Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कातरवेळ

ब — बिपीन सुरेश सांगळे, Sun, 02/27/2022 - 19:13
कातरवेळ -------------------------------------------- जेव्हा केशरी रंगाचं अस्तित्व पुसत राखाडी रंग आकाशात पसरत जातो तेव्हा उत्फुल्लपणाचं अस्तित्व पुसत अस्वस्थपणा मनात उतरत जातो मनात अनामिक हुरहूर दाटून येते कारण ती कातरवेळ असते जेव्हा पाखरं माघारी फिरतात जेव्हा माणसं घरात शिरतात तेव्हा कुठल्याकुठल्या आठवणींची वटवाघळं मनात भिरभिरतात कधी कोणाची दुखावणारी मनात खोल याद असते कारण ती कातरवेळ असते मन अंतर्मुख होतं मन आधारहीन वाटतं साऱ्या जगाशीच संबंध तुटल्यासारखं वाटतं ती साली - त्रिशंकू अवस्था असते कारण ती कातरवेळ असते कधी उदासी कवटाळते अन कशी शांतता वेटाळते ही वेळ अशी का जीवघेणी ? उगाच खुळा जीव जाळते काय आहे काय नाही कशाची कशाला जाणीव नसते कारण ती कातरवेळ असते आपण न आपले राहतो गडद उगा विचार वाहतो कुण्या जन्माचे दुःख साहतो मग मी रात्रीची वाट पाहतो थोड्या वेळाने ती नवतरुणी संध्या काळी चंद्रकळा नेसणार असते अन ती जिवा सलणारी कातरवेळ सरणार असते कारण ती कातरवेळ असते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1094 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Tue, 03/01/2022 - 08:36 नवीन
व्वा, सुंदर चित्रदर्शी रचना !
आपण न आपले राहतो गडद उगा विचार वाहतो कुण्या जन्माचे दुःख साहतो मग मी रात्रीची वाट पाहतो थोड्या वेळाने ती नवतरुणी संध्या काळी चंद्रकळा नेसणार असते अन ती जिवा सलणारी कातरवेळ सरणार असते कारण ती कातरवेळ असते
हे विशेष आवडले !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा