Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नवकवी आणि आचार्य अत्रे

स
सागरसाथी
Fri, 02/18/2022 - 13:24
💬 4 प्रतिसाद
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच. त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात....... "तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच. प्रेमाचा तीळ घ्या, भक्तीचा पाक घ्या, हृदयाची कढई करा, अन् अशा तऱ्हेने हलवा करा. या हलव्याच्या कविता वाचल्या की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. होळीवरच्या एकूण एक कविता होळीत टाकण्याच्या लायकीच्या असतात. गोकुळात कृष्णाने जेवढा धुमाकूळ घातला नसेल तेवढा धुमाकूळ त्याच्या 'मुरली'ने मराठी साहित्यात माजवलेला आहे. जो कवी उठतो तो वीतभर लाकडाचा तुकडा कृष्णाच्या तोंडी अडकवतो आणि सांगतो त्याला की 'वाजिव वाजिव कान्ह्या मुरली !' मुरली वाजवून वाजवून त्याच्या तोंडाला ' फेशल पॅरॅलिसिस ' होईल की काय अशी आपल्याला भीती वाटते. अन् ह्या कवितेवर एखादे चित्र दिलेले असते. ते पाहिले तर कृष्ण मुरली वाजवतो आहे की उसाचे कांडे दातांनी सोलतो आहे हे कळत नाही. " असो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2612 views

💬 प्रतिसाद (4)
स
सौन्दर्य Fri, 02/18/2022 - 19:44 नवीन
व्हाट्सअप वर कोणताही सण येण्याचा अवकाश लगेच यमक जुळवून लिहिलेल्या कवितांचा महापूर लोटतो. दिवाळी, दसरा, संक्रांत, होळी वगैरे सणांना तर 'शुभेच्छा नकोत पण कविता आवर' असे म्हणण्याची पाळी येते. व्हॉट्सऍपवर सगळंच चकटफू असल्यामुळे कविता पाडण्यासाठी खिशात हात घालावा लागत नाही व फुकटचं व्यासपीठ (व इतरांना त्रास) नवकवींसाठी उपलब्ध होतं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/19/2022 - 07:28 नवीन
असाच होतो रस्त्याने एकदा मी जात वरून पडला भात मी विचारलं वरण कुठाय? कविता संपली कवितेचं नाव - इंदिरा गांधी
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 02/20/2022 - 08:26 नवीन
बरोबरच लिहिलंय अत्रे यांनी !

😆

दरवर्षी पाडव्याच्या अश्या शुभेच्छांचा पाऊस पडतो !
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मी ही अ‍ॅडव्हान्स मध्ये घेतला हात धुवून !
  • Log in or register to post comments
स
सागरसाथी Mon, 02/21/2022 - 11:49 नवीन
इतक्या वर्षांपूर्वी लिहून ठेवले याचे नवल,तेव्हा नवकवींना आत्तासारखे व्यासपीठ उपलब्ध नव्हते.( मी ही एक नवकवी)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 23 hours ago
  • सुंदर !!
    3 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा