Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आदिमाय

अ
अनन्त्_यात्री
Sun, 02/20/2022 - 17:16
💬 6 प्रतिसाद
माझ्या पुस्तकांच्या कपाटात मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली, मग असोशीने विकत घेतलेली, देहभान विसरून वाचलेली, पुन्हापुन्हा पारायणं केलेली, बहुतांश मुखोद्गत झालेली, वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली हारीने मांडलेली जिवापाड जपलेली पुस्तकं आजकाल बघतोय एकेक गायब होतंय अन् कपाटात त्यांच्याजागी... दुसरंच काहीतरी प्रगटतंय कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी भयाण पोकळी चरित्रग्रंथांजागी मुखवटे वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी आज तरीही नेटानं कपाटापाशी गेलो थबकलो भांबावलो ऐकून पानांची फडफड नव्या पुस्तकपानांचा भारून टाकणारा गंध श्वासात भरून घेतानाच दिसली कपाटात शाबूत फक्त... ...अमरतेचा शाप मिरवणारी, जड-चेतन-सूक्ष्म-विराट सगळ्याला आपल्या कवेत घेऊन निर्लेप नि:संग निरागस उरणारी, सार्‍या सार्‍या अ-क्षर अभिव्यक्तीची आदिमाय.. ...अंकलिपी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2262 views

💬 प्रतिसाद (6)
श
श्रीगणेशा Sun, 02/20/2022 - 20:48 नवीन
कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी भयाण पोकळी चरित्रग्रंथांजागी मुखवटे वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी
अर्थपूर्ण! खंत अगदी अचूक शब्दात टिपली आहे _/\_
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 02/21/2022 - 04:24 नवीन
मस्त...आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 02/21/2022 - 04:41 नवीन
अजूनतरी पुस्तके बेघर नाही झाली पण नजर जरूर लागतेय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/21/2022 - 04:42 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/21/2022 - 05:17 नवीन
पण आता हळूहळू मराठी अंकलिपी जाऊन, इंग्रजी अंकलिपीच दिसायला लागली आहे ....
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 02/27/2022 - 06:01 नवीन
सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 22 hours ago
  • सुंदर !!
    3 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा