Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वाऱ्यावर जसे पान

च — चांदणे संदीप, Tue, 03/01/2022 - 15:45
नीज भरते दिशांत माझे रिते नीजपात्र उतरूनि ये अंगणी जरी हळुवार रात्र रात्र रात्र जागते गोड स्वप्नातूनि धुंद गात राहते अबोल मौनातूनि येती कानी दुरून सूर सारंगीचे छान मन खाई हेलकावे वाऱ्यावर जसे पान पान पान जागते पाचूच्या बनातूनि शुभ्र सोनसकाळी झळाळते दवातूनि - संदीप चांदणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4738 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 03/04/2022 - 04:29 नवीन
आवडली कविता.. मस्त पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/04/2022 - 04:41 नवीन
झकास एकदम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/04/2022 - 05:32 नवीन
लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 06/10/2022 - 12:54 नवीन
आवडली कविता..
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 06/11/2022 - 08:28 नवीन
पण कृपया निरुपण करावे. म्हणजे आम्हा अरसिकांना नादमयतेच्या पलिकडे आनंद घेता येईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 06/13/2022 - 11:47 नवीन
"कवित्व शब्दसुमनमाळा - अर्थपरिमळ आगळा" असे समथांनी कवित्वाचे वर्णन केलेले आहे, परंतु अलिकडल्या बर्‍याच कवितांमधून 'आगळा अर्थपरिमळ' फारसा प्रचितीस येत नाही. गोग्गोड शब्द-प्रतिमांच्या माळांमधून दोन-तीनदा आरपार जाऊनसुद्धा काही अर्थ हाती लागलेला नाही असे वाटले. 'निजपात्र' म्हणजे 'स्वतःचे पात्र' की 'नीज' हे जणुकाही एक 'पात्र' असून ते रिकामे आहे , असे म्हणायचे आहे, हे पहिल्या ओळीत 'नीज' तर लगेच दुसर्‍या ओळीत 'निज' असे लिहील्याने समजले नाही. तसेच 'पाचू' म्हणजे (पन्ना वा एमरल्ड) रत्न ना? मग 'पाचूचे बन' (वन - अरण्य ?) म्हणजे नेमके काय ? ''शुभ्र सोनसकाळ' म्हणजे काय ? 'हळुवार' 'गोड स्वप्न' 'धुंद गान' 'अबोल मौन' 'सारंगीचे सूर' 'पाचूचे बन' 'सोनसकाळ' 'झळाळता दव'..... वगैरे बुळबुळीत शब्दांवरून घसरत जाताना कविता संपली, तरी नेमके झाले काय हे समजले नाही. एकादे 'अमूर्त' चित्र (मी याला 'केवल चित्र' म्हणतो) त्यात कोणताही'अर्थ' शोधण्याच्या भानगडीत न पडता, उगाचच तर्कवितर्क न करता 'नुस्ते बघायचे' असते, तसे शब्दांच्या घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत अनुभवायची, असे आहे का? मिपावर 'दवणीय' असा एक शब्दप्रयोग रूढ आहे. तशी ही एक दवणीय कविता आहे का ? मज निरोपावे. शेवटी, "रागावू नका गडे" असा गोड हट्ट.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/26/2022 - 11:51 नवीन
मला वाटले मी खूपच सरळ लिहितो. लिहिण्यामागे तसा हेतूतरी असतो. मला स्वतःला दुर्बोध कविता, गूढकविता, शब्दबंबाळ कविता, मुक्तछंदातल्या कविता किंवा ज्या तालमय, लयदार नाहीत अशा कविता फारशा आवडत नाहीत. असो, तर या कवितेत नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन पाखरांपैकी कोणाही एकाच्या एकट्याने रात्र व्यतीत करताना, विरह असा नाही पण, पुन्हा भेटण्याच्या आधीची ओढ, त्यायोगे रात्री स्वप्नरंजन करीत सकाळपर्यंतचा प्रवास, असं काहीसं चित्रण आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 12/26/2022 - 20:29 नवीन
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय... तू तो ना आये तेरी, याद सताय ... असा मामला आहे म्हणायचा.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 12/27/2022 - 10:54 नवीन
एक्झ्याटली पर्फेक्ट! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 06/13/2022 - 12:19 नवीन
मस्त. आवडली कविता!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 21 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 23 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा