जे न देखे रवी... प्रवास अ — अनन्त्_यात्री, Mon, 03/28/2022 - 08:30 अथांगाचा तळठाव अज्ञेयाचा पैलतीर विराटाची पराकाष्ठा सूक्ष्मातील शून्याभास खुणावती ऐसे सारे क्षणोक्षणी अविरत जरी जटिल तरीही जीवा लावतात ध्यास नादावतो या ध्यासाने ठेचाळतो जागोजाग असे खडतर तरी भूल घाली हा प्रवास वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments908 views 💬 प्रतिसाद