विकासामागे राज्यातील तकालिन नेत्रुत्व होतेच पण केंद्रातील तत्कालिन सरकारांचाही वाटा आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 21:13 नवीन
महाराष्ट्र मधून मुंबई वेगळी केली तर खंडर बनेल मुंबई.सर्वांना माहीत आहे म्हणून करत नाहीत .नाही तर कधीच केली असती मुंबई मुलुंड,तुकडे जास्तीत जास्त बोरिवली.मानखुर्द संपली मुंबई. ह्या भागाला पाणी पुरवठा कोण करणार. हे वेगळे राज्य असेल . महारष्ट्र करणार नाही गुजरात करणार नाही .जसा हरियाणा दिल्ली la पाण्यासाठी नाचवत असतो.तसा महाराष्ट्र मुम्बई ला नाचवेल. महाराष्ट्र मध्ये होणारी वीज महारष्ट्र वेगळे राज्य असल्या मुळे मुंबई ल देणार नाही. मुंबई च्या सीमेवर महारष्ट्र च्या चेक पोस्ट असतील . कोणाला काय सवलत द्यायची .ते महारष्ट्र ठरवेल.. २०० करोड चा फ्लॅट ची किंमत २ लाखावर येईल. पुणे दिसले. महाराष्ट्र द्रोही लोकांना. नाशिक दिसत नाही. Maharashtra द्रोही लोकांना. नवी मुंबई दिसत नाही. महाराष्ट्र द्रोही लोकांना. महाराष्ट्र चे सम हवामान दिसत नाही. महाराष्ट्र द्रोही लोकांना. येथील कायदा सुव्यवस्था,महाराष्ट्र चे पुरोगामी पण दिसत नाही. यूपी,बिहार पेक्षा महाराष्ट्र खूप उच्च दर्जा चा आहेच.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 21:26 नवीन
तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा.. मुंबई वरून जे देश पातळीवर राजकारण चालू असते. आणि मुंबई महारष्ट्र मुळे आणि ब्रिटिश लोकांमुळेच प्रगत आहे हे सत्य मान्य केले जात नाही.. तेच same. दक्षिण भारतातील सर्व राज्य जी देशात पण खूप प्रगत आहे..त्यांच्या बाबत पण घडतं आहे. दक्षिण भारतील लोकांच्या सुप्त भावना मराठी लोकांच्या भवणांसारख्याच आहेत.. आम्ही कायदे पाळायचे,आमची शहर,राज्य प्रगत करायची. आणि त्याचा फायदा हक्कानी नको तेच उचलत आहेत. प्रश्न फक्त मुंबई आणि महाराष्ट्र पुरता नाही. तो समुच्य दक्षिण भारताचा पण प्रश्न झाला आहे. देशाचा एक भाग फक्त लोकसंख्या वाढवत आहे..बेरोजगार लोकांची फौज तयार करत आहे. आणि देशाचा दुसरा भाग लोकसंख्या नियंत्रण करत आहे.रोजगार निर्मिती करत आहे. हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 05/04/2022 - 05:47 नवीन
सुनिल, तुला नक्की काय म्हणायचे आहे? मला तुझे प्रतिसाद गिरीश कुबेरांच्या लेखांसारखे दिसत आहेत. त्यांचे लेख कितीहीवेळा वाचले तरी त्यांना काय म्हणायचे असते हे कळत नाही. "देशाचा एक भाग फक्त लोकसंख्या वाढवत आहे." महाराष्ट्राची लोकसंख्या उत्तर प्रदेश खालोखाल आहे. अगदी गेल्या ६० वर्षापासून. मुंबई वरून जे देश पातळीवर राजकारण चालू असते. कोण करते हे ? १०५ हुताम्यांचा विषय नेहमी कोण काढते? असो. मुंबई महारष्ट्र मुळे आणि ब्रिटिश लोकांमुळेच प्रगत आहे हे सत्य मान्य केले जात नाही.. हे कोणी अमान्य केले ? काँग्रेस्/भाजपाच्या कोणत्या नेत्यानी? सुनिल, भारतात आधुनिक शि़क्षण्/रेल्वे/तंत्रज्ञान आले ते ब्रिटिशांमुळेच्, हे जगजाहीर आहे. त्यात अमान्य करण्यासारखे काय ?मुंबई बंदर असल्याने त्यांनी मुंबई/परिसराचा विकास जास्त विकास केला. पुर्वी मुंबईला कोणी नावे ठेवली की मुंबईच्या समर्थनार्थ "बाँबे ईज बाँबे' म्हणायची मुंबईकरांना सवय होती. त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 21:49 नवीन
मुंबई बाजूला केली तर महारष्ट्र काहीच नाही खूप मागास राज्य आहे. असे महाराष्ट्र च तिरस्कार करणारे स्वतच्या आत्म्याला थोडी शांती मिळावी म्हणून बोलत असतात.मग त्या साठी gdp,टॅक्स collection . मुंबई मधूनच जसे राज्यात आहे असे आकडे फेकत असतात जो भारताचा नागरिक नाही अशा व्यक्ती नी भारतावर ह्याच भावनेने कॉमेंट केली तर ती पण . ह्या लोकांना मान्य असावी असे गृहीत धरायला काही हरकत नाही. भारतातील दहा वीस शहर सोडली तर भारतात काही नाही ही शहर वेगळी केली तर भारत हा अतिशय मागास देश आहे. त्या साठी शहरांचे gdp,tax collection ह्याचे पुरावे देतील च. मग ही त्यांची कॉमेंट कशी चुकीची आहे हे दाखवायला हेच मुंबई महाराष्ट्र विषयी बोलणारे काय उत्तर देतील. तेच उत्तर महारष्ट्र चे मुंबई विषयातील कॉमेंट वर असेल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/03/2022 - 22:10 नवीन
कराची,इस्लामाबाद पाकिस्तान पासून वेगळे केले तर पाकिस्तान मध्ये काय आहे. शांघाय चीन पासून वेगळे केले तर चीन मध्ये काहीच दम नाही Newyork, Washington, न्यूजर्सी अमेरिके पासून वेगळे केले तर अमेरिकेत आहेच काय. आणि ह्या साठी. टॅक्स कलेक्शन,त्या शहराचा gdp हे आकडे वापरले जातील आणि सिध्द पण होईल. पण हे सर्व दावे साफ खोटे आहेत. उर्वरित पाकिस्तान नसेल तर कराची, Islamabad पण प्रगत शहर नसेल. उर्वरित चीन नसेल तर शांघाय पण प्रगत शहर राहू शकणार नाही तेच अमेरिका,चीन ,भारत .ह्यांना लागू आहे. आणि तेच राज्यांना पण लागू आहे.कर्नाटक शिवाय बंगलोर काहीच नसेल.महाराष्ट्र शिवाय मुंबई काहीच नसेल.गुजरात शिवाय अहमदाबाद,गांधी नगर काहीच नसेल.तामिळनाडू शिवाय चेन्नई काहीच नसेल.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 05/04/2022 - 00:35 नवीन
मुंबई साहेबाने डेव्हलप केली आणि महाराष्ट्राला मिळाली. इतर मोठी शहरं राजधानी म्हणुनच तयार करण्यात आलि. असो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/04/2022 - 07:48 नवीन
साहेब जाऊन ७५ वर्षे झाली, तरी मुंबऊ नंबर १ ला कशी हो?? अर्धवटराव?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 05/04/2022 - 17:48 नवीन
साहेब मुंबईला त्याच दृष्टीने तयार करत होता. शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटली आणि साहेबांनी अगदी तेव्हापासुन त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं. मुंबईत पोलिस आणि न्यायालय यंत्रणा निर्माण करुन व्यापारी प्रतिष्ठानांना आकर्षीत करणं वगैरे सुधारणा सुरु झाल्या होत्या. मुंबई कुठल्याही स्थानीक राज्याचा भाग नव्हती, त्यामुळे राजकीय उठाव आणि बंडाळींपासुन हे आर्थीक केंद्र सुरक्षीत राखण्याचा उद्देशही होता. उत्तर आणि दक्षीणेपासुन जवळपास समान अंतर असणारं बंदर हि देखील मोठी जमेची बाजु होती. हि साहेबांचं भारतातलं आर्थीक दृष्ट्या सुरक्षीत शहर आपोआपच स्वतंत्र भारताची आर्थीक राजधानी बनलं. पुढे ति महाराष्ट्राने झगडा करुन मिळवली. भारत सरकारला दुसरी एखादी आर्थीक राजधानी वसवण्याची गरज नव्हती आणि ते सहाजीकच होतं. म्हणुन मुंबई साहेब गेल्यानंतर ७५ वर्षानंतरही नंबर १ राहिली.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/04/2022 - 18:50 नवीन
कैच्याकै
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 05/04/2022 - 20:55 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Wed, 05/04/2022 - 08:58 नवीन
मुम्बै जी ब्रिटीशानी विकसीत केली तिथे स्वातन्त्र्यानन्तर फक्त लोन्ढे आले बाहेरुन. असे होउ नये म्हणुन प्रयत्न झाले नाहीत आणि फक्त मत पेट्यान्वर नजर ठेउन मुम्बै मध्ये झोपड्पट्या मात्र वाढवल्या गेल्या.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 05/04/2022 - 09:53 नवीन
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.c3sindia.org/archives/devious-plans-of-china-to-bring-in-the-issue-of-andaman-and-nicobar-islands-ownership-by-by-cmde-r-s-vasan/&ved=2ahUKEwjburDYrMX3AhWXRWwGHb86Dq4QFnoECB0QAQ&usg=AOvVaw1keCSmyZn6Qg24P9LEj9L1 चीन नी जेव्हा अंदमान आणि निकोबार बेटांवर मालकी हक्काचा दावा केला तेव्हा.फक्त स्वार्थ साधण्यासाठी सत्य मान्य केले. मराठी साम्राज्य नी अंदमान निकोबार बेट स्वतःच्या अधिकारात लढून घेतली होती. कान्होजी आंग्रे हे भारतीय नाविक दलाचे आद्य निर्माते आहेत त्यांनी ती बेट पोर्तुगीज आणि dutch ह्यांना हाकलून ताब्यात घेतली होती. म्हणून ही दोन बेट भारतात आहेत. सर्व जग मराठी साम्राज्याचा मोठेपणा मान्य करेल.अगदी पाकिस्तान पण करेल. पण उर्वरित भारत कधीच मान्य करणार नाही. इतका तिरस्कार आहे त्यांना महारष्ट्र च.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/04/2022 - 11:20 नवीन
+१ तसेच काही महाराष्ट्रद्रोही मराठी सुध्दा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/04/2022 - 09:57 नवीन
हा हा हा मजा येतेय =)))) मला तुमच्या राजकारणात अजिबात रस नाही . उगाच भावनिक मुद्दे वापरुन काहीयेक उपयोग होणार नाहीये . म्हणे महाराष्ट्र द्रोही =)))) मुद्दा इतका सरळ सोप्पा आहे की -
मुंबई ह्या एका शहरामुळे जी.डी.पी. , टॅक्स कलेक्शन , इन्टरस्तेट मायग्रेशन वगैरे वर जे जे काही स्टॅटिस्टिकल मॅप्स दिलेले आहेत त्यात महाराष्ट्र आघाडीवर दिसत आहे. महाराष्ट्र वजा मुंबई असे पाहिल्यास चित्र वेगळे असेल . महाराष्ट्र कदाचित कर्नाटक तमिळनाडु सारखे असेल किंव्वा युपी, बिहार सारखे असेल. हु नोज ?
आता ह्यावर व्हॉटअबाऊटरी करणारे तुम्ही शेकडो प्रतिसाद द्या , त्यातुन काहीही साध्य होणार नाहीये . मी वकील नाहीये , मी स्टॅटिस्टिशियन / इकॉनॉमिस्ट आहे, मी माझी हायपॉथेसिस विधाने नंबर्स , इम्पिरिकल डेटा आणि थरो मॅथेमॅटिकल थेअरी च्या सहाय्याने सिध्द करतो , किंव्वा कंजक्चर्स मांडतो. नुसती वादावादी करुन शब्दांच्या वाफा झाडुन विधाने सिध्द करायला आपण काय कोर्टात उभे नाही. =)))) महाराष्ट्र वजा मुंबई ह्याची तुलना अन्य भारतीय राज्यांशी करणारा डेटा मिळाला तर दाखवा. त्यावरुन माझे हायपॉथेसीस खरे ठरले म्हणुन मला आनंद होणार नाहीये की खोटे ठरले म्हणुन मला दु:ख होणार नाही. न्युयॉर्क वि टेक्स्सास वि कॅलिफोर्निया ही तुलना जितक्या अलिप्तपणाने मी करतो तितक्याच अलिप्तपणाने महाराष्ट्र वि युपी/ बिहार ही तुलना करतो. आता ह्या प्रतिसादावर अजुन प्रत्युत्तर म्हणुन तुम्ही खंडीभर प्रतिसाद देऊन मनोरंजन करु शकता किंव्वा सरळ डेटा आणि नंबर देऊन हा सुर्य हा जयद्रथ म्हणत एकदाचे काय ते विधान सिध्द असिध्द करु शकता .
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 05/04/2022 - 10:14 नवीन
कंपन्या जेव्हा आपला विक्रीचे आकडे राज्याप्रमाणे मांडतात त्यात मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे वेगळे दाखवतात. मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे हे पंजाब हरियाणा च्या आसपास असतात, कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा कमीच असतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/04/2022 - 11:24 नवीन
मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे हे पंजाब हरियाणा च्या आसपास असतात, कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा कमीच असतात. तमीळनाडू कर्नाटक बेंगळूरू चेन्नई वगळता पकडताय का?? असं वगळून वगळून पकडलं तर अमेरीका देश महाराष्ट्रापेक्षा गरीबलदाखवता येईल.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 05/04/2022 - 11:31 नवीन
तुमच्या सारख्या महान माणसाला नव्हता हा प्रतिसाद आम्ही महाराष्ट्र द्रोही माफ करा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/04/2022 - 11:37 नवीन
प्रतिसाद कुणालाही द्या. पण येनकेन प्रकारे महाराष्ट्र वाईट असं जे दाखवताय ते थोडं थांबवा.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 05/04/2022 - 12:12 नवीन
राऊत साहेब कोण दाखवतय उगाच मनाचे श्लोक नका बोलू, त्यांनी सांगितल मुंबई सोडून आकडे बघावे लागतील तर मी माझ्या ५ वर्षाच्या अनुभवातून जे माहित आहे ते सांगितल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/04/2022 - 11:42 नवीन
कर्नाटक, तामिळनाडू सुद्धा बेंगलोर चेन्नई सोडून बघावं लागेल खरं.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/04/2022 - 11:45 नवीन
पण तुमचा मुद्दा बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 05/04/2022 - 10:05 नवीन
Mumbai वेगळी झाली तर तर मुंबई पुढे काय अडचणी येतील.महाराष्ट्र तरी मुंबई का पाकिस्तान पेक्षा मोठे शत्रू राष्ट्र असेच समजेल.काहीच सहकार्य करणार नाही.दबाव टाकला तर उद्रेक होईल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 05/04/2022 - 10:10 नवीन
काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर आहे.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 05/04/2022 - 10:10 नवीन
काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर आहे.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा