Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मी : जाणता राजा

च
चौथा कोनाडा
Tue, 04/19/2022 - 14:40
🗣 45 प्रतिसाद
नादखुळा..!! ७१ हजारांच्या स्कूटीसाठी विकत घेतला १५.४ लाखांचा VIP नंबर, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण Vodafone युजर्सचा नंबर बंद केला, आता भरावा लागणार ५० हजारांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण. जाणून घ्या कोण देत आहे ग्राहकांना सुपरफास्ट ४जी इंटरनेट? Airtel, Jio की Vi? वृषभ राशीमध्ये बुध विराजमान, जाणून घ्या कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल हे मार्गक्रमण साबण कोणत्याही रंगाचा असो पण, त्याचा फेस फक्त पांढराच येतो? जाणून घ्या वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या स्वप्नील जोशी-शिल्पा तुळसकरने ‘तू तेव्हा तशी’पूर्वीही केलंय एकत्र काम, साकारलीय चक्क मायलेकाची भूमिका, जाणून घ्या कधी असे "जाणून घ्या" वाले १०- मथळे दररोज वाचले की मी "जाणता राजा" होईन की काय असं वाटायला लागतं !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13042 views

🗣 चर्चा (45)
म
मुक्त विहारि Tue, 04/19/2022 - 15:03 नवीन
नक्कीच, होऊ शकाल.... पण, कुठे मिळते? ते शोधत आहे ...
  • Log in or register to post comments
च
चिक्कु Tue, 04/19/2022 - 15:04 नवीन
अगदी मनातलं बोललात बुवा. पंखा होईन अशाने मी आपला!
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Tue, 04/19/2022 - 15:19 नवीन
लोकसत्ता वाचता काय :)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 04/19/2022 - 16:32 नवीन
अजून जास्त जाणते व्हायचे असेल तर मटा..पत्र नव्हे .त्र वाचा. तुमचे मराठी पण एकदम चांगले होईल. खाली काही निवडक शीर्षके देत आहे. actresses Beauty Tips : माधुरीपासून ऐश्वर्यापर्यंत व मलायकापासून कियारापर्यंत सर्व अभिनेत्रींची ब्युटी सीक्रेट्स झाली उघड, सकाळी सकाळी करतात..! Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीर कपूरच्या लग्नात होती एक आगळीवेगळी खासियत, जी तुम्हीही केली का नोटिस? केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय; गर्मीतही राहतील सिल्की आणि शायनी केस Vastu Tips About Tijori : तिजोरीत या गोष्टी ठेवणे असते शुभ, होते सुख समृद्धी आणि धनवृद्धी
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/19/2022 - 16:34 नवीन
हा हा हा इतकेही तपशिलात लिहीलेले नसते त्या क्लिकबेट हेडलायनीत. ...पर्सची किंमत ऐकून थक्क व्हाल. (आत वीस वेळा काहीतरी क्षुल्लक तपशील रिपिट करुन करुन शेवटी जागतिक रहस्य उलगडावे तशी पर्सची किंमत. इतक्या वातावरणनिर्मितीनंतर ती किंमत तशी किरकोळच निघते. ...उष्ट्या पावासाठी मोजले इतके रुपये..(थेट इंग्रजी टू मराठी वाट्टेल तश्या भाषांतराच्या चिंध्या करुन परदेशातली बातमी) ...अभिनेत्री म्हणाली "माझ्या बेडमधे तो.." (.. अधिक तपशील पाहू जाता काहीतरी फुस्स प्रसंग) जेम्स लेन म्हणाला "पुरंदरेंनी मला.." (वास्तविक त्यांनी काहीही संदर्भ पुरवले नाहीत असं असतं) एकूण काय तर बाहेर गळ टाकलेला आणि आत अत्यंत वेगळे किंवा असंबद्ध किंवा फालतू काहीतरी असते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/19/2022 - 16:38 नवीन
हल्ली मटा आणि लोकसत्ता वाले बहुतेक सामना वाचून झाल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल बघतात असे वाटते
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 04/20/2022 - 07:35 नवीन
म्हातार्यांचा आलडता “तरूण भारत” वाचत असावेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/19/2022 - 16:43 नवीन
https://www.loksatta.com/trending/viral-video-a-person-fell-down-from-10000-feet-unconscious-rescue-operation-was-carried-out-in-the-air-ttg-97-2860659/lite/ बेन पिजन नावाचा व्यक्ती कोसळता कोसळता बेन कबूतर होत गेला. वाचा आणि हास्योपचार घ्या.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/20/2022 - 11:03 नवीन
बेन कबुतर .....
बेन पिजन नावाचा व्यक्ती कोसळता कोसळता बेन कबूतर होत गेला ..

😂

ज्याम हसलो हे वाचून !
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/20/2022 - 12:52 नवीन
मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 04/20/2022 - 12:52 नवीन
मराठी भाषा आणि वाक्यरचना यांचे तर मातृभगिन्यद्वैत केलेले असते ऑनलाइन आवृत्तींमधे. कागदावरील प्रत वाचणे पूर्वीच बंद केले आहे. तिथे अजून टिकून असेल अशी आशा.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 04/19/2022 - 16:52 नवीन
बागुल बुवा चा चुलत भाऊ गुगल बुवा. मोबाईल वर गुगल शोधंत्र उघडले की आसेच मथळे दिसतात.याच बरोबर ऑप्टिकल इलूजन, माकड शोधा,ससे मोजा, पहिल्यांदाच काय दिसले तुमचे व्यक्तीमत्व समजेल वगैरे.काही नाही येडा बनवतात.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Tue, 04/19/2022 - 17:47 नवीन
अजून क्लिकबेटी गमती. आयफोन १२ घ्या अमेझॉन वर फक्त ३५०० ला. (पूर्ण बातमी वाचल्यावर कळते ३५०० हा महिन्याचा हप्ता आहे.) मारुतीची सगळ्यात जास्त अवरेज वाली कार फक्त १.५० लाखात. (ही सेकंड हॅण्ड कार्स विकणारे पोर्टल आहे) हिरो ची सगळ्यात जास्त खपणारी बाईक मिळवा फक्त १५ हजारात. (१५ हजार ही डाऊन पेमेंट रक्कम आहे.) ओप्पो चां १०८ मेगा पिक्सेल नवीन फोन फक्त २२ हजारात. ( त्यावर असलेल्या सगळ्या म्हणजे झाडून सगळ्या ऑफर ची बेरीज करून ती मूळ किमतीत वजा करतात. खरे पाहता त्या सगळ्या ऑफर्स एकाचवेळी कधीही ॲपलिकॅब्ल नसतात.)
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 04/19/2022 - 18:39 नवीन
काल परवा एक बातमी वाचली "अमक्या अमक्या अभिनेत्रीला सेट वर झाली गंभीर दुखापत" जरा खोलात जाउन वाचले तर अभिनेत्री चा अंगठा मुरगाळला होता व नखातुन रक्त आले होते. काय ती गंभीर दुखापत .. मटा यात फार वाहवत गेला आहे हे मात्र खरे ...
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 04/20/2022 - 08:33 नवीन
😀 बातमीदारीचा दर्जा खालावत चाललाय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/20/2022 - 09:41 नवीन
त्यामुळे आता फक्त बातम्या वाचायच्या, अग्रलेख म्हणजे एक प्रकारची पक्षीय धोरणेच असतात .... समुद्रात बुडत असलेली Enron आणि संजय दत्त, यांच्या वरती लिहून आलेले पक्षीय अग्रलेख, नंतर जादूने बदलल्या गेले.... अग्रलेख वाचून, मते बनवणे, मी तरी कधीच सोडून दिले आहे .... गडया आपली, एक रूपयाची झुणकाभाकर गेली आणि जलेबी-फाफडा पोस्टरवर आले ....
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 04/20/2022 - 14:00 नवीन
पाहिलात का ह्या अभिनेत्रीचा 'हॉट' अंदाज या अभिनेत्रीचा नवरा करतोय ह्या अभिनेत्रीला... या अभिनेत्याची बायको इतकी सुंदर आहे, जाणून व्हाल थक्क
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/21/2022 - 14:28 नवीन
जाणून व्हाल थक्क
हा "जाणून व्हाल थक्क" प्रकार भारी अस्सतो, बातमी उघडून वाचली की हसावं की रडावं ते कळत नाही !
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 04/21/2022 - 14:31 नवीन
बातमी उघडून वाचली की हसावं की रडावं ते कळत नाही !
दोन्हीपैकी काय करावं हेच कळत नाही म्हणजेच तुम्ही थक्क झालेले असता.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 06/02/2022 - 17:01 नवीन
आणखी एक थक्क .... ही २४ वर्षीय तरुणी स्वतःशीच करतीये लग्न; कारण वाचून थक्क व्हाल
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 04/20/2022 - 14:10 नवीन
सगळ्या ऑनलाईन पेप्रात असल्याच फाल्तू हेडलाइन्स आणि बातम्या असतात. सगळे ऑनलाईन बातमीदार एकाच युनिव्हर्सिटीतून शि़कून आलेत की काय अशी शंका येते. कधी कधी मराठीचा असा चुथडा करतात , वाक्यरचना इतकी भयानक किंवा अर्थहीन असते की उगाचच बातमीवर टीचकी मारली असे वाटते. उदा. काल एका बातमीचा मथळा होता, लिना चंदावरकर यांनी किशोरकुमार यांना पहिल्यांदा दिला होता नकार.जाणुन घ्या कारण. मथळा वाचतानाच असे वाटते कि लिहावे आम्हाला नाही घ्यायचं कारण जाणून, झक मार तुझी तू :-) तर त्या बातमीत लिहिले होते, वडीलांनी तिचा त्रास सांगितला म्हणुन घर सोडायचा निर्णय घेतला आणि किशोर कुमारांना होकार कळविला . तिचा त्रास सांगितला म्हणजे काय? धन्य तो बातमीदार !! चौ को, तुम्ही जाणते राजे झाल्यावर तुमची पण एक ई आवृत्ती काढा. आणि हेडलाईन द्या, मिपावर घमासान, जाणुन घ्या. आणि आतमध्ये काहीतरी फुसका मजकूर टाका :-)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 04/21/2022 - 14:27 नवीन
तुम्ही जाणते राजे झाल्यावर तुमची पण एक ई आवृत्ती काढा. आणि हेडलाईन द्या, मिपावर घमासान, जाणुन घ्या. आणि आतमध्ये काहीतरी फुसका मजकूर टाका :-)

😜

भारी आयडिया .....
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 04/22/2022 - 02:30 नवीन
भन्नाट विनोद, भन्नाट आयडिया, भन्नाट गुपित, भन्नाट अजून काहीतरी... एकेकाळी, "भन्नाट रानवारा" हे गाणं ऐकायला आवडायचं पण असल्या इ आवृत्त्यांमुळे भन्नाट या शब्दाचाच आजकाल तिटकारा येतो.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 04/22/2022 - 11:24 नवीन
जसा की सामुहिक ऐकुन.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Fri, 04/22/2022 - 05:56 नवीन
बातमीपेक्षा कमेंट वाचत जा भारी करमणूक असते.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/26/2022 - 07:50 नवीन
मी आता मिपावरील प्रत्येक नवीन पोस्टच्या खाली कॉमेंट लिहिणार: "हा भन्नाट लेख वाचलात का? वाचकांच्या पडतायत उड्या..! जाणून घ्या.." आणि पुढे माझ्या जुन्याजुन्या पोस्टींचे दुवे डकवणार.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/26/2022 - 10:00 नवीन
सासऱ्यांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी फॉलो करा या ६ टिप्स, नातं अधिक खुलेल https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/6-tips-how-to-develop-special-bond-with-father-in-law/articleshow/91042864.cms कालच् महाराष्ट्र टाइम्स ला ही "बातमी" वाचुन बेक्कर हदरलो होतो =))))
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/29/2022 - 19:09 नवीन
खतरनाकच आहे राव !

😫

  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 04/26/2022 - 10:45 नवीन
चौको हाहाहा लै भारी
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 04/26/2022 - 10:46 नवीन
मार्कस मीही ते वाचलं अन उडालो हादरलो अगदी सहमत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 04/26/2022 - 10:52 नवीन
हे काय कमी आहे ?
सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, आयुष्य खूप अवघड होईल!
अरे बापरे ! काय खरं नाही आयुष्याचं .....
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/29/2022 - 16:08 नवीन
हे ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०८ पर्यंत राहील. सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये कारण यावेळी बाहेर पडणारी हानिकारक किरणे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. आणि हा लेख लोकसत्तेत आला आहे. अरे कुठे नेऊन ठेवला आहे आपला शा फु आ चा महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 04/29/2022 - 20:11 नवीन
लोकसत्ता वाले तर दारु / गांजा मारुन बातम्या लिहिता की काय असा मला नेहेमी संशय येतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 04/29/2022 - 20:34 नवीन
आजची कचरा टाईम्समधील बातमी - मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, भारताचा मॅचविनर गोलंदाज नवव्या सामन्यासाठी मैदानात उतरणार बातमीत नाव आहे धवल कुलकर्णी या गोलंदाचाचे. हा अतिसामान्य गोलंदाज भारतासाठी फक्त १२ एकदिवसीय व २ ट-२० सामने खेळला व तो एकाही सामन्यात मॅन ऑफ द मॅच नव्हता. १२ एकदिवसीय सामन्यात त्याने जेमतेम १४ फलंदाज बाद केलेत. भारतासाठी तो शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला. ज्याला संघात फारच क्वचित स्थान मिळाले व मिळालेल्या सामन्यात ज्याची कामगिरी सर्वसाधारण आहे तो भारताचा मॅचविनर कधी झाला? https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/good-news-for-mumbai-indians-indias-matchwinner-bowler-to-play-for-ninth-match-against-rajasthan-royals/articleshow/91179849.cms
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 05/01/2022 - 09:48 नवीन
केवढी ती उत्सुकता ताणलीय ... म्हणे .. भारताचा हा मॅचविनर गोलंदाज आहे तरी कोण, पाहा...

😄

  • Log in or register to post comments
अ
अमीबा Fri, 04/29/2022 - 21:02 नवीन
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना रोजच्या कामांच्या प्रगतीसाठी JIRA हे सॉफ्टवेअर अगदीच ओळखीचे असेल. ट्विटरवर एक धागा JIRA clickbait titles बद्दल: https://twitter.com/amdev/status/1499374242755919878 एन्जॉय :)
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 06/21/2022 - 02:21 नवीन
कसला भारी आहे आहे हे! हसवल्याबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 06/14/2022 - 03:29 नवीन
https://www.loksatta.com/auto/second-hand-maruti-alto-in-70-thousand-know-complete-details-of-car-and-offer-prp-93-2972217/ २००८ मॉडेल : ७० हजार २००९ मॉडेल : ८५ हजार .. आम्ही २०२१ - २०२२ चे मॉडेल बघत होतो .. फुगा फुटला ...
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sun, 06/19/2022 - 19:34 नवीन
परवा एका संकेतस्थळावर "अमक्या तमक्या नटीला बेडरूममध्ये 'हे' करायला आवडते... असा हिट अँड हॉट मथळा होता. मी अतीव उत्कंठेने प्रवेश केला व 'जाणून घेतले'. तिथे '..वाचन करायला आवडते' असे लिहिले होते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/20/2022 - 16:51 नवीन
... आणि हे पण .. महिलांच्या शरीराच्या `या` भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 06/20/2022 - 02:44 नवीन
जाणून घ्या काय प्लान आहे आणि कोण तो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/20/2022 - 16:45 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/20/2022 - 16:45 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 06/20/2022 - 16:48 नवीन
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 06/21/2022 - 02:29 नवीन
होते आहे ऑनलाईन बातम्यात फसवणूक, जाणून घ्या कशी! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा