Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आनंदी आनंद गडे........मेट्रू

क — कर्नलतपस्वी, Sat, 03/12/2022 - 05:16
बालकवी म्या पामरला क्षमा करा आनंदी आनंद गडे मेट्रू धावे चोहीकडे क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड क्षणात पोहचे कोथुरुडे आनंदी आनंद गडे डोलत लतीका गंधवती मेट्रु स्टाफ लगबगती नटली संध्या प्रेमाने कुमद ही हसते आहे सनई चौघडे , हार तुरे झगमग लगबग चोहीकडे आनंदी आनंद गडे नरमुंड रूंड पाहूनी मनी चितंले, प्राणनाथ धावले भान हरले(पुणेकरांचे), गान स्फुरले आनंदी आनंद गडे नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला खुशीत हसला उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या) आनंदी आनंद गडे वाहति रस्ते संथगती, विहरती दुचाकी तिव्रगती द्विपाद,चतुष्पाद भ्रमती मोदभरे कमल विकसले, कोण आकसले डोलत वदती (पुणेकर) इकडे,तिकडे, चोहिकडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे मेट्रू धावे चोहीकडे क्षणात पिपंरी क्षणात.......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5490 views

💬 प्रतिसाद
ध
धर्मराजमुटके Sat, 03/12/2022 - 05:30 नवीन
एकंदरीत मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यामुळे पुणेकरांना फारच आनंद झालेला दिसतोय. अजि म्या ब्रह्म पाहिले चा अनुभव याची देही याच डोळा अनुभवल्याचा आनंद काही वेगळाच असावा.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 03/12/2022 - 05:49 नवीन
सध्या तरी जेमतेम पाच किलोमीटर अंतरासाठी असणारी मेट्रो हौसेखातर प्रवास करणाऱ्यांकडून वापरली जात आहे. अणि या एवढ्याश्या प्रवासी संख्येमुळे देखील पार्किंगची कमतरता जाणवयला लागली आहे. खरा वनाझ पासून प्रवास करणारा मजूर वर्ग येऊन जाऊन ४० रुपयात येरवड्याच्या मजूर धक्क्याला जातो. तो त्याचा प्रवास खर्च दुप्पट करणार नाही मेट्रो साठी. राहता राहिला विमान नगरच्या ऑफिसेस मध्ये जाणारा कर्मचारी वर्ग. तो कितपत पायी जाण्याची तयारी ठेवतो त्यावर मेट्रोचा वापर अवलंबून आहे. त्याने मेट्रोला पसंती दिली नाही तर मेट्रो पांढरा हत्ती होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 03/12/2022 - 06:05 नवीन
पाहा पाहा कसा आनंद भरून राहिला चहुकडे. एरंडवनी जाणार. गधवंती दुरुस्त करा हो. (गंधवती - सेंट मारलेल्या महिला म्हणायचय का?) बाकी कविता फारच आवडली. त्याला नाद आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 03/12/2022 - 06:30 नवीन
कंजूस ...चूक मान्य, आपण घेतलेला अर्थ बरोबर आहे. 2010 मधे पुरानी दिल्ली ते हवाईअडूडा तीन तास लागायचे. मेट्रो मुळे हेच आतंर २६ मी.झाले. सीमेवरून येणाऱ्या सैनिकांची चांगली सोय झाली. पाढंरा हत्ती सुरवातीलाच पुढे चांगलाच फायदा होईल. धर्मराज, टोबी सर धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 03/12/2022 - 17:04 नवीन
आता राजकारण चर्चा धागेच वाढतात.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 03/12/2022 - 17:17 नवीन
चाट,पाणीपुरी स्टॉलवर नेहमीच गर्दी असते.राजकारण हा विषय पण असाच आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 03/12/2022 - 17:26 नवीन
सेवानिवृत्त आहे, जुने धागे काढून वाचतोय. फार सुंदर लेख, कवीता,भटकंती इ. .आता जागतीक घडामोडींवर सर्व नजर ठेवून आसतात. इथे मतभिन्नता आसल्या मुळे धागा हालता राहातो.तसे बाकी ठिकाणी नाही.. असो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/13/2022 - 08:27 नवीन
हीच तर मिपाची खासीयत आहे .... वैचारिक मतभेद हवेतच... सुदृढ लोकशाही, मतभिन्नतेवरच आधारित असते... वैचारिक मतभेद असलेले कितीतरी मिपाकर, ऐनवेळी व्यक्तीगत पातळीवर, एकमेकांना मदत करतातच करतात... निदान मला तरी, व्यक्तीगत पातळीवर, मिपाकरांचा हाच अनुभव आला.... अडलेल्या मिपाकराला, मिपाकर हमखास मदत करतात..
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Sun, 03/13/2022 - 04:19 नवीन
कविता आवडली. निवडणुका होऊन गेल्या आहेत नाहीतर "उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या)" यातून अनेक अर्थ निघु शकले असते.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 03/13/2022 - 04:26 नवीन
ज्या की रही भावना जैसी प्रभू मुरत तिन देखी तैसी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 03/13/2022 - 05:01 नवीन
मस्त कविता आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/13/2022 - 07:47 नवीन
व्वा, मस्तच ! मेट्रु विडंबन छान जमले आहे !
नरेंद्र बसला,देवेंद्र ही बसला खुशीत हसला उधो धावे खिडकी कडे (तिकीटाच्या) आनंदी आनंद गडे
हा हा हा .... भारी ! Image removed. "क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड" असे आमच्या वाडीचे उल्लेख वाचून गहिईवरून आले !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/13/2022 - 08:27 नवीन
कविता आवडली...
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 03/13/2022 - 09:23 नवीन
पुणे मेट्रो मधून प्रवास करण्यार्‍या पुणेकरांचे व्हिडीओ. मेट्रोतील प्रवास प्रवाशांना गारेगार अनुभव देतो तर ह्या चित्रफिती आपल्या मनास आनंद देतील. दुवा १ दुवा २ दुवा ३ दुवा क्र. ४ दुवा क्र. ५
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sun, 03/13/2022 - 12:28 नवीन
मेट्रुच्या फेसबुक पेजवर पाम्पलेट करुन लावायला हवी ही कविता.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 03/18/2022 - 16:28 नवीन
मस्त आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा