Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!

N — nemake_va_mojake, Sun, 01/30/2022 - 17:02
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली. "या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता. आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर. या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं... दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक माझ्याकडे पाहू लागतात यापैकी कुठल्या पोस्टचा मी टारगेट अॉडिअन्स असेन? असेनच का? कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स. जसं की मी चाललोय भर संध्याकाळी उपनगरीय स्टेशनातून बाहेर या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं स्टार करून ठेवलेल्या पोस्ट्सवर पसरलेली ही भन्नाट धुळीची ऊब माझी कार्यव्यग्रता करते प्रस्थापित आणि आणते खोकला माझ्या रिकामपणाला रात्रंरात्र भिंत नक्षत्रांकित फक्त याच ग्रूपवर या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं नव्या भाषिक फ्लायओव्हरवरून सारे निघालेले असतात भाषाही कडेकडेने आपल्या सावलीची अक्षरं नवलाने बघत जगणारा मी ही भाषिक या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं खूप सारी फुलं, ओंजळी, प्राजक्त, चांदण्या, छानछान वगैरे भिंतीवरच असतात गोंडस शब्दाशब्दातून आल्हाद निथळत असतो शब्दांनी शब्दातीतापासून जिवाच्या आकांताने पळताना निथळावा तसा अर्वाच्य आदराने पाहात राहतो मी हा रोजचा जगण्यासाठीचा कार्डिओ या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं - कौस्तुभ आजगांवकर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1561 views

💬 प्रतिसाद
अ
अनन्त्_यात्री Mon, 01/31/2022 - 04:57 नवीन
किंवा त्यातील काही भाग द्यायला हवा होता
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 01/31/2022 - 12:48 नवीन
छान आहे विडंबन ! आवडलं !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा