Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मराठी भाषा गौरव दिन २०२२ : आढावा

ह
हेमंतकुमार
Tue, 03/01/2022 - 17:01
🗣 0 प्रतिसाद
ok नुकताच महाराष्ट्र राज्य पातळीवर मराठी भाषा गौरव दिन २०२२ साजरा झाला. त्या निमित्ताने अनेक पातळ्यांवर विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले होते. त्या सर्वांचे संकलन करण्यासाठी हा धागा. काही उपक्रम शासकीय पातळीवरील होते. काही प्रत्यक्ष समारंभाद्वारा साजरे झाले तर अन्य काही वृत्तपत्रे, दृक्श्राव्य माध्यमांतून आणि मराठी संकेतस्थळांवर साजरे झाले. माझ्या माहितीतील अशा उपक्रमांची नोंद करीत आहे. वाचकांनी या व्यतिरिक्त त्यांना माहीत असलेल्या उपक्रमांची जरूर भर घालावी. * पुणे आकाशवाणीवर मराठी भाषा दिनानिमित्त एक सुरेख परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन केले होते वंदना बोकील-कुलकर्णी यांनी. काही प्राध्यापकांचा यात समावेश होता. सुरेख चर्चा झाली. चांगल्या मराठीचा (बोलणे/लिहिणे) प्रसार होण्यासाठी प्रत्येक मराठी भाषकाने आपापल्या परीने काय करावे यावर त्यात उहापोह झाला. बोकील यांनी, त्यांनी आयोजित केलेल्या एका चांगल्या उपक्रमाचा उल्लेख केला. त्याचे नाव चांदण्यातील गप्पा असे होते. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांसाठी तो उपक्रम होता. त्यात मराठीच्या विविध पैलूंचा मुलांना परिचय करून देण्यात आला. तो उपक्रम मुले व पालक या दोघांनाही खूप आवडला. * मराठी पत्रलेखन स्पर्धा : एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, पत्रलेखन उपक्रमातली निवडक पत्रं. ... * वैचारिक लेख मराठीची सद्य:स्थिती : काही अल्पचर्चित मुद्दे! .*मराठी साहित्यविषयक विविध पुरस्कार : ok * मायबोली संकेतस्थळाचा मराठी भाषा दिवस २०२२ उपक्रम: त्यातील उल्लेखनीय बाबी : - माझे मराठीचे मास्तर / बाई यावरील लेख - भाषेचे अलंकार हा समूहखेळ - साहित्य अभिवाचन/साहित्यवाचन अभिनंदन ! असेच उपक्रम विविध स्तरांवर घडत राहोत ही सदिच्छा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 873 views

🗣 चर्चा

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा