Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

पुणे महामेट्रो

ख
खेडूत
Sat, 03/05/2022 - 13:19
🗣 57 प्रतिसाद
पुणे महामेट्रो: पुणे मेट्रोचा इतिहास ती सुरु होण्या आधीच बराच मोठा झाला आहे. म्हणजे मेट्रो खूप वर्षे चालू आहे असं काही नाही, चर्चेचा इतिहास आहे म्हणूया फार तर.. अनेक शहरांत मेट्रोची चर्चाही नव्हती, (जसे जयपूर, नागपूर).. तिथे मेट्रो मंजूर होऊन प्रत्यक्ष पळू लागली. पुण्यात मात्र ती जमिनीखालून की वरून, मार्ग कुठले असावेत इतकेच नाही तर मेट्रोचे आणि स्थानकांची नावं काय असावीत असली चर्चा करत म्हणजे टाळाटाळ करत दहा वर्षे कशी गेली कळलेही नाही. तोपर्यंत चार हजार कोटीचे मूळचे अंदाजपत्रक बारा हजार कोटीपार गेले! इथं कुणाला पडलंय त्यांचं? आम्ही करदाते आहोत कर भरायला आणि केंद्र आणि जागतिक बँक देईल पैसे नाहीतर जातील अजून दहा वर्षे! असा विचार इथले सगळेच पक्ष करतात असे दिसते.  सुरुवातीला बीआरटी मार्ग, सिमेंट रस्ते हे महान प्रकल्प २००० ते २०१२ पर्यंत कंटाळवाणे होईतो लांबले होते आणि लोकांना त्याचा उपयोग किती हा अनाकलनीय विषय होता! कलकत्ता मेट्रो १९९२ साली पहिल्यांदा पाहिली होती त्यावेळी महाराष्ट्रात, मुंबईत अशी होईल का? असं वाटलं होतं- पुढे अनेक वर्षांनी ती झाली सुद्धा. पण पुण्यात मेट्रो असावी असं वाटलं नव्हतं कारण पुणे तेव्हा फारच लहान शहर होते.  गेल्या दशकात लंडन अंडरग्राउंडचा मनसोक्त प्रवास करताना मात्र पुण्यात अशी सोया हवी असं प्रथमच वाटलं!आता पुण्यात काही मार्गांवर मेट्रो सुरू होते आहे. पुण्यात मेट्रो कशाला पाहिजे ..कोण जाणार त्यातून  काय माहीत...पासून मेट्रोत पुणेरी पाट्या कश्या असतील हे सगळे विषय चघळून पुणेकर कंटाळले आणि मेट्रोला विसरूनही गेले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या म्हणजे सहा मार्चला औपचारिक उदघाटन होऊन काही मार्गांवर मेट्रो पळू लागेल याचा पुणेकर म्हणून आनंद आहेच.    जालावर महामेट्रोची थोडी माहिती मिळते, ती अशी:  (प्रत्यक्ष तपशील मधल्या दोन वर्षात बदलले असू शकतात) पुणे मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत आहे. मार्च २०१८ पर्यंत या प्रकल्पात तीन मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे, ज्यांची एकूण लांबी ५४.५८ किमी असेल.  मार्गिका क्र. १ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट अशी असेल. १६.५९ किमी लांबीची ही मार्गिका पिंपरीपासून रेंज हिल्सपर्यंत उन्नत व तिथून स्वारगटेपर्यंत भूमिगत मार्गाने धावेल.  मार्गिका क्र. २ ही पूर्णतः उन्नत असून पौड रस्ता, कोथरूड येथील वनाझला नगररस्त्यावरील १४.६६ किमी अंतरावर असलेल्या रामवाडीशी जोडेल.या दोन्ही मार्गिका २०२१ मध्ये नागरिकांसाठी खुल्या होण्याचे अपेक्षित आहे. (जी उद्या अंशतः सुरु होईल) मार्गिका क्र. ३ ही हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क ते शिवाजीनगर अशी २३.३३ किमी लांबीची उन्नत मार्गिका असेल. शिवाजीनगर न्यायालय येथे बांधण्यात येणार्‍या स्थानकावर तिन्ही मार्गिका एकमेकींशी जोडल्या जातील. मेट्रोच्या तीनही मार्गिका, वाहनतळे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस व बीआरटीसेवेसाठी एकत्रीकृत भाडे आकारणी व्यवस्था प्रस्थापित करण्यात येणार आहे, तथापि प्रत्यक्ष भाडे वापरल्या जाणार्‍या सेवेवर अवलंबून असेल. ह्या व्यवस्थेअंतर्गत पीएमपीद्वारे सध्या वापरात असलेल्या 'मी कार्ड'चा रोकडविरहित व्यवहारासाठी उपयोग करण्यात येईल. मेट्रोचे भाडे सुरुवातीस वीस, चाळीस आणि  साठ रुपये अश्या टप्प्यात भाडे असेल असं वाचलं होतं. म्हणजे कोथरूडहून वल्लभनगरला जायला वीस मिनिटात चाळीस ते साठ रुपये आणि शिवाजीनगरला एक गाडी बदलणे हे स्वतः गाडी चालवत पन्नास मिनिटं जाण्यापेक्षा मला बरेच आहे. मात्र दोन्ही बाजूस काही अंतर चालावे लागेल. तसेच हातात वजनदार बॅग वगैरे नसेल तरच हे सोयीचं वाटेल. पूर्वी वाचलेल्या अहवाला नुसार दिवसभरात ७५ फेर्‍या दोन्हीकडून आणि सर्वाधिक ५००० लोक ताशी प्रवास करतील अश्या अन्दाजाने हे मर्ग आणि स्थानके बनवली आहेत. त्यासाठी त्यांनी तासाला एकेका खन्डात प्रत्यक्ष दुचाकी, रिक्षाआणि चारचाकी मोजल्या होत्या! २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्गिका १ व २ चे भूमिपूजन करण्यात आले. ३१.२५ किमी लांबीच्या या दोन मार्गिका उभारण्यासाठी नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन या कंपनीची फेररचना करून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) या केंद्र व राज्य शासनांची ५०:५० भागीदारी असलेल्या कंपनीची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पासाठी ११,५२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता तो अजून वाढला आहे.  मार्गिका क्र. ३ ला केंद्र व राज्य शासनांची मान्यता मिळाली आहे. ही मार्गिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारण्यात येणार आहे. ह्या मार्गिकेसाठी ₹ ८,३३३ कोटी इतका खर्च अपेक्षित असून, केंद्र शासनाने ₹ १,३०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे तर राज्य शासनाकडून ₹ ८१२ कोटींचा निधी अपेक्षित आहे. पीएमआरडीए, केंद्र शासन व राज्य शासन मिळून प्रकल्पासाठी आवश्यक ४०% निधी उपलब्ध करतील तर उर्वरित ६०% निधी खासगी गुंतवणूकदाराकडून उभारण्यात येईल. पीएमआरडीए तर्फे मार्च २०१८ मध्ये मार्गिका ३ साठी निविदा मागविण्यात आल्या. या कामाचे कंत्राट टाटा रिअल्टी-सिमेन्स यांना देणार आहेत. प्रत्यक्ष काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू होण्या ऐवजी जून  २०२० मध्ये सुरु झाले आहे. यावरून काही मुद्दे मनात आले, ते असे:  १. आजवर पुण्याच्या विस्कळीत वहातुकीवर ठोस उपाय न करता केवळ अल्टरनेट रस्ते एकदिशा (वन वे ) करणे आणि नदीवर दरसाल नवे नवे पूल बांधणे, इतकंच काम गेली तीस वर्षे सुरु होतं. वाढत्या पुण्याला मेट्रोमुळे दिलासा मिळावा ही अपेक्षा आहे. तुलनेत पिंपरी चिंचवड चांगले विकसित झाले.  २. १९९२ आणि २०१० च्या राष्ट्रीय स्पर्धा होत असताना ही वहातुक सुधारणेची संधी दवडली गेली होती त्यात काही बदल होईल आणि पुढे अजून काही मार्ग या प्रकल्पाला जोडले जातील.   ३. या निमित्ताने वाढलेल्या FSI चा फायदा विकसक म्हणजे पर्यायाने राजकीय लोक घेतील. हे होत असताना दाट वस्तीत अंतर्गत वहातूक सुरळीत ठेवणे हे नवे आव्हान असेल.    ४. यातून नव्या व्यवसाय संधी आणि नोकऱ्या निर्माण होऊन अन्य काही शहरात मेट्रो सुरु होतील.   ५. ऐतिहासिक वास्तू जवळ बांधकामाचे नियम कठोर असल्याने शनिवारवाडा परिसरात अवाढव्य यंत्रे आणून जमिनीखालून आणि नदीखालून केलेला बोगदा हा यातला एक कठीण टप्पा असावा. या अनुभवाचा उपयोग अन्य प्रकल्पात होऊ शकेल.  ६. पुढे चांदणी चौक मेट्रोने जोडला जाणार आहे  त्याचा फायदा होईल,  मात्र आधीच ते नियोजन असायला हवे होते. सध्या केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी पुढाकार घेत तिथे उत्तम सुविधा निर्माण केलेली दिसते.  ७. दुचाकी आणि रिक्षा हे बेशिस्त आणि मोठ्या संख्येने असल्यामुळे वहातुकीवर ताण आहे असे मानले जात होते. त्यात आता फरक पडेल काय?   बाकी राजकारण वगैरे सुरु राहीलच, पण नागरिक म्हणून आपल्याला एक नवी सुविधा मिळेल याचा आनंद आहे. महामेट्रो टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा! संदर्भ:महामेट्रो संस्थळ  मार्गिका आणि तपशील  एक महिन्यापूर्वीचा हा सुंदर व्हिडीओ 

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17947 views

🗣 चर्चा (57)
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 03/10/2022 - 18:04 नवीन
पण तिथे शिस्त असते! इंग्रजी V आकारात दारासमोर जागा मोकळी सोडतात आणि आतले उतरले की मगच ओळीने बाहेरचे आत जातात. आपल्याकडे हे कठीण असले तरी अशक्य नाही, आपण प्रशासनाला सूचना करत राहिले पाहिजे. पण सुरुवात तर चांगली झाली आहे.
कठीण नाही आणि अशक्य पण नाही. इथं मुंबईत लोकल ट्रेनला धक्काबुक्की करत चढणारे पब्लिक मेट्रोच्या प्रवासात बर्‍यापैकी चड्डीत राहतं. त्यातून पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते स्वयंभू आहेत. मात्र शिस्त पहिल्या दिवसापासून लावली तरच शक्य आहे. कुत्र्याचे शेपुट जन्मापासूनच नळकांड्यात घातले तर सरळ होईल. वाकडे वळण पडले की नंतर सरळ होणे कठीण :) मेट्रोच्या गारेगार प्रवासाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/10/2022 - 18:19 नवीन
त्यातून पुणेकरांचे काही सांगता येत नाही. ते स्वयंभू आहेत.
_/\_
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 03/10/2022 - 18:23 नवीन
मेट्रो ही पूर्ण राज्य सरकार च्या अधिकारात असावी ही मागणी कर्नाटक नी केली होती. बंगलोर मेट्रो ही बहुतेक राज्य सरकार च्या अधिकारात आहे पुणे मेट्रो मध्ये केंद्र आणि राज्य सरकार ह्यांचा ५० टक्के हिस्सा आहे. पण नोकर भरतो आणि नियोजन ह्या वर राज्य सरकार चेच नियंत्रण असणे गरजेचे आहे होणाऱ्या प्रॉफिट मध्ये ५० टक्के हिस्सा त्यांच्या शेअर नुसार देण्यात काही हरकत नाही. पण नियंत्रण आणि अधिकार हा राज्याचा च हवा. कर्नाटक नी ती मागणी करायचे daring दाखवले होते महाराष्ट्र नी पण दाखवावे. स्वलंबी राज्य खूप महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 03/10/2022 - 19:05 नवीन
नाही. पुण्यासारखेच बंगळूरु मेट्रो केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. नोकर भरतीवर राज्यसरकारचे नियंत्रण नाही तेच बरे, नाहीतर फालतू लोकांची भरती आणि घोटाळेच उपक्रम तोट्यात आणायला पुरेसे होतील. नोकर भरती आणि सर्व खरेदी पारदर्शक आणि विश्वासार्ह असायलाच हवी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/10/2022 - 16:02 नवीन
आता ते दिवाणखाना/ समोरच्या खोल्या अधिक सजवतील. भिंतीवर मोठी चित्रे लावतील. फर्निचर बदलतील. गुढ्या मोठ्या लावतील. बघणीय गोष्टी पुढे ठेवतील.
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 03/10/2022 - 22:23 नवीन
'पुणे मेट्रो' ला हेच बघायचं राहील होत https://www.facebook.com/MarathiMajja/posts/2092514844234962
  • Log in or register to post comments
प
पराग१२२६३ Mon, 03/14/2022 - 15:37 नवीन
आजच पुणे मेट्रोतून पहिला प्रवास केला. मेट्रोनं याआधी दिल्ली आणि मुंबईत प्रवास केलेला होता. पण आतुरतेनं वाट पाहिलेल्या मेट्रोतून केलेला हा प्रवास होता.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा