ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
- पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी
- केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा
- मध्यप्रदेशचे गृहमंत्री: श्री नरोत्तम मिश्रा
हे व केंद्र-राज्य शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का? आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो .याला जबाबदार कोण? स्वातंत्र्य मिळून ७ ०वर्षे झाल्यावरही हे प्रश्न अजून असावेत हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. नबाब मलीक, संजय राऊत यांच्यावर बदाबदा बातम्या ओतणारे या बाबतीत गप्प का बसतात? हे विचारणे हे खरेतर नागरीक म्हणून आपले काम आहे. जी राज्ये मागास आहेत त्या राज्यांनी कितीतरी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री दिले आहेत. पण त्या राज्यात उद्योग कधी आले नाहीत. आलेले उद्योग घालवण्यात त्यांच्या नेत्यांनी धन्यता मानली. तेथील जनता पोटासाठी इतर राज्यात जाते. याचा जाब ना त्या जनतेने कधी विचारला ना मिडीयाने.