Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल

ब — बाजीगर, Tue, 02/15/2022 - 05:17
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती , पेपरमध्ये वाचले "आम्हा घरी धन,* *शब्दांचीच रत्ने..." _ जगतगुरू तुकाराम मी सुटलो... बुंगाट आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, जुळवू प्रयत्ने, यमके ही. काय हे जाहले, कोसळला बाजार, कोणता आजार म्हणावा हा? जगाचा पोलीस पाटील, तू ते तर मी हे करेन भेदरला बिचारा युक्रेन युद्ध ज्वर लोक हैराण त्यात, निवडणूक धुरळा, जणू अंगावर झुरळा, झटकती वाहक ही गांजले इथे ट्रॅफिक जाम अमृतांजन बाम, चोपडती शिक्षणाचा खेळ खंडोबा तास ऑनलाईन इयत्तेला सलाईन बोंबलाई यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2143 views

💬 प्रतिसाद
ब
बाजीगर Tue, 02/15/2022 - 09:42 नवीन
शार्क = Shark tank Tv show
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 02/16/2022 - 08:38 नवीन
जुळवू प्रयत्ने, यमके ही.
छान, मस्त. 'सुरेख जमून गेलीय रचना !
यात ही कुणी स्मार्ट गाजवी आक्शन शार्क मिळवूनी फुल मार्क स्टार्ट अप!
हे खुप आवडले. बर्‍याच जणांनी छाप पाडून इन्व्हेस्टमेण्टस पदरात पाडून घेतल्या. खरोखर स्मार्ट नवउद्योजक ! मुळात शार्क टँक इंडिया हा कार्यक्रमच आवडला ! || पुढील रचेनेच्या प्रतिक्षेत ||
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Sat, 02/19/2022 - 04:07 नवीन
चौथा कोनाडा जी आपल्या दिलखुलास दाद मुळे उत्साह वाढला आहे, खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा