Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बर्फावरचा क्रीडोत्सव

प
पराग१२२६३
Fri, 02/04/2022 - 06:36
🗣 0 प्रतिसाद
बीजिंगमध्ये (चीन) 4 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा भरत आहेत. यामुळे एकाच शहरात उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन होणारे बीजिंग हे जगातील एकमेव शहर ठरले आहे. पण त्याचवेळी पूर्णपणे कृत्रिम बर्फावर खेळवले जाणारेही हे पहिलेच हिवाळी ऑलिंपिक असणार आहे. बीजिंग हे या स्पर्धांचे मुख्य ठिकाण राहणार असले तरी काही क्रीडाप्रकारांचे सामने यानकिंग आणि चांगझियाकाऊ येथे खेळवले जाणार आहेत. या ऑलिंपिकवर भारतासह काही देशांनी राजनयिक बहिष्कार टाकला आहे. बीजिंगमध्ये होत असलेले हे हिवाळी ऑलिंपिक 24 वे हिवाळी ऑलिंपिक (XXIV Olympic Winter Games) असून त्यामध्ये 90 देश आणि संघटनांमधून सुमारे 2900 क्रीडापटू सहभागी होत आहेत. या ऑलिंपिकमध्ये सात खेळांच्या 15 प्रकारांचे एकूण 109 सामने होणार आहेत. त्यात महिलांचे मोनोबॉब, महिला आणि पुरुषांचे फ्रीस्टाईल स्किईंग बिग एअर, तसेच फ्रीस्टाईल स्कीईंग एरियल, स्की जंपिंग, स्नोबोर्ड क्रॉस यांचे मिश्र संघ आणि शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंगमध्ये मिश्र रिले हे क्रीडाप्रकार ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेले आहेत. बिंग ड्वेन ड्वेन हा बीजिंग 2022 चा शुभंकर (mascot) आहे. जगात केवळ चीनमध्येच आढळणारा आणि चीनचा राष्ट्रीय प्राणी असलेला विशाल पांडा (Giant Panda) या प्राण्याची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. काओ जियू यांनी हा शुभंकर साकारलेला आहे. बिंग म्हणजे बर्फ, तर ड्वेन ड्वेन म्हणजे मजबूत आणि सजीव. अंतराळवीरासारखा पेहराव केलेल्या बिंग ड्वेन ड्वेनच्या चेहऱ्याच्या भोवतीने वेगवेगळ्या रंगांची कडी करण्यात आलेली आहेत ती वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचे प्रतिनिधित्व करत आहेत. याच्या डाव्या हातावर असलेली लाल रंगाची हृदयाची प्रतिमा हिवाळी ऑलिंपिकसाठी आलेल्या क्रीडापटू आणि दर्शकांप्रती प्रेम व्यक्त करत आहे. बीजिंग 2022 च्या प्रतीकचिन्हाचे (emblem) आरेखन लिन क्यूंजेन यांनी केले आहे. या प्रतीकचिन्हामध्ये चीनची संस्कृती, आधुनिक परंपरा तसेच हिवाळी ऑलिंपिकमधील जोश आणि शक्ती यांचे प्रतिबिंब उमटले आहे. चिनी भाषेतील 冬 (उच्चार - तोंग) या शब्दाच्या वळणानुसार बीजिंग 2022 ऑलिंपिकचे प्रतीकचिन्ह तयार करण्यात आलेले आहे. या शब्दाचा अर्थ हिवाळा असा आहे. हिवाळी ऑलिंपिकमधील खेळांचे मुख्य आधार असलेले स्केटर आणि स्कीअर यांच्या प्रतिमेचा भास या प्रतीकचिन्हाकडे पाहिल्यावर होतो. या प्रतीकचिन्हाच्या मध्यभागी ऑलिंपिकच्या आयोजन ठिकाणाचे प्रतिनिधित्व करणारी एक रिबीन काढलेली आहे. या प्रतीकचिन्हात वापरण्यात आलेला निळा रंग स्वप्न, भविष्य आणि बर्फाच्या शुद्धतेचं प्रतिनिधित्व करतो. त्यानंतर चीनच्या राष्ट्रध्वजाचं प्रतिनिधित्व करणारे लाल आणि पिवळा हे रंगही या त्यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ॲथेन्समध्ये प्रज्वलित करून चीनमध्ये दाखल झालेली बीजिंग 2022 ची मशाल वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मशालीवर ऑलिंपिकच्या बोधचिन्हाबरोबरच चीनची भिंत (Great wall of China), स्किईंग मार्ग आणि प्रकाश, शांती, श्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून एक लाल रंगाची रेषा रेखाटलेली आहे. या मशालीसाठी कार्बन-फायबरचा वापर करण्यात आलेला आहे. तिच्यामध्ये प्रदूषणमुक्त इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर करण्यात आलेला आहे. 4 फेब्रुवारीला बीजिंग 2022 च्या उद्घाटनाच्यावेळी याच मशालीच्या मदतीने मुख्य स्टेडियममधली ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. हिवाळी पॅरालिंपिक 2022 हिवाळी ऑलिंपिकनंतर 13 वे हिवाळी पॅरालिंपिक (XIII Paralympic Winter Games) 4 ते 13 मार्चदरम्यान बीजिंगमध्ये पार पडणार आहेत. त्यामध्ये 6 खेळांचे 78 सामने आयोजित केले जाणार आहेत. शुएय ऱ्होन ऱ्होन हा या स्पर्धांचा शुभंकर आहे. शुएय ऱ्होन ऱ्होन म्हणजे चमकणारा कंदील. चिनी मूलाच्या प्रतिमेचा तो कंदील जगभरातून आलेल्या क्रीडापटूंचे स्वागत करणार आहे. अशा प्रकारच्या कंदिलाला चिनी संस्कृतीत समृद्धी, उत्सव, उज्वल भविष्य याचे प्रतीक मानले जाते. याचे बोधचिन्ह 飞 (उच्चार - फे) म्हणजे उडणे या चिनी भाषेतील शब्दाच्या वळणावरून तयार करण्यात आलेले आहे. लिंक https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_4.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1041 views

🗣 चर्चा

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा