Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग

स
साहना
गुरुवार, 02/17/2022 - 10:20
🗣 59 प्रतिसाद
तिसऱ्या भागांत आम्ही मुक्त समाज (Free Society) ह्यांच्या बद्दल पाहणार आहोत. मुक्त समाज म्हणजे नक्की काय ? अमेरिका आणि रशिया/चीन ह्यांत काय मूलभूत फरक आहे ? हाच फरक काही अंशाने युरोप आणि भारताला सुद्धा लागू पडतो. PJ ओरुरके ह्यांचे कालच निधन झाले. त्यांचे एक व्यक्तव्य ऐकू. > I had one fundamental question about economics: Why do some places prosper and thrive while others just suck? It’s not a matter of brains. No part of the earth (with the possible exception of Brentwood) is dumber than Beverly Hills, and the residents are wading in gravy. In Russia, meanwhile, where chess is a spectator sport, they’re boiling stones for soup. Nor can education be the reason. Fourth graders in the American school system know what a condom is but aren’t sure about 9 × 7. Natural resources aren’t the answer. Africa has diamonds, gold, uranium, you name it. Scandinavia has little and is frozen besides. Maybe culture is the key, but wealthy regions such as the local mall are famous for lacking it. > Perhaps the good life’s secret lies in civilization. The Chinese had an ancient and sophisticated civilization when my relatives were hunkering naked in trees. (Admittedly that was last week, but they’d been drinking.) ***In 1000 B.C., when Europeans were barely using metal to hit each other over the head, the Zhou dynasty Chinese were casting ornate wine vessels big enough to take a bath in***—something else no contemporary European had done. Yet, today, China stinks. भारत, अफगाणिस्तान, चीन, मंगोलिया, इराण, इराक, सीरिया, इजिप्त सारखे देश जे एके काली समृद्ध आणि पुढारलेले होते ते आज इतके अगतिक आणि बास्केट केस कसे आहेत ? हा बदल नक्की का घडला ? असुंसंस्कृत आणि अत्यंत हिंसक असे पाश्चात्य देश अचानक का पुढे गेले आणि आज सुद्धा आहेत ? युरोपिअन आणि अमेरिकेचा इतिहास रक्तरंजित आहे. वंशभेद, प्रचंड भांडणे, विविध लोकांवर आणि आपल्याच लोकांवर अत्याचार, पराकोटीचा द्वेष आणि इतर अनेक वाईट गोष्टी ह्या पाश्चात्य समाजांत आम्हाला दिसून येतात. पण मागील १००० वर्षांत पाश्चात्य प्रदेशाने प्रचंड प्रगती केली आहे हे दिसून येते. आणि हि प्रगती फक्त आर्थिक नसून बौद्धिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सुद्धा आहे. विविध समस्या हा समाज संथ गतीने का होईना पण सोडवत आला आहे. ह्याचे मूळ कारण हे आधुनिक समाज ज्या तत्वांवर आधारित आहेत ती तत्वे आहेत. हॉबेस, लोके, ह्यूम, ऍडम स्मिथ, प्लेटो आणि असंख्य विचारवंतांची जी मांदियाळी पाश्चात्य राष्ट्रांत निर्माण झाली त्यांनी ह्या देशांचा पाया घातला. ह्यांच्या जोडीला मार्क्स किंवा अंगेल्स सारखे लोक सुद्धा होते ह्यांचे ह्या लोकांच्या विरोधांत होते पण शेवटी विजय लोके सारख्यांचा झाला. एक गोष्ट इथे लक्षांत घेतली पाहिजे कि राजकारणी मंडळी इथे पूर्णतः अप्रासंगिक ठरली. अमेरिका इथे अपवाद आहे. अमेरिकेचं संस्थापक हे निव्वळ अमेरिकन लोकांच्या भाग्याने अत्यंत उच्च दर्जाचे विचारवंत आणि राजकारणी होते. ऋग्वेदांतील "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हि ओळ परवाच मला एका गोऱ्या माणसाने ऐकवली. त्याच्या मते तुमच्या कुठल्या ऋषी मुनींनी स्वतःला "विश्वगुरू" वगैरे म्हटले ? जे लोक सतत चांगल्या विचारांच्या शोधांत राहतात त्यांना स्वतःला विश्वगुरू म्हणून बढाया मारायला वेळ नसतो. पण "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हे तत्व पाश्चात्य राष्ट्रांनी अत्यंत चांगल्या प्रकारे रुजवले. १७व्या शतकांतील लोके हा विचारवंत कदाचित जगांतील सर्वांत प्रभावशाली विचारवंत असावा. "खाजगी मालमत्ता" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य" ह्या दोन मुल्याना त्यांनीच प्रभावी पणे दोन अत्यावश्यक गोष्टी म्हणून लोकांपुढे ठेवले. ह्या दोन्ही गोष्टींत नावीन्य नव्हते. ह्या गोष्टी विविध रूपांत प्लेटो पासून असंख्य विचारवंतांनी पाश्चात्य देशांत मांडल्या होत्या. चर्च आणि सरकारने वेगळे असावे हा मुद्दा सुद्धा लोके ह्यांनीच प्रभावशाली पद्धतीने मांडला. पण लोके ह्यांचे सर्वांत प्रभावी लेखन माझ्या मते "मानवी मनाची मर्यादा" ह्या विषयवार होते. मानवी अस्तित्व आणि विचार दोन प्रकारचे आहेत. अनुभव आणि ध्यान. > Experience is of two kinds, sensation and reflection. One of these—sensation—tells us about things and processes in the external world. The other—reflection—tells us about the operations of our own minds. Reflection is a sort of internal sense that makes us conscious of the mental processes we are engaged in. Some ideas we get only from sensation, some only from reflection and some from both. ( लोके ह्यांचा हा विचार १००% ऋग्वेदांतील दीर्घतमस ह्यांच्याशी मिळता जुळता आहे. दीर्घतमस ह्यांनी माझ्या माहिती प्रमाणे ऋग्वेदांत फक्त ४ ओळी लिहिल्या. एक ओळींत ते दोन पक्ष्याबद्दल बोलतात. "एक पक्षी फळ खात आहे तर दुसरा पक्षी पहिल्या पक्ष्याला फळ खाताना बघत आहे." इतकीच हि ओळ आहे पण ह्याच ओळींतून पतंजली इत्यादींनी योग ची संकल्पना निर्माण केली. पहिला पक्षी जीवनाचा उपभोग घेत आहे, पण दुसरा पक्षी त्या उपभोगावर मनन करत आहे. ) हा विचार लोके ह्यांनीच मांडला असे नाही, लोके ह्यांच्या आधी अनेकांनी हा विचार विविध पद्धतीने मांडला होता. चर्च ची पोथीनिष्ठता, आणि आम्हाला सर्व ठाऊक आहे हा attitude कदाचित विविध लोकांना आवडत नव्हता आणि त्यातूनच मानवी क्षमतेला मर्यादा आहेत हा विचार पाश्चात्य विचारपद्धतीत उदयास आला. लोके नंतर ऍडम स्मिथ ह्यांनी नंतर १८व्य शतकांत "अदृश्य हात" ह्या स्वरूपांत हा विचार मांडला. ( अवांतर : साधारण १७व्या शतकांत अमेरिकेतील प्लायमौथ इथे काही गोरे वसाहतवादी आले. त्यांनी सर्वानी मिळून सामाजिक शेती करायचे ठरवले. मार्क्स च्या आधीच हे कलेक्टिव्ह फार्मिंग चालू झाले होते. सर्वानी मिळून जमीनीत घाम गाळायचा आणि नंतर पीक मात्र गरजेप्रमाणे वाटून घ्यायचे. जमिनीची मालकी सर्वांची राहील. म्हणजे तुम्ही २० वर्षांचे तरुण आहात तर तुम्ही दिवस भर राबायचे. पण तुमचा शेजारी ज्याला १ बायको नि ३ मुले आहेत त्याला मात्र तुमच्या पेक्षा ४ पट जास्त धान्य मिळेल असा हा मॉडेल होता. हा कोसळला. चोरी आणि कामचुकारपणा वाढली. शेवटी उपासमारीची पाळी आली. काही अमेरिकन जमातींनी ह्यांना मदत केली म्हणून हि मंडळी तग धरून राहिली. सुएदॆवाने ह्या गोऱ्या लोकांचा म्होरक्या पोथीनिष्ठ साम्यवादी नव्हता. त्याने निरीक्षण करून आपला मॉडेल चुकीचा आहे हे पहिले आणि दुसऱ्या वर्षी प्रत्येक कुटुंबाला ठराविक जमीन वाटून दिली, आपल्या जमिनीचे वाट्टेल ते करा असे स्वातंत्र्य दिले. त्या वर्षी त्यांना भरगोस पीक आले. त्यातून त्यांनी अमेरिकन जमातींना जी मेजवानी ठेवली त्याला आपण अमेरिकन थॅंक्सगिविंग म्हणून साजरे करतो. ) १७ व्या शतकांत खाजगी मालमत्ता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी मनाच्या मर्यादा ह्या तिन्ही संकल्पना सर्वच पाश्चात्य राष्ट्रांनी आत्मसात केल्या. रॉयल सोसायटी जी लोके इत्यादींनी अतिशय अनॊपचारिक रित्या निर्माण केली होती तीला औपचारिक रित्या राजाची मान्यता मिळाली. व्ययक्तीक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ लोक अनेकदा स्वैराचार असा घेतात. स्वैराचार ह्यांत अंतर्भूत असला तरी निव्वळ तो एकमेव फायदा नाही. आम्हाला सर्वच प्रश्नाची उत्तरे ठाऊक नाहीत त्यामुळे विविध लोकांनी विविध प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पहिले आणि त्यांना आम्ही अभय दिले तर काही लोक योग्य मार्ग शोधून काढतील आणि इतर लोक हळू हळू त्याचे अनुकरण करतील आणि त्यामुळे ज्या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी आहेत त्या काळाच्या ओघांत सिद्ध होत जातील. प्रत्येक व्यक्ती हि शेवटी आपला फायदा पाहते आणि जेंव्हा दोन व्यक्ती निव्वळ आपल्या फायद्यासाठी एकत्र येऊन सहकार करतात तेंव्हा दोघांचाही फायदा होतो आणि पर्यायाने संपूर्ण समाजाचा फायदा होतो. असा हा विचार होता. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मालमत्तेचे स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे ठळक पणे पाश्चात्य मूल्ये म्हणून पुढे आली. माझ्या मते हि मूल्ये १००% बरोबर होती पण ती अमलांत आणणे हे शेवटी सामाजिक व्यवस्थेवर अवलंबून होते. वंशभेद, धर्मभेद आणि अनेक संकटांनी युरोपिअन समाज ग्रासला होता. आजही ग्रासला आहे, पण आपली मूल्ये बरोबर असली कि आपोआप भविष्य सुधारत जाते. तेच ह्या समाजांत घडले. काळाच्या ओघांत हे समाज जास्त प्रगल्भ बनत गेले. ह्याचा अर्थ आज ह्या समाजांत समस्या नाहीत असा कुणीही घेऊ नये. समस्या असंख्य आहेत पण इतर मागासलेल्या देशांत आहेत त्या नाहीत, वेगळ्या पातळीच्या समस्या आहेत. पाश्चात्य देशांत आज टोकाच्या भूमिका दिसून येतील. ह्या टोकाच्या भूमिका मागील ३०० वर्षांपासून तिथे आहेत, पण मतभेद असताना सुद्धा एकत्र येऊन वाटाघाटी करून, एकमेकांची मनधरणी करून मार्ग काढावा इतपत त्यांनी प्रगती केली आहे. ह्या मुळे विविध विचार, काही विचार टोकाचे वाटले तरी चांगले विचार काय आणि वाईट विचार काय ह्याचे कोडे हळू हळू उलगडत जाते. शॉर्ट टर्म मध्ये देशांत संकटे आहेत असे वाटले तरी लॉन्ग टर्म मध्ये देशाची स्तिथी सुधारत जाते. पाश्चात्य देश बाहेरून असंबद्ध, गोंधळलेले, सतत आंदोलनांनी ग्रासलेले असे दिसतात. सत्तेत कुणीही असो, लोक हे सरकारवर खुश नाहीत असे दिसून येते. पण इतकेही असून सोविएत सारख्या देशांना हे देश पुरून उरले कारण शेवटी ते ज्या तत्वावर आधारित होते ती अत्यंत मजबूत होती. स्वातंत्र्य मग ते कुठल्याही प्रकारचे असो त्याचा फायदा स्वातंत्र्याच्या आनुपातिक रूपांत मिळतो. म्हणजे एखादा समाज समाज १०% जरी अधिक स्वतंत्र झाला तर त्या समाजाला त्याच प्रमाणात फायदा होतो. ९० मधील भारतातील सुधार हे तसे पाहायला किरकोळ होते कारण आज सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सरकारी बुटाखाली भरडली जात आहे, पण त्या थोड्याश्याच जास्त आर्थिक स्वातंत्र्याने भारताने प्रचंड प्रगती केली. ह्याच्या उलट बंदिस्त समाज म्हणजे चीन किंवा रशिया आहेत. एके काळी भारत सुद्धा होता. बंदिस्त समाजांत विचारांचे स्वातंत्र्य नाही त्यामुळे डार्विन चा सिद्धांत इथल्या विचारांवर चालत नाही. फक्त राष्ट्रेच बंदिस्त असतात असे नाही तर धर्म सुद्धा असू शकतो. कॅथॉलिक चर्च सुद्धा एक अत्यंत बंदिस्त विचारसरणी होती. आपण कुठे तरी चुकतो आहोत हा फीडबॅक ह्या समाजांत लोकांना मिळत नाही. त्यामुळे त्या चुका सुधारण्याची क्षमता कमी कमी होत जाते. मग कुठला विचार योग्य आणि कुठला विचार योग्य नाही ह्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी फार कमी लोकांवर येऊन पडते. मानवी मनाच्या मर्यादा तिथे उघड्या पडतात. सोविएत मधील एक किस्सा आहे. एक जवळ जवळ अडाणी माणूस निव्वळ आपल्या राजकीय क्लुप्त्या वापरून सोविएत मध्ये संशोधक बनला. लेनिन च्या मदतीने त्याने सामाजिक शेती हा उपक्रम राबविला. हा माणूस अत्यंत अवैज्ञानिक अश्या गोष्टींना विज्ञानाच्या नावाखाली पसरवत होता पण आपल्या तथाकथित संशोधनाला तो मार्क्स च्या विचारांशी जोडत होता त्यामुळे त्याला विरोध करणे म्हणजे मार्क्स वर टीका करणे होते. शेवटी ह्याच्या गोधळाने सोविएत मध्ये दुष्काळ पसरला आणि लाखो लोक मेले. [२] > Lysenko believed that successive generations of crops could be improved by exposing them to the right environment, and so too could successive generations of Soviet citizens be improved by exposing them to the right ideology. अश्या प्रकारचे विचार काही सोविएत मध्ये होते असे नाही तर अमेरिकेत सुद्धा होते आणि आज सुद्धा आहेत, फक्त त्यांच्यावर टीका करणे अमेरिकेत शक्य होते आणि आहे. ट्रम्प ह्यांची समर्थक इमिग्रंट विरोधी संघटना जश्या CIS, NumbersUSA इत्यादी अमेरिकेत tanton network म्हणून ओळखली जातात. प्रो गर्भपात अश्या ह्या संघटना विचित्र पद्धतीने ट्रम्प समर्थक आहेत. Tanton हे एक नेत्रविशारद होते पण त्यांच्या मते अमेरिकेत गोऱ्या व्यतिरिक्त इतरांना प्रजननाचा अधिकार द्यायलाच नको होता आणि बिगर गोऱ्या लोकांची जबरदस्तीने नसबंदी करायला हवी होती. ह्याला अमेरिकेत eugenics असे संबोधित केले जाते. पण कायदेशीर दृष्टया ते शक्य नसल्याने त्यांनी soft युजेनिकस हि संकल्पना आणली म्हणजे थेट कायदे निर्माण न करता असे वातावरण निर्माण करणे कि बिगर गोऱ्या लोकांना प्रजनन करणे शक्य होऊ नये, शक्य झाले तरी त्या मुलांना योग्य प्रकारे वाढवण्याची संधी मिळू नये इत्यादी. बर्नी सँडर्स ह्यांचे फॅन, climate वॉरिअरर, प्रो गर्भपात आणि इतके असून सुद्धा ट्रम्प चे खंदे समर्थक असे हे विचित्र प्रकरण आहे. सांगण्याचे प्रयोजन हेच कि मूर्ख लोक सर्वच समाजांत असले तर काही समाजांत मुर्खांना लवकर बाजूला फेकले जाते तर काहींमध्ये तसे शक्य होत नाही. त्यामुळे एक समाज सुधारतो तर दुसरा सुधारत नाही. माझ्या मते सोविएत चे पडणे हे inevitable होते. ते टाळता येणे शक्य नव्हते कारण मानवी मनाच्या मर्यादा. आपले नेते आणि सेंट्रल प्लँनर कितीही विद्वान असले तरी शेवटी त्यांच्या क्षमतेला मर्यादा आहेत. कधी कधी चुकीचे व्यक्ती ह्या जागी पोचतील. ह्यांनी चुकीचे निर्णय घेतले कि मग त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. व्हायच्या उलट मुक्त समाजांत कुणीही नेता झाला तरी त्याचे प्रखर विरोधक असतीलच त्यामुळे त्या सर्वाना बर्बर घेऊन चालण्याच्या नादात टोकाची भूमिका शक्य होणार नाही. हळू हळू समाज बदलेल आणि नवीन मूल्ये आत्मसात करेल. त्याच कारणासाठी माझ्या मते चीन चे विभाजन हे अटळ आहे. चिनी साम्यवादी पार्टी आज ना उद्या कोसळणार. कम्युनिस्ट पार्टीच्या हातून १-२ चुका जरी झाल्या तरी ते पुरेसे ठरेल. चीन किंवा रशिया ह्यांची मूल्ये पाश्चात्य समाजापेक्षा पूर्णता वेगळी आहेत. सत्ता हि काही लोकांच्या हाती एकवटायची, ह्या लोकांनी मग इतर सर्वांसाठी निर्णय घ्यायचे आणि लोकांनी निमूट पणे ते केलेले नियम पळून गुपचूप काम करायचे. प्रसंगी सरकार हिंसा सुद्धा वापरून लोकांना रेषेंत ठेवू शकते. इथे वैयक्तिक स्वातंत्र्य नाहीच पण सर्व लोक हे सरकारची मालमत्ता असल्याप्रमाणे वागवले जातात. माझ्या दृष्टिकोनातून कुठली मूल्ये जगांत रुजणार आणि कुठली मूल्ये नाहीशी होणार हे अत्यंत स्पष्ट आहे. ** भारताची भूमिका ** ह्यावर माझी भूमिका मी भारतीय आणि लिबरटेरिअन असल्याने पूर्वग्रह दूषित असू शकते. माझ्या मते जुनी भारतीय मूल्ये हे बऱ्याच अंशी आधुनिक पाश्चात्य मूल्यांशी मिळती जुळती आहेत तर आधुनिक भारतीय सरकार जे अजूनही जुनाट ब्रिटिश २.० असून सोविएत शी मिळते जुळते आहे. कुठे तरी भारतीयांची आंतरिक स्वातंत्र्याची ओढ आणि जाचक सरकार ह्यांचे सतत भांडण देशांत चालू असते. हळू हळू जुन्या मूल्यांचा ऱ्हास आणि त्याच्या जागी काही तरी आफ्रिकन छाप "whataboutry" ह्यांनी जागा घेतली आहे. देशांतील कुठलाही विषय घ्या, राम मंदिर पासून आरक्षण पर्यंत आणि हिजाब पासून शेती कायदा पर्यंत कुठेही देशांतील कुठलीही बाजू आपला प्रिन्सिपल काय हं हे स्पष्ट पाने सांगू शकत नाही. प्रत्येक भूमिका हि शेवटी त्यावेळी फायदा काय आहे हे पाहून घेतली जाते. आणि फक्त राजकीय लोकच नाहीत तर सर्व सामान्य विचारवंत सुद्धा असेच वागतात. शेवटी भारतीय म्हणून आपण कुठल्या मुल्याना उचलून धरू ह्यांत लोकांत कमालीचा संभ्रम आहे. चीन रशिया, पाशात्य देश हे सर्व सध्या बिग boys क्लब असले आणि भारताला त्यांत विशेष स्थान नसले तरी भारत ह्या समीकरण महत्वाचा देश ठरू शकतो, पण राष्ट्र म्हणून जो पर्यंत आपण आपली मूल्ये व्यवस्थित शोधत नाही तो पर्यंत आम्हाला मागेच राहावे लागेल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22139 views

🗣 चर्चा (59)
T
Trump Sat, 03/05/2022 - 09:34 नवीन
हे घ्या. अमेरीकन कोर्टानेच सांगितले की तंत्रकंपन्या त्यांना नको त्या गोष्टी काढु शकतात. प्रकरण बहुतेक वरच्या न्यायालयात जाणार..
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/26/2022 - 08:49 नवीन
श्री साहना यांची युरोपियन देशांमधील दांभिकपणा, वंशश्रेष्ठत्वाची, स्वता:साठी आणि इतरांसाठी वेगळी मुल्ये / मापदंड, स्वत:च्या फायद्यासाठी ईतरांना लढवत राहणे , इतरांना का राग / उद्वेग आहे, ह्याबद्दल विचारमंथन करावे. जी मुक्त विचारप्रणाली तिथे आहे, त्यातुनच सगळे हे दोष आले आहेत. तर मग त्या मुक्त विचारपध्दतीमध्येच दोष नाही का? ह्यासगळ्यांची उदाहरणे अगणित आहेत. अभ्यासु लोकांना माहिती असतीलच. श्री साहना यांच्या युक्तीवादमध्ये युरोपियन लोकांना उक्रांतीयुक्त काळानुसार बदलणार्‍या विचारसरणीच्या विभागात तर इतरांना पोथीनिष्ठ, थिजलेल्या विचारसरणीच्या विभागात टाकले आहे. ते चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 02/26/2022 - 09:18 नवीन
> जी मुक्त विचारप्रणाली तिथे आहे, त्यातुनच सगळे हे दोष आले आहेत. तर मग त्या मुक्त विचारपध्दतीमध्येच दोष नाही का? मुक्त विचारप्रणाली जिथे नाही तिथे असे कुठलेच दोष नाही आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? किंबहुना जिथे मुक्त विचार प्रणाली नाही तिथे किमान माझ्या दुर्ष्टीकोनातून तर अधिकच आणि फारच गंभीर समस्या दिसून येतात. > तर इतरांना पोथीनिष्ठ, थिजलेल्या विचारसरणीच्या विभागात टाकले आहे. मी असे काहीहि लिहिलेले नाही. कृपया माझ्या लेखनाला असे विनाकारण मिसरेप्रेझेन्ट करू नये.
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/26/2022 - 09:29 नवीन
प्रथम मी तुम्हाला जे 'मी तुमचे लेखनविपर्यास (misrepresent) केला' अशी छाप दिली त्याबद्दल खेद व्यक्त करतो.
मी असे काहीहि लिहिलेले नाही. कृपया माझ्या लेखनाला असे विनाकारण मिसरेप्रेझेन्ट करू नये.
मी फक्त तुमच्या विचार करण्याच्या पध्दतीमधील दोष दाखवुन देत होत. तुलना हि नेहमी बरोबरीच्या गोष्टींची आणि समानतेने करायची असते. दुर्देवाने ते तुमच्या लेखनात दिसत नाही. जसे तुम्ही तुमचे मत सांगितले तसे मी माझे मत सांगितले.
मुक्त विचारप्रणाली जिथे नाही तिथे असे कुठलेच दोष नाही आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?
असे कधीच म्हटले नाही. माझे जर बाकीचे प्रतिसाद बघितले तर त्यांनी भरपुर दोष दाखवुन दिले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/26/2022 - 08:56 नवीन
लेखन आवडले. ''ऋग्वेदांतील "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" हि ओळ परवाच मला एका गोऱ्या माणसाने ऐकवली. त्याच्या मते तुमच्या कुठल्या ऋषी मुनींनी स्वतःला "विश्वगुरू" वगैरे म्हटले ? जे लोक सतत चांगल्या विचारांच्या शोधांत राहतात त्यांना स्वतःला विश्वगुरू म्हणून बढाया मारायला वेळ नसतो'' हे खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 02/26/2022 - 21:34 नवीन
श्री साधना मी लिहीले होते येथे. बघा कसे सगळे अमेरीकन, खंडीय युरोपियन, ऑस्टेलियन आणि इतर देश कसे एकत्र आले. त्यांची स्वत:साठीची मुल्ये वेगळी आणि इतरांसाठीची वेगळी. https://www.aljazeera.com/news/2022/2/25/list-of-sanctions-on-russia-after-invasion युध्द जितके पेटेल तितके युरोपियन लोकांना चांगलेच आहे.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 02/27/2022 - 09:09 नवीन
संबधित लेखः युक्रेनवरून तणाव http://www.misalpav.com/node/49878
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 03/13/2022 - 14:23 नवीन
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 10/03/2022 - 19:35 नवीन
युरोपियन लोकांची दाखवायची मुल्ये आणि प्रत्यक्षातील मुल्ये याचे डोळे उघडणारे दर्शन. तथाकथित मुक्त समाज उघड उघड चोर्‍या करतो आणि सगळे लोक त्याचे समर्थन करतात, हे बघुन शिसारी येते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा