Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नवीन फसवणुकीचा प्रकार

क
कासव
Sat, 01/29/2022 - 19:37
🗣 85 प्रतिसाद
सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत ------ प्रसंग १ राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते. १० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. नंतर २ मिनिटांनी त्याला साधा कॉल येतो. त्यात एक पुरुष बोलत आहे. तो म्हणतो की तुझा हा व्हिडिओ मी सोशल करणार. तुझी माझी काही दुश्मन नाही पण मला पैसे हवेत. ५००० रुपये. ते ही आत्ताच दिले तर. नाहीतर दर तासाला ते दुप्पट होणार. २४ तासात पैसे नाही दिले तर हे सोशल होणार. आणि पोलिसांना सांगितले तर लगेचच. राजेश घाबरतो पण तो त्याच्या एका मित्राशी बोलतो आणि ते पैसे द्यायला तयार होतात. आता तो व्यक्ती पैसे बिटकॉइन मध्ये मागतो. आली आता पंचीअत. राजेश ला बितकॉइन बदल काही माहिती नाही. मग तो अजून एकाला फोन करतो. त्या मित्राकडून त्याने बिटकॉईन बदल ऐकलं असतं. तो मित्र त्याला पोलिसाला गाठण्याचा सल्ला देतो. आणि काही घाबरून होणार नाही पैसे तर द्यायचेच नाहीत असे सांगतो. धीर करून हे लोक पोलिस स्टेशन गाठतात. पोलिस म्हणतात हे नेहमीच झालं आहे. Fir करू पण हे आरोपी सापडणार नाहीत. तुमची सोशल अकाउंट बंद करा किंवा सगळे सेक्युरिटी सेटिंग चेक करा. सर्व अनोळखी माणसे ताबडतोब फ्रेंड लिस्ट मधून हटवा. आणि त्या माणसाचा परत फोन आला तर पैसे देत नाही काय करायचंय ते कर म्हना. राजेश ला परत फोन येतो. आणि राजेश पैसे देणार नाही असे सांगतो. तो माणूस खूप घाबरवत असतो तरी. राजेश परत पोलिस ना सांगतो आणि पोलिस त्याला कोणताच unknown नंबर चा फोन उचलू नको म्हणून सांगतात. ४-५ दिवस खूप फोन येतात पण हा व्हिडिओ काही शेअर होत नाही. आणि हळू हळू सगळे कॉल पण बंद होतात. --- प्रसंग २ विलास सकाळी सरकारी दवाखान्यातून COVID chi लस घेऊन येतो. साधारण संध्याकाळी त्याला एक कॉल येतो. पलीकडून आवाज येतो की मी हॉस्पिटल मधून बोलतोय आणि तुम्ही आज लस घेतली का. विलास हो म्हणतो. तो माणूस म्हणतो की तुमचं आधार कार्ड वर लसीच डिटेल अपलोड होत नाहीयेत. तर आधार नंबर परत नीट सांगा आणि एक OTP येईल तो पण सांगा. विलास सावध होतो. तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये येतो आणि काय असेल ते तिथे पाहू. तो माणूस गयावया करतो की ह्यात खूप वेळ जाईल. त्याचे डिटेल अपलोड होत नाही तो पर्यंत पुढच्या लोकांचे पण डिटेल टाकता येत नाहीत. सॉफ्टवेअर थांबलं आहे. त्याला अजून ४२ लोकांचे डिटेल टाकायचे आहेत. आणि त्याची आई घरी आजारी आहे त्याला सगळी काम संपून पटकन घरी जायचे आहे. तरी विलास तयार होत नाही. मग तो माणूस काही ओळखी ची नावे सांगायला लागतो. ह्यांना मी माहित आहे तुम्ही त्यांना विचारा पण आत्ता मला मदत करून घरी जाऊ द्या. विलास तरी ऐकत नाही म्हणल्या वर तो थोडा चिडून बोलायला लागतो आणि सारखं आईच कारण देत बसतो. नंतर तर तो शिव्या पण द्यायला लागतो. दरम्यान विलास कॉल चालू असतानाच हॉस्पिटल मध्ये पोचतो तर तिथे अशी कोणतीच व्यक्ती नसते. सगळे लोक आपापले काम संपवून निघ्यच्या तयारीत असतात. तिथले अधिकारी विलास ला शाबासकी देऊन पोलिस स्टेशन ला घेऊन जातात. ते तिथे रीतसर तक्रार करतात. -- दोन्ही प्रसंगात माझे मित्र वाचले कारण एक जनाने मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि एक जण स्वतःच अलर्ट होता. पण अश्या लोकांचे कॉल खूपच खरे वाटतात. अगदी भाषेचा tone वगैरे आपल्याच भागातला वाटतो एवढे ते सराईत असतात. म्हाताऱ्या व्यक्ती किंवा अलर्ट नसतील तर कोणीही सहज फसू शकतो. ह्यांची जास्त पैस्याची पण अपेक्षा नसते. दिवसाला ५०००-१०००० मिळाले तरी बास. १० लोकांना ट्राय केले की एखादा तरी गळाला लागत असेल. कदाचित वाढती बेकारी करणी भूत असेल. पण ते जास्त कष्ट पण घेत नाहीत. तुम्ही त्यांना हवे तसे वागत नसाल तर ते जास्त वेळ खर्च न करता दुसरा बकरा शोधतात. सर्वांनी खूप सावध रहा. उपयोग झाला नाही तरी रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया वर कमीत कमी माहिती द्या. सर्व security सेटिंग चेक करा. हवं तर मित्रांची मदत घ्या. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांना पण सतर्क करा. अजून काही उपाय किंवा किस्से असतील तर प्रतिक्रिया मध्ये सांगा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24359 views

🗣 चर्चा (85)
प
प्रसाद गोडबोले Sat, 01/29/2022 - 20:03 नवीन
सोप्पा उपाय कोणत्याही अनोळखी नंबर वरुन फोन आला की "नमस्कार बोला, मला फक्त मराठी कळतं , मराठीत बोला . " इतका साधासा उपाय केल्याने जवळपास ९० % येणारे स्पॅम आणो फ्रॉड कॉल्स कमी होतात .
  • Log in or register to post comments
क
कासव Sun, 01/30/2022 - 09:48 नवीन
पहिल्या प्रसंगात मित्र सेक्शुअल् कंटेंट मध्ये घाबरला होता दुसऱ्या प्रसंगात समोरचा माणूस नुसतं मराठीच बोलत न्हवता तर त्याचा tone आणि शब्द प्रयोग आमच्या भागातले वाटत होते. सर्व मार्ग माहित असून ऐन वेळी मती गुंग होते.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 01/30/2022 - 15:54 नवीन
दुसर्‍या प्रसंगात हॉस्पिटलमधला कुणी कर्मचारी भामट्यांना सामील असला पाहिजे नाहीतर तुमचा मित्र लस घेवून चाललाय हे त्या भामट्यांना लगेच कसं कळलं ? पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत आणि थोडा कसून तपास केला तर निदान या प्रकरणातले दोषी पकडले जावू शकतात.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/30/2022 - 16:20 नवीन
भामट्यांचं कोलॅब्रेशन आणि टीमवर्क जबरदस्त असतं. ती एक वेगळी क्रॉस फंक्शनल टीम असते !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 01/31/2022 - 08:13 नवीन
इथे पहिल्या प्रकारचा फ्रॉड एका पत्रकारांने उघड केला आहे. ------------- https://www.facebook.com/109863820490363/posts/482504939892914/
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 01/31/2022 - 09:57 नवीन
+१ हिंदीचं मराठी माणसाला असलेलं खुळ त्याचं नुकसान करून जातं.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 01/29/2022 - 20:33 नवीन
मला व्हॉट्स ॲप वर एक लॉटरी लागल्याचा फोटो आणि एक ऑडियो msg आला. मी तो msg बघितला ऑडियो msg चा फक्त एक शब्द ऐकला आणि सरळ तो नंबर ब्लॉक केला बँकेतून बोलतोय तुमचे कार्ड बंद होईल म्हणून फोन करणारे अडाणी यूपी,बिहारी असतात लगेच भाषेवरून कळत. सरळ शिव्या घालून असे नंबर ब्लॉक करून टाकणे. थोडे सावध राहिले तर फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते.
  • Log in or register to post comments
क
कासव Sun, 01/30/2022 - 09:50 नवीन
हाच मेसेज सांगायचं होता सावध राहा आणि आपल्या मित्रांना पण सावध करा
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 01/30/2022 - 06:12 नवीन
काय आहे ? लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर गेल्या दोन वर्षात असले फसवणुकीचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कासव Sun, 01/30/2022 - 09:45 नवीन
हे लोक नवीन नवीन फंडे काढतात. ते लगेच दुसऱ्यांना कळावे. माझ्या पाहण्यात हे दोन्ही किस्से नवीन होते. आधी बँकेचे kyc वगैरे चालायचे त्याचे हे नवीन version
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 01/30/2022 - 06:55 नवीन
मला एक मेसेज सतत येत असतो तो म्हणजे "तुमचे एस.बी.आय च्या अकाउंट चे केवायसी अजुन पूर्ण झालेले नाही. त्वरीत खालील लिन्क वर क्लिक करुन अपडेट करा." आणि मेसेज मध्ये लिन्क पण असते. पहिल्यांदी खरेच वाटले आणि थोडी भीती वाटली. पण पुढच्याच क्षणी सावध झालो. काही दिवसांनंतर असाच मेजेस बायकोलाही आला. विशेष म्हणजे हा मेसेज फक्त एस.बी.आय अकाऊंट संबंधितच असतो.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sun, 01/30/2022 - 09:27 नवीन
मला मध्ये नेहमी एका लेडीजचा फोन यायचा. दिल्ली कोर्टनसे आपके नाम का समन्स निकल चूका है. क्रिमिनल केस हैं. हमारे लॉयर आपकी सहायता करेंगे. नंबर ब्लॉक केला तर दुसऱ्या नंबरवरून फोन यायचे. चार दिवस सतत हरेसमेंट चालू होती. शेवटी दम दिला आणि म्हटले ऐसा कितना पैसा मीलता है तुमको लोगोंको फसाकर.मेहनत करके इमानदारीसे पैसे कमाओ ना. मैं जिंदगीमें कभी दिल्ली गया नाही. किसको बेवकुफ बना रहे हो. त्यांनतर कुठे ते फोन बंद झाले. दुसरं इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणचे छोटा लडका हॉस्पिटलमें क्रिटिकल कंडिशनमें है, आप तुरंत पैसे की मदद करेंगे तो उसकी जान बच जायेगी. हम अमुक ढमूक एन जी ओ से बोल रहे है आणि अगदी इमोशनल होऊन ती बाई/मुलगी लगेच ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायला सांगायची. नाही म्हटले की लगेच टोन बदलून शिव्या द्यायला सुरुवात करायची. कोण असतात हे लोक ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 01/30/2022 - 15:56 नवीन
. दिल्ली कोर्टनसे आपके नाम का समन्स निकल चूका है. क्रिमिनल केस हैं.
तुमच्याकडे तिकोनाचं ब्रॉडबँड होतं आणि नंतर तुम्ही ते बंद केलं असं काही आहे का ? तिकोना कंपनी सोडून गेलेल्या ग्राहकांना नाहक त्रास देण्याकरिता बदनाम होती.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 01/31/2022 - 04:19 नवीन
हो, तिकोनाचे ब्रॉड बँड होते आधी. हे कारण असेल माहीत नव्हते. वात आणला होता त्या समन्सच्या कॉलने.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 02/02/2022 - 12:12 नवीन
+१ मीपण तिकोना बंद केल्यावर तीन चार वर्षे 'तीस हजारी कोर्टातून' कॉल येत. नंतर कंटाळून त्यांनी कॉल करणं बंद केलं :)
  • Log in or register to post comments
क
कासव Sun, 01/30/2022 - 09:52 नवीन
https://www.lokmat.com/pune/sextortion-has-become-a-business-in-many-villages-of-rajasthan-shocking-type-in-front-of-pune-police-investigation-a727/ आजचा लोकमत
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/30/2022 - 15:17 नवीन
डेंजर आहे हे !
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Sun, 01/30/2022 - 13:08 नवीन
मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. पण त्याचीच ब्ल्यु फिल्म म्हणजे नक्की कशी फिल्म. कॉल करून त्यातून काही क्लिप वापरून म्हणजे नक्की काय केलं होतं?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 01/30/2022 - 17:25 नवीन
एफबी वर स्त्री आयडी ची फ्रेंड रिक्वेस्ट येते. प्रोफाइल फोटो हा सुंदर असतोच पुरुष ती विनंती मान्य करतात,बऱ्याच पुरुषांची स्त्री ही कमजोरी असते . त्या नंतर messenger वर hi करून ती स्त्री संवाद साधते. त्यांना थोडा फार अंदाज आल्या नंतर ती स्त्री च व्हॉट्सॲप नंबर देते आपण सेक्स चाट करू असा असा msg असतो. पण हे fraud स्त्री आयडी messenger वर चाट करत नाहीत Messenger वर चाट पासून व्हिडिओ call पण करता येतो व्हॉट्स ॲप जी सुविधा देते ती सर्व सुविधा fb messenger पण देते. मग ह्या व्हॉट्स ॲप वर चाट करण्यास फक्त एकाच कारणासाठी आग्रही असतात तिथे तुमचा काँटॅक्ट नंबर भेटतो आणि नंतर धमकी देण्यासाठी त्यांना तो उपयोगी पडतो. कोण अनोखळकी एफबी स्त्री फ्रेंड व्हॉट्स ॲप चाट चा आग्रह करत असेल तर सावधान व्ह्या.
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Sun, 01/30/2022 - 18:02 नवीन
माहितीसाठी धन्यवाद, पण कॉल करून ब्ल्यु फिल्म विडिओ तयार करतात म्हणजे काय करतात हे अजुनही कळलं नाही.
  • Log in or register to post comments
क
कासव Sun, 01/30/2022 - 18:29 नवीन
कॉल करून तुम्हाला ते उत्तेजीत करतात. तुम्हाला पण नग्न होण्यास भाग पाडतात. काहीच नाही तर गेल्या बाजारी आपल्या तोंडचे हावभाव बदललेले असतातच. त्याच क्लिप कट करून बेमालूम पने दुसऱ्या ब्ल्यू फिल्म मध्ये चीतकवल्या जातात. पाहणाऱ्याला असे वाटते की तुम्हीच त्या फिल्म चे हिरो किंवा व्हीलन आहेत. Btw fb messager वर नाही तर WhatsApp कॉल आलेलं. आत्ता तुमचा नंबर मिळवणे सहज सोपा झालं आहे. कमीतकमी linkd इन ल तरी आपण खरा नंबर देतोच आणि ह्या लोकांकडे linked in चे subscription असतील सायबर सेल ला ह्यांना पकडणे कठीण नाही पण केस हाई प्रोफाइल पाहिजे. मग अर्धे काम मीडिया च करेल
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/30/2022 - 18:32 नवीन
युपीए मध्ये गृहमंत्री श्री चिदंबरम ह्यांना मार्केटींगचे कॉल आल्याने भारतात DND यादी सुरु झाली.
सायबर सेल ला ह्यांना पकडणे कठीण नाही पण केस हाई प्रोफाइल पाहिजे. मग अर्धे काम मीडिया च करेल
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 02/02/2022 - 08:26 नवीन
आपल्या विचारांत अत्यंत तर्कदूषिता आहे. > आणि चुकीच्या सिलेक्शन मुळे मानव जात नामशेष होईल ही कदाचित. नाही होणार. लोकांनी मुलींचे ऍबॉर्शन करत राहिले तर हळू हळू मुलींचा भाव वाढत जाईल. > इतक्या मानव प्राण्यांची आणि त्यातले बरेच जे शासनावर भार आहेत किंवा असतील त्यांची पृथ्वीवर गरज आहे का? शासन कसला डोंबलाचा भार घेते ? आणि कुणी सांगितलेय ह्यांना भार घ्यायला ? शासनाने ह्यांचा भार घेऊ नये असे आपले म्हणणे असेल तर १००% बरोबर आहे. पण लोकांना आधीच मारावे ह्याला काहीही अर्थ नाही. > सनाने प्रत्येक आळशी, अन्स्कील्ड आणि अनप्रॉडकटिव्ह व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी का घ्यावी? घेऊ नये. सरकारने कुठल्याही फुकटयाला पोसू नये पण तो फुकटा आपल्याला पाहिजे ते काम करू इच्छित असेल तर त्याच्या कामांत आडकाठी सुद्धा करू नये. लोक शासनाचे गुलाम नाहीत. शासनाने लोकांची कुठलीच जबाबर्दारी घेऊ नये आणि शासन ती आपण घेऊन घेतोय म्हटल्यावर लोकसुद्धा शासनाची प्रॉपर्टी ठरत नाही. सिलेक्टिव्ह ब्रीडिंग नावाचा प्रोग्रॅम आणला तर आपल्या सारख्यांचे काय होईल असे तुम्हाला वाटते ? आणि समाज उद्या तुम्ही वृद्ध झाला निरुपयोगी झाला तर सरकार किंवा तुमची मुळेच तुम्हाला कदाचित मृत्यूकेंद्रांत नेवून टाकतील. > हा विचार कधीतरी प्रत्यक्षात विचारला जाईलच. हा विचार पुरातन ग्रीक तसेच अमेरिकेत सुद्धा युजेनिक्स नावाने प्रत्यक्षांत आणला गेला होता. चालला नाही आणि सपशेल फेल झाला. आता भारताचेच उदाहरण घ्या. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जे मूर्खपणाचे कायदे सरकारने काढले आहेत ते अत्यंत नीच प्रकारचे आहेत. मागे एकदा स्त्री कल्याण मंत्रालयाने स्त्री भ्रूण हत्येविषयी पत्रक काढले होते. त्यात माहिती दिली होती. "हे असेच चालू राहिले तर तुमच्या मुलांना लग्न करण्यासाठी स्त्री आणि मुले निर्माण करण्यासाठी आई मिळणार नाही" थोडक्यांत काय तर एका बाजूने स्त्री चे वस्तूकरण करू नका म्हणून बोंब मारायची तर दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणजे तुमच्या पोरांसाठी बायको आणि नातवंडा साठी गर्भाशय असे दाखवून खूपच खालच्या प्रकारचे वस्तूकरण करायचे. माझ्या मते एखादा समाज "पुरुष" प्रेमी असेल तर त्याचे चांगले वाईट परिणाम सुद्धा त्याच समाजाने भोगले पाहिजेत. समजा मुलींची संख्या कमी झाली आणि त्यामुळे समाजाला खूप वाईट परिणाम भोगावे लागले तर कदाचित त्यातून लोक योग्य तो धडा घेतील. बरे कायदा केला म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. आज अनेक जोडप्याना मुलाच्या लिंगाचा फरक पडत नाही. पण तरी सुद्धा ह्या घाणेरड्या कायद्याने मुलाला गर्भांत हलताना पाहायची सोपी सुविधा मिळत नाही. आपल्याच शरीराचे रिपोर्ट्स पाहायला मिळत नाही. पण तुम्ही गरीब असाल तर ! माझ्या माहितीचे अनेक लोक सध्या UAE मध्ये जाऊन लिंग निदान करून घेतात. भारतीय डॉक्टरांनीच तिथे दुकाने थाटली आहेत. नाहीतर काही लोक IVF करून घेतात आणि पाहिजे ते लिंग निवडतात, गर्भपातापेक्षा हे जास्त सुरक्षित. ह्यांत दुसरी भर पडली आहे ती अंधश्रद्धा वाल्यांची. आम्ही लिंग निदान करून देतो. नाडी परीक्षा पासून पोटाला हात लावून सांगतो पर्यंत चे अनेक खोटे एक्सपर्ट निर्माण झाले आहेत. अमुक खावेसे वाटले तर मुलगीच आहे. तमुक खाऊन उलटी झाली तर मुलगा वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 02/02/2022 - 11:03 नवीन
हा प्रतिसाद दुसर्‍या लेखाच्या धाग्यावर प्रकाशित करायचा होता का?
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Sun, 01/30/2022 - 19:03 नवीन
ओह आय सी. अननोन लंबरवरून आलेले विडिओ कॉल्स यंटरटेन करणार्‍या वल्नरेबल लोकांना एड्युकेट करणं अवघड आहे. आपलं नाणं खणखणीत नसेल तर मं फोलिसात जायची पण भिती वाटते. तसंही लुंग्यासुंग्याना फोलिस किती भाव देतील हा प्रश्नच आहे. त्यांच्या मागे वजनदार असामी किंवा टिआरपी देणारा त्यावेळचा ट्रेंडीग ट्वापिक असेल तर यफआयार नोंदवायचे कष्ट घेतले जातील.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/30/2022 - 19:14 नवीन
सगळे क्रमांक मोबाईलमध्ये किंवा ओळखता येतात का असतात का?
ओह आय सी. अननोन लंबरवरून आलेले विडिओ कॉल्स यंटरटेन करणार्‍या वल्नरेबल लोकांना एड्युकेट करणं अवघड आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 01/30/2022 - 19:33 नवीन
खरी पोलिस केस करून पैसे उकळणे हा लांब चा आणि बेभरवशाचा मार्ग आहे कोर्टात काय निकाल लागेल हे सांगता येत नाही ज्यांना फक्त सेक्स कॉल करून मिळालेली नग्न फोटीस,व्हिडिओ ह्यांचा वापर फक्त भीती दाखवण्यासाठी च करणार ते काही पोलिस केस करणार नाहीत. कारण गुन्हा करणारे ते असतात .त्यांना अनेक बकरे हवे असतात. ज्या व्यक्ती बाबत असा प्रसंग घडतो त्याने संयम ठेवला आणि धीर धरून त्यांच्या धमकीला भीक घातली नाही तर अशा फ्रौड लोकांचा हेतू साध्य होणार नाही .
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान Sun, 01/30/2022 - 19:56 नवीन
नै म्हणजे अनोळखी नंबर वरून कॉल्स घ्यायला हरकत नाही पण अनोळखी नंबर वरून आलेले विडिओ कॉल अ‍ॅक्सेप्ट करून नग्न होवून किंवा पलिकडचं दृष्य बघून अनोळखी लोकांना आपल्या चेहर्‍यावरचे हॉर्नी हावभाव दाखवणं म्हणजे थोडं टू मच वाटलं इतकच. बाकी लोकांच्या स्खलनशीलतेचा फायदा घेवून लुबाडणुक करणं चूक हे मान्यच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/30/2022 - 14:08 नवीन
विमानाच्या तिकीटाचे पैसे मागतात .. लाॅटरीच्या जॅकपाॅटचे तर पेव फुटले होते ... सगळे पैसे मिळाले असते तर, किमान 2-4 ट्रिलियन डॉलर, नक्कीच खात्यात आले असते...
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 01/30/2022 - 15:00 नवीन
माझा एक सहकारी बँकेत जाण्याची परवानगी मागायला आला. त्याला सहज विचारलं काही विषेश तो म्हणाला माझ्या मुलीला नोकरीचा काँल आलाय त्यांनी वीस हजार रुपये आनामत भरायला सांगितले आहे. खोलात गेल्या वर लक्षात आले की फसवणूक होणार आहे त्याला समजावले आणी परावृत्त केले. थोडा नाराज झाला. पण एका आठवड्याने जेव्हां त्याच्या मुलीच्या मैत्रिणीचे पैसे गेले तेव्हां त्याची नाराजी दुर झाली आणी माझे आभार मानले . कधी मजबुरी तर कधी लालच यामुळे फसवणूक करणार्‍या चे फावते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/30/2022 - 18:30 नवीन
असे छगनलाल, गल्लोगल्ली आहेत... फार पुर्वी ह्यावरून एक लेखमाला लिहीली होती... छगनलालांचे सापळे...https://www.misalpav.com/node/22087
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 01/30/2022 - 15:04 नवीन
मला २००३ मध्ये नोईडामध्ये नोकरी मिळेल आणि ५०० रुपये अनामत रक्कम जमा करायला सांगितली होती.
मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 01/30/2022 - 15:33 नवीन
सध्या नवीन प्रकारः १) ध्वनिमुद्रीत संदेश ऐकवला जातो की भारतीय आयुर्विमा महामंडळाने एक नवीन आजन्म वीमा योजना सुरु केली आहे. अधिक माहितीसाठी १ दाबा हा कॉल अनेक नंबरांवरुन येतो. आपण कसलाही प्रतिसाद न देणं उत्तम. एल आय सी ची अशी कुठलीही पॉलिसी नाही, एल आय सी असे फोनही करत नाही २) " आपली ----- साली घेतलेली **** कंपनीची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे, बोनस सह एकुण रक्कम तीन लाखाच्या आसपास आहे. आपला काही तपशिल, के वाय सी वगैरे नसल्याने ती रद्द करण्यासाठी आली आहे." रद्द करा असं सांगुन मोकळं व्हायचं. न काढलेल्या पॉलिसीच्या पैशाचा मोह टाळावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/30/2022 - 18:09 नवीन
सासरेबुवांचे सगळे आर्थिक व्यवहार, आमची सासूच बघत असल्याने, फसवणूक झाली नाही...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sun, 01/30/2022 - 18:21 नवीन
1 दाबल्यावर काय होतं?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 01/30/2022 - 15:39 नवीन
Lic ची पॉलिसी mature झाल्या नंतर lic वाले कॉल करतात.पण अधिकृत lic ऑफिस च्या फोन वरून .मोबाईल वरून नाही. आपण राहतो त्या भागातील lic एजंट ला पण आपली माहिती देतात. ते एजंट कॉल करतात काही मदत हवी आहे paper वर्क करण्यासाठी. पण हे सर्व अधिकृत असते. गेल्या वर्षी मी हा अनुभव घेतला आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 01/30/2022 - 15:51 नवीन
गेल्या वर्षी मी हा अनुभव घेतला आहे.
आपला अनुभव सविस्तर वाचायला आवडेल.
आपण राहतो त्या भागातील lic एजंट ला पण आपली माहिती देतात.
जर तुमच्या भागातील त्या एजंटचा फोन नंबर वगैरे मिळाला तर आणखी बरे होईल.
पण हे सर्व अधिकृत असते.
म्हणजे मला अधिकृतरित्या अधिक माहीती मिळवता येईल. तुमच्या या संदेशामुळे एखादा "सावध" माणूस "बेसावध" होण्याची भिती वाटल्याने एवढे सगळे लिहीले. :)
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 01/30/2022 - 16:25 नवीन
गेल्या वर्षी मार्च मध्ये माझी एक Lic पॉलिसी mature झाली .दोन महिने अगोदर Lic चा टेक्स्ट msg आला. ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि maturity फॉर्म भरून Lic ऑफिस मध्ये जमा करा. Lockdown चा काळ होता .त्या ज्याच्या कडे पॉलिसी काढली होती तो एजंट मित्र होता त्याची मदत घेतली त्यांनी सर्व कागद पत्र Lic मध्ये जमा केली. पंधरा दिवस बाकी असताना lic branch ऑफिस मधून एका ladies नी कॉल केला आणि कागद पत्र जमा केली आहेत का ह्याची माहिती करून घेतली आणि तो अधिकृत ऑफिस चा नंबर होता त्या मुळे गैर असे त्या मध्ये काही नव्हतं. नंतर एक दोन दिवसांनी एका एजंट चा कॉल आला . ह्या महिन्यात mature होणाऱ्या पॉलिसी ची लिस्ट आम्हाला lic नी दिली आहे आणि त्या मध्ये तुमचा पण काँटॅक्ट नंबर आहे. म्हणून तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी मदत करीन असा कॉल. मी त्याला मी सर्व कागद जमा केले आहेत आणि तुमच्या मदती च गरज नाही असे सांगितले. त्यांनी पण जास्त आग्रह केला नाही . आणि त्या नंतर परत कॉल पण केला नाही कमिशन साठी पॉलिसी mature होणाऱ्या लोकांची लिस्ट एजंट ला पुरवत असावेत असा एक अंदाज पण इथे फसवणूक हा प्रकार नसावा म्हणून मी अधिकृत असा शब्द वापरला होता.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 01/31/2022 - 16:25 नवीन
ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि maturity फॉर्म भरून Lic ऑफिस मध्ये जमा करा.
या एका वाक्याने माझे सगळे संशय फिटले. _/\_
  • Log in or register to post comments
म
मनो Sun, 01/30/2022 - 17:10 नवीन
टेलिकॉम क्षेत्रात काम करत असल्याने सांगतो - कॉलर आयडी, म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर हा काहीही, हवा तसा सेट करता येतो. घरबसल्या लॅपटॉपवरून VoIP द्वारे असे उद्योग करणे अगदी सोपे आहे. त्यामुळं अधिकृत काय आणि अपरिचित काय, कोणत्याच नंबरवरून आलेला कॉल विश्वसनीय नाही. अश्या वेळी कॉल कट करून इंटरनेटवरून योग्य नंबर शोधून अधिकृत कॉल सेंटरला आपण स्वतः कॉल लावावा. असे कॉल वाढण्याचे कारण म्हणजे बेरोजगारीचे वाढते प्रमाण.सरकारी नोकरीवर पडणाऱ्या उड्या आणि नोकरीसाठी चालणाऱ्या आंदोलनातून हेच दिसते आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/30/2022 - 18:16 नवीन
तुमच्या वडिलांचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा अपघात झाला आहे... आंखो देखा किस्सा... मी, माझा मावस मेहुणा आणि त्याचे वडील, घरीच बसलो होतो. थोड्या वेळाने मेहुण्याला फोन आला मेहुणा ... हॅलो पलिकडून... आपण फलाणा ढेकणा का? मेहुणा ... हो पलिकडून... तुमच्या वडिलांचा आत्ताच अपघात झाला, हाॅस्पीटल मध्ये दाखल केले आहे, त्यांनीच तुमचा मोबाईल नंबर दिला, हाॅस्पीटल मध्ये अनामत रक्कम भरायची आहे, पैसे पाठवा...
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा Mon, 01/31/2022 - 05:19 नवीन
2 महिन्यापूर्वी ओलेक्स वर मुलाची सायकल विकायला काढली. 6000 रु किंमत ठेवली होती. त्याच दिवशी सुमारे 3 तासांनी ओलेक्स वर मेसेज आला की सायकल आवडली 5500 देतो. पुढच बोलण्यासाठी मोबाईल नंबर द्या. सगळ हिंदीत. वस्तू न बघता भाव ठरवणे, एक प्रकारची घाई या वरून शंकेची पाल चुकचुकली होतीच. पण तरी पुढे गेलो. त्याने whatsap वरून संपर्क केला. Dp मध्ये देवाच चित्र होतं. मी थोडी घासाघीस करता तो सरळ 6000 द्यायला तयार झाला. मग म्हणाला की मी ऑनलाईन व्यवहार करतो. तुम्हाला स्कॅनर पाठवतो. तो स्कॅन करा पैसे जमा होतील. त्याच डाव मला समजला त्यामुळे पुढं जाहिच केला नाही. त्याने मका कॉल करून विचारलं. तेव्हा त्याला सांगितलं की मला ही ट्रिक माहिती आहे. तेव्हा तो हसून बोलला की "ठीक है". त्याचा नंबर मी ओलेक्स ला रिपोर्ट करून ब्लॉक केला.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 01/31/2022 - 06:17 नवीन
पण qr कोडे स्कॅन केल्या मुळे पैसे कसे संबंधित व्यक्ती च्या अकाउंट मध्ये जातात ते समजत नाही. आणि अशा बऱ्याच केसेस ओलेक्स च्याच आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 01/31/2022 - 06:25 नवीन
मी डॉक्टर असल्याने मला रुग्णांचे अनेक अनोळखी फोन येतात तेंव्हा अनोळखी क्रमांक न उचलणे शक्य नाही. येणारे फोन आणि त्याला मी दिलेली उत्तरे -- यानंतर मी ते फोन ब्लॉक करून टाकतो १) तुम्हाला लॉटरी लागली आहे तेंव्हा या नंबरवर फोन करा. मी त्यांना दवाखान्याच्या पत्त्यावर डिमांड ड्राफ्टने पैसे पाठवा सांगितले. फोन कट २) तुमचे एस बी आय च कार्ड किंवा खाते ब्लॉक होईल केवायसी अजुन पूर्ण झालेले नाही. त्वरीत खालील लिन्क वर क्लिक करुन अपडेट करा." माझं उत्तर -- माझं एस बी आय चा कार्डही नाही आणि खातं हि नाही -- फोन कट ३) एल आय सी ची पॉलिसी मॅच्यूअर झाली आहे -- माझी एल आय सी ची पॉलिसी नाहीच ४) डॉक्तरांसाठी खास व्याजदराने कितीही कर्ज उपलब्ध आहे-- माझा वय ७८ वर्षे आहे. १५ वर्षासाठी कर्ज मिळेल का? फोन कट. जस्ट डायल वर माझ्याऐवजी त्या मूर्खांनी माझ्या वडिलांचा फोटो लावलेला आहे. तीन वेळेस सांगूनहि उपयोग झालेला नाही. ५) सुझान बेटी एड्रियाना इ माझ्याशी गप्पा मारण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत किंवा त्यांना ३० कोटी डॉलर्स धर्मार्थ द्यायचे आहेत सारखे अनेक इ मेल माझ्या स्पॅम फोल्डर मध्ये रोजच येत असतात ( माझी मेल .CO.UK आहे) ६) माझं पेटीएम खातं के वाय सी नसल्याने बंद होईल म्हणून एक माणूस वारंवार फोन करत असे आणि पोलिसात जाण्याची धमकी देउनही बधत नसे. शेवटी कंटाळून एका रिकाम्या दिवशी त्याचा नंबर माझ्या दवाखान्याच्या खाली "नोकरी चाहिये" या जाहिरातीत तसेच "बजाज फायनान्स" कारवाले, कार ट्रेड, रुणवाल बिल्डर, शेठ बिल्डर, इंडियन पॉर्न, लिंग बढाइये सारख्या पॉर्न साईट वर "चिमा साहेब" नावाखाली त्याचा नंबर टाकला. पोट भरून हसलो आणि नंबर ब्लॉक केला.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/31/2022 - 06:35 नवीन
शेवटचा उपाय जालिम आहे, एकदा करुन बघितला पाहिजे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 01/31/2022 - 06:40 नवीन
मी बायजुच्या साईट नेहमी वापरते. बंगलोरहून उठसूट फोन यायचा, व स्कालरशिप मिळेल हे करा ते करा! ब्लॉक केला शेवटी!खरा बायजु कडून होता की फसवणूक माहिती नाही.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 01/31/2022 - 07:51 नवीन
गूगल वर आपण जे seaech करतो त्या विषयातील जाहिराती येणे हे समजू शकतो. आपण उस्तुकाता म्हणून काही चावट,कर्ज विषयी,अशा विषयात सर्च केले की . तसे कॉल पण येणे सुरू होते आपली सर्च हिस्टरी लीक कशी होते हा प्रश्न उभा राहतोच
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 01/31/2022 - 07:59 नवीन
टोर न्याहाळक (ब्राऊझर) https://www.torproject.org/download/ आभासी जोडणी (VPN) वापरा अजुनही त्रास होत असेल तर व्हर्चुअलबॉक्स https://www.virtualbox.org/wiki/Downloads व्यवस्थापित करुन हवे ते करा.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 01/31/2022 - 08:04 नवीन
चांगली माहिती दिल्या बध्दल.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 01/31/2022 - 08:02 नवीन
आता कमी झाले पण पाहिले टीवी चॅनल शॉपिंग चे कार्यक्रम चालवायचे त्याकाळी स्लिम होण्या पासून सोफे,विविध किचन उपयोगी वस्तू,साड्या ,अगदी सेक्स stamina वाढवणारी औषध . सर्व असायचे. कोण तरी गोरा डेमो दाखवून जाहिरात केली जायची साड्या विषयी असे कार्यक्रम खूप होते.त्या खाली काँटक्ट नंबर यायचे. एकदा दुपारी असाच तो कार्यक्रम बघत असताना दिलेल्या नंबर वर कॉल केला. तो प्रॉडक्ट घ्या म्हणून सांगत होता मी नको मला त्याचे दर पटत नाहीत म्हणून कॉल कट केला. नंतर त्यांनी स्वतः परत कॉल केला. तेव्हा रागानी शिव्या देवून कॉल ठेवून दिला आणि तो नंबर ब्लॉक केला . त्या दहा मिनिट तरी विविध नंबर वरून कॉल करून त्रास दिला. नंबर ब्लॉक केला की दुसऱ्या नंबर वरून कॉल करायचा शेवटी मीच माझा तो नंबर airplane मोड वर टाकला. अशा टीव्ही वर चालणाऱ्या कार्यक्रम मधील नंबर वर कधीच कॉल करू नका. ते पण fraud असतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा