Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कविता

अ — अनन्त्_यात्री, Mon, 01/17/2022 - 12:39
कामधेनूच्या कासेचे दूध म्हणजे कविता डंखानंतर मिळे तो मध म्हणजे कविता कल्पवृक्षाच्या छायेचे छत्र म्हणजे कविता अनाहत गुंजणारा मंत्र म्हणजे कविता किनार्‍याला जोखणारी लाट म्हणजे कविता अज्ञेयाला भिडणारी वाट म्हणजे कविता दहा दिशांनी घेरती अपरात्री पाश तिचे दिवसाच्या धगीमधे पार वितळे कविता

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3248 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Mon, 01/17/2022 - 13:43 नवीन
कवीता म्हणजे सुंदर शब्दचित्रे , कदाचित देवाला वाटले आसेल की मर्यादित कागदाचे, कॅनव्हास चे तुकडे , तोकडे ब्रश किवा बारा रंगाची रगंपेटी अमर्यादित प्रतीभेला चितारताना तोकडी, कमी पडतील. म्हणून त्याने काही कवी बनवले ज्यांनी शब्द रंग उन्मुक्त पणे उधळत एका पेक्षा एक अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या.जसे बालकवी ठोंबरे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 01/17/2022 - 18:58 नवीन
कविता आवडली!
किनार्‍याला जोखणारी लाट म्हणजे कविता अज्ञेयाला भिडणारी वाट म्हणजे कविता
खूप छान!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 01/17/2022 - 19:50 नवीन
नीरस काव्यमळीची रम म्हणजे विडंबन डंखानंतर येई ती सूज म्हणजे विडंबन एरंडवृक्षाची रचलेली होळी म्हणजे विडंबन चु-कवितेची उतरवलेली चोळी म्हणजे विडंबन
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/18/2022 - 04:43 नवीन
मूळ कविता वाचायला प्रेरीत करते ते विडंबन वाचताना हलके स्मित उमटवते ते विडंबन कवितेची बलस्थाने अधोरेखित करते ते विडंबन आणि कवितेतल्या निसटत्या बाजू दाखवते ते ही विडंबनच पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 01/18/2022 - 06:38 नवीन
"निसटत्या बाजू" शब्दप्रयोग बर्‍याच दिवसांनी वाचला
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/18/2022 - 04:56 नवीन
कवीच्या भावनांचे शब्दरुप म्हणजे कविता, रसिकांच्या भावनांना साद घालते ती कविता रच्याकने:- कविता म्हटले की काळजात कचकन कळ जाते आणि मग किती तरी वेळ तिचा चेहरा डोळ्यासमोर येत रहातो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 01/18/2022 - 06:56 नवीन
तुम्हाला कवितेच्या आठवणी आहेत , आम्हाला सवितेच्या आठवणी आहेत . काय फॅन होतो आम्ही सविता भाभींचे . तिच्या नुसत्या आठवणीने कॉलेजचे दिवस आठवले . काय आतुरतेने तीची वाट पहायचो दर वीकेन्डला ! हन्त हन्त , गेले ते दिवस , राहिल्या त्या आठवणी =))
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/18/2022 - 08:36 नवीन
कविता आवडली. पैजार बुवा आणि मार्कसभौ दोघांची भर देखील छान! :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/23/2022 - 02:59 नवीन
वाह! सुखावलो वाचताना ती कविता
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 50 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा