मुखवटे.
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे
थांग लागेच ना मन किती गहिरे
व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे
सभ्य वेषात या नांदती चोर हे
दान देण्या निघे अन जगाला लुटे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
शब्द फुलापरी मनी निखारा जळे
वेष संतापरी हृदयी विषारी तळे
लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे
चेहर्यावर इथे मुखवटे... मुखवटे.
💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी
Tue, 03/15/2022 - 14:52
नवीन
आवडली.याला जीवन ऐसे नाव
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Tue, 03/15/2022 - 15:10
नवीन
मस्त.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 03/15/2022 - 15:14
नवीन
कविता आवडली.
सं - दी - प
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/16/2022 - 04:02
नवीन
उत्तम रचना, आवडली. लिहिते राहा.
अगदी वास्तव.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
D
Deepak Pawar
Wed, 03/16/2022 - 05:49
नवीन
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
दीपक पवार.
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 03/16/2022 - 11:56
नवीन
आवडली कविता. पुलेशु.
खूप दिवसांनी साव हा शब्द आला वाचण्यात. :-)
- Log in or register to post comments
D
Deepak Pawar
गुरुवार, 03/17/2022 - 05:37
नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
दीपक पवार.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 03/17/2022 - 07:39
नवीन
सध्याच्या फेसबुक व्हॉट्सप ट्विटर आणि इन्स्टाच्या काळात हे मुखवटे जास्तच अभेद्य आणि चेहर्याला घट्ट चिकटणारे झाले आहेत. इतके की ते जर ओढून काढायचे म्हटले तर खरा चेहराच फाटून भेसुर होईल.
एकाच वेळी अनेक मुखवटे घालण्याची सुध्दा आजकाल मोठी फॅशन आलेली आहे.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
D
Deepak Pawar
Fri, 03/18/2022 - 06:06
नवीन
मनःपूर्वक आभार.
दीपक पवार.
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Sat, 03/19/2022 - 08:03
नवीन
खूप छान!
प्रत्येकजण सभोवतालच्या समाजाने ठरवून दिलेले मुखवटे घालूनच जगत असतो.
- Log in or register to post comments
D
Deepak Pawar
Mon, 03/21/2022 - 05:40
नवीन
मनःपूर्वक धन्यवाद.
दीपक पवार.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Sat, 03/19/2022 - 15:08
नवीन
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे
शिवीगाळ न चिखल, फेकती मारके
रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे
चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे
- Log in or register to post comments
D
Deepak Pawar
Mon, 03/21/2022 - 05:41
नवीन
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे
शिवीगाळ न चिखल, फेकती मारके
रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे
चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे
छान....
- Log in or register to post comments