Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संवाद

श
श्रीगणेशा
Sun, 02/20/2022 - 20:16
💬 7 प्रतिसाद
तिचं ऑफिस सातव्या मजल्यावर, त्याचं दहाव्या. सकाळचे ८. नवीन नोकरीचा अतिउत्साह. फक्त दोघेच ऑनलाईन दिसत होते ऑफिस गृपवर. दोघांनाही आश्चर्य वाटलं. त्याने मोठ्या उत्स्फूर्तपणे आणि हसून लिहिलं, "माझ्याशी स्पर्धा?" तिचा बराच वेळ रिप्लाय नाही. तो कामात पुन्हा दंग. काही वेळातच ती समोर उभी राहिली, सुंदर हास्य, बोलके डोळे आणि उत्साह घेऊन. त्याचं अर्ध लक्ष कामात. "कॉफी घेऊयात?", ती म्हणाली. त्याला काही सुचेना, "तू पुढे हो, मी आलोच हे थोडंसं काम संपवून." ती मागे वळून पाहत पाहत पोहोचली पँट्री मधे. छान गाणं गुणगुणत होती ती, कॉफी घेता घेता. "छान म्हणतेस तू गाणं. ऐकलं मी थोडावेळ बाहेर थांबून". ती बावरली थोडी. मग ती अधिकाराने म्हणाली, "बघ, कॉफी जमलीय का" "तुझ्यासोबत यायला जमलं नाही लगेच", कडू कॉफी गोड मानून त्याने सावरायचा प्रयत्न केला. "पण तू एवढ्या लवकर ऑफिसमधे?", त्याने विचारलं. "तुझा पाठलाग करत होते", ती गंमतीने म्हणाली. "आणि तू?", तिनेही हसून विचारलं. "मी तुझं गाणं ऐकावं म्हटलं!" दोघेही हसले, एकसुरात. कॉफी संपली. ----

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2925 views

💬 प्रतिसाद (7)
र
राघव Mon, 02/21/2022 - 10:21 नवीन
संवादाची सुरुवात आवडली. :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/21/2022 - 10:24 नवीन
आवडला संवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/21/2022 - 11:57 नवीन
एकदम हलकीफुलकी प्रेम कहाणी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 02/22/2022 - 13:29 नवीन

💓

आवडली गुलाबी कॉफी !
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 02/22/2022 - 15:12 नवीन
धन्यवाद राघव, कुमार सर, मु वि, चौ को _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/24/2022 - 07:02 नवीन
आवडलं. असं हलकं फुलकं सुरु राहीलं पाहिजे आयुष्यात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
N
nutanm Mon, 03/07/2022 - 01:18 नवीन
डाॅ बिरूटे सर , आे हलक, फुलक चालू राहिले पाहिजे ,हे म्हणायलाठीक आहे ,पण private office मधे चालून जाईल govt office मधे केले तर भारीच अर्थाचा अनर्थ होतो ,आपल्या बद्दल काय काय अपरोक्ष बोलतिल व काय नाही त्यांत स्त्रियांना लग्नापूर्वी, व्हायचेय लग्न म्हणून व विवाहानंतर झाले म्महणून ग काय कंड्या पिकतिल म्हणून भारीच दक्ष हावे लागतसे साधारण 80/90 च्या काळात ते आत्ता 14/16 साली निवृत्तीपर्यंत. नाहीतर office मधे ,तिच्याबद्दल कायकाय कंड्यपिकतिल व विवाह होणे मुष्कील किंवा विवाह झालेला असला तरी नवर्यामुळे दक्ष रहावे लागते, चुकूनही तोंडातून उल्लेख गेलातर नवरा काय करेल नि काय नाही हेही कांहींवर दडपण असतेच, जरी सर्वच नवरे असे नसतिलही पण orthodox असणारे घरातून बाहेर काढायचे त्या काळात ही भिती, व त्याच्या घरातले या कामात पहिले पुढाकार घ्चायचे, बाकी दोघांचे मन जोडण्याच्या कामात नाही तिथे पटवून घेत असताना मुलगी तिला त्रास द्ययची पद्धत. काही ।हळवे पुरूषही अशी दक्षता घेताना मी स्वःता बघितलेय.,कळावे हा प्रतिवाद नाही अनुभवलेली वस्तुस्थिति सांगण्याचा प्रयत्न.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 22 hours ago
  • सुंदर !!
    3 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा