Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हसरे चेहरे

क
कर्नलतपस्वी
Fri, 04/15/2022 - 10:03
💬 2 प्रतिसाद
जीवनात कितीतरी लोक येतात,जातात.काही आठवणीत रहातात काहींचे विस्मरण होते.काहीच बोटावर मोजण्याइतपत व्यक्ती की ज्या चटका लावून जातात.त्यातील काही खुपच महत्वाच्या तर काही अगदीच नगण्य. माणसाच्या स्वभावावर बरेच काही अवलंबून आसते.आशीच आमच्या सोसायटीतील कचरा उचलणारी बाई.कधीच गैरहजर नाही.दुर्मुखलेला,केविलवाणा चेहरा स्वताच्या गरिबीचे रडगाणे कधीच नाही. वेळ ठरलेली,अशिक्षित,एकदाच घंटी वाजवणार,दार उघडताच सुहास्य मुद्रेने "गुडमॉर्निंग "'जरूर म्हणणार. दिवाळी होळीत "पोस्त ",द्या म्हणून हात पसरलेला कधी आठवत नाही."आजी कशा आहात,ऐ छोटी तुझी बाहुली मला देतेस का", म्हणून प्रत्येकाची चौकशी जरूर करणार.करोना मधे विषेश विचारपूस आणी वृद्ध दाम्पत्यांना लागेल तशी व जमेल तशी मदत केली.आज अचानक बातमी आली की तीने आत्महात्या केली.सर्व सोसायटी हळहळली. तीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर आला.तशी घरची गरीबी पण हसतमुख म्हणून सगळे चांगले नसले तरी ठीकच असणार आसा समज.आता परत दिसणार नाही. ती रोज येत होती लेवून वस्त्रे विस्तवांची कळली कुणास नाही धग त्या अग्निशिखांची नव्हते कुणास ठावे रहस्य प्रसन्न मुखड्याचे कळले कुणास नाही त्या मागले गुपित दुखड्याचे रोजची सकाळ आली टळली वाट तीच्या येण्याची बधीर सर्व झाले ऐकुन वार्ता तीच्या निधनाची संपविला अचानक खेळ तीनेच आपल्या जीवाचा तेव्हां खरा कळाला भेद हसर्‍या प्रसन्न मुखड्याचा होती जरी ती नगण्य पण गरीब ,नेक ,स्वाभिमानी घेऊनी कचरा घरा घरातून सुहास्य पेरून जात होती १५-४-२०२२ भावपूर्ण श्रद्धांजली.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2100 views

💬 प्रतिसाद (2)
भ
भागो Fri, 04/15/2022 - 18:20 नवीन
चटका लावणारा लेख. कविताही तशीच. लोक अशी धाडकन आत्महत्त्या का करतात सगळे मायेचे पाश तोडून. अवघड आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/15/2022 - 19:41 नवीन
अरेरे ...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 20 hours ago
  • सुंदर !!
    3 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा