Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

हेमंत ऋतू!

B
Bhakti
Sun, 02/20/2022 - 06:30
💬 13 प्रतिसाद
वसंतोत्सव ग्रीष्मोत्सव वर्षा शरदोत्सव हेमंत ऋतू हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं. थंडी ही हेमंत आणि शिशिर या ऋतूत विभागली आहे. या दोन ऋतुंमध्ये फारसा फरक करायचा तर तापमानावरून करता येईल. तरीही काही ठिकाणी याचा उल्लेख प्री-विंटर असा आहे. तापमान १० डिग्री ते २५ डिग्री असते. नवप्रवालोद्रमसस्यरम्यः प्रफुल्लोध्रः परिपक्वशालिः। विलीनपद्म प्रपतत्तुषारोः हेमंतकालः समुपागता-यम्‌॥ बीज अंकुरित झाले आहेत .फुले लगडली आहेत.धान्य आता कापणीस योग्य आहे.परंतु कमळ कोठेही दिसत नाही त्यामुळे स्त्रिया अन्य फुलांचा वापर श्रुंगारासाठी करत आहेत.दवबिंदू पडायला लागले आहेत,पूर्व थंडीचा हा असा काळ आहे.स्त्रिया सुगंधी चंदनाचा वापर उटणे म्हणून करत आहेत.शेत आणि सरोवर पाहून मन हर्षित होत आहेत. ऋतूसंहार मध्ये कालिदासाने हेमंतचे वर्णन असे केले आहे. "शीते शीतानिलस्पर्शसंरुद्घो बलिनां बलीः। पक्ता भवति..." चरक संहिता मध्ये देखील हेमंत ऋतूला स्वास्थ्य प्रदान करणारा सांगितलं आहे. गजपतिद्वयसीरपि हैमन्तस्तुहिनयत्सरितः पृषतां पतिः। सलिलसंततिमध्वगयोषितामतनुतातनुतापकृतं दृशाम्॥ हिवाळ्यातील थंड वारे,दवबिंदू ,खोलवर गोठलेलली नदी अगदी बलाढ्य हत्तीएवढी,त्यात उष्ण काही उष्ण वारे अशा वेळी जिचा पती दूरदेशी आहे तिच्या डोळ्यांतून दुख:दायी अश्रू वाहत आहेत. कवी माघ अवश्यायतमोनद्धा नीहारतमसा ऽवृता। प्रुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः॥ हेमंत काळातील पुष्पहीन वातावरण असूनही दूरवर पसरलेले हे रान पंखांप्रमाणे भासणाऱ्या बर्फाच्या चादरीच्या अंधारात निजलेले आहे. वाल्मिकी रामायण हा गुलाबी थंडीचा काळ प्रेमी युगालासाठी अतीव आनंद देणारा.एकमेकांच्या मिठीत शेकोटीजवळ रात्रभर ऊब अनुभवण्याचा.यावर ओडिसातील पट्टचित्र सुंदर हेमंत ऋतू दाखवतांना. १ तसेच भारतीय टपाल खात्याने प्रसिध्द केलेले हेमंत ऋतुवरील तिकीट एक ऊबदार म्हणाव लागेल. २ पण याच ऋतूमध्ये प्रवाशांची थंडीत गारठून ततपप होत असते. सायबेरियन व इतर पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करून महाराष्ट्र भिगवण ,गुजरात या ठिकाणी या काळात स्थलांतर करतात. गुलाब ,प्राजक्त याच काळात दवाने भिजलेली सुंदर दिसतात. गोल्डन शॉवर 2 स्लाइम वीड,विशेष हे डिसेंबर महिन्याताच येते. 2 इतर पुष्पवैभव 2 2 मराठी महिन्यांनुसार मार्गशीर्ष आणि पौष महिन्यातील दत्त जयंती,श्रीकृष्णाने जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली ती गीता जयंती येते. सूर्याची उपासना आणि शेतात गव्हाच्या ओंब्या डुलू लागतात.कोवळी पिके पाहून सृजनाची भावना होते.बर्याचशा झाडांना आता फळ,शेंगा लगडलेल्या दिसून येतात.लवकरच ही चांगली पक्व होणार असतात. संक्रांत ,बैसाखी,ओणम अश्या वेगवेगळ्या नावाने पिक अन्न धान्याबद्दल कृतज्ञता दाखवली जाते.तीळ-गुळाचा गोडवा आणि स्निग्धता नात्यांत उतरावा अशी कामना करून यथेच्छ सेवन केले जाते. तीळगुळ वड्या 3 सुवासिनी सुगट-यात सर्व कोवळी पिकं गोळा करत स्त्रियांना याचा आदर आणि आंनद मिळावा असे असावे. १ हेमंत ,शिशिर ऋतू साऱ्या थकलेल्या पानांना,सृष्टीला बर्फाच्या चादरीमध्ये निवांत निजायला सांगत आहे कारण त्यांना लवकरच वसंताचे स्वागत करायचे आहे. ---भक्ती संदर्भ हेमंत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9984 views

💬 प्रतिसाद (13)
ह
हेमंतकुमार Sun, 02/20/2022 - 07:25 नवीन
लेख व फोटो छान !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/20/2022 - 08:12 नवीन
सुंदर लेखन आणि समर्पक प्रचि !

💖

  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 02/20/2022 - 08:17 नवीन
😄
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Mon, 02/21/2022 - 03:46 नवीन
छान. संदर्भासहित छान लिहीलेय. फोटो पण छान आहेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/21/2022 - 12:40 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/21/2022 - 14:26 नवीन
सुरेख लिहिलंय. काहीं श्लोकांचा त्यातला त्यात योग्य अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. गजपतिद्वयसीरपि हैमन्तस्तुहिनयत्सरितः पृषतां पतिः। सलिलसंततिमध्वगयोषितामतनुतातनुतापकृतं दृशाम्॥ हेमंतातील थंड वाऱ्यामुळे हत्तीएव्हढ्या खोलवर गोठलेल्या नदीवर जमा झालेले दवबिंदू जणू दूरदेशी गेलेल्या पतीच्या विरहाने पत्नीने गाळलेल्या उष्ण अश्रूबिंदूंसारखेच दिसत आहेत. अवश्यायतमोनद्धा नीहारतमसा ऽवृता। प्रुप्ता इव लक्ष्यन्ते विपुष्पा वनराजयः॥ रात्रकाळी दवबिंदूंनी आणि अंधाराने झाकले गेलेले तसेच भल्यासकाळी धुक्यामुळे झाकले गेलेले ही पुष्पहीन वनराज्ञी जणू झोपी गेल्या प्रमाणे दिसून येत आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 02/22/2022 - 04:04 नवीन
😃
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/22/2022 - 05:46 नवीन
फारच मस्त लिहिले आहे आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 02/22/2022 - 08:38 नवीन
छान लिहिलंय 👍 भारतीय टपाल खात्याने प्रसिध्द केलेले हेमंत ऋतुवरील तिकीट आवडले!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 02/22/2022 - 12:44 नवीन
पैजारबुवा, टर्मीनेटर धन्यवाद! 😃
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/22/2022 - 14:47 नवीन
क्लास, मस्त लिहिले आहे आणि त्याला फोटोंची सुंदर जोड
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 02/23/2022 - 06:35 नवीन
धन्यवाद सौंदाळा !
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Wed, 03/02/2022 - 17:11 नवीन
सुंदर फोटो,छान लेख
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 22 hours ago
  • सुंदर !!
    3 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा