(शोध)
प्रेर्ना :)
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले
Sat, 02/05/2022 - 07:14
नवीन
क्या बात है क्या बात है =))))
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 02/05/2022 - 09:40
नवीन
हे व्हर्जनही बेस्ट आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Sat, 02/05/2022 - 09:49
नवीन
मस्तच,
अंतरागांतुन वाहणारे
अतंरगाला झोबणारे
बोलतो मी गुढ काही
सत्य कोणी मानणारे
भुवरी या मिळणार नाही
- Log in or register to post comments