Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सारे प्रवासी घडीचे

क — कर्नलतपस्वी, Sun, 01/16/2022 - 09:59
या चंद्रमौळीत माझ्या लक्ष सुखे ऱममाण असते कधी सुखाला सांगा कुठे परिमाण जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या तिरीप कोवळ्या उन्हाची भासे जणू ही रेघ सोनसाखळी गळ्याची वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो घुसतो धटिंगण वारा सवे आणतो थेंब पावसाचे उध्वस्त करू पहातो साम्राज्य माझिया सुखाचे कोणी गरीब म्हणूनी हसती मजवर सारे इथे काय आहे म्हणूनी आकलेचे तोडती तारे सारे प्रवासी घडीचे सांगा कोण कुठे काय नेते समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे या चंद्रमौळीत माझ्या ...... १६-१-२०२२

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5885 views

💬 प्रतिसाद
B
Bhakti Sun, 01/16/2022 - 12:40 नवीन
या चंद्रमौळीत माझ्या खुप छान!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 01/16/2022 - 13:22 नवीन
खूप छान.
समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे
खरं आहे!
सारे प्रवासी घडीचे
_/\_
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 01/16/2022 - 18:06 नवीन
प्रतीसादा बद्दल धन्यवाद भक्ती, श्रीगणेशा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/17/2022 - 05:39 नवीन
मस्त... फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/17/2022 - 06:57 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/17/2022 - 06:51 नवीन
छान लिहिले आहे
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/17/2022 - 07:08 नवीन
नीड़ न दो, चाहे टहनी का आश्रय छिन्‍न-भिन्‍न कर डालो, लेकिन पंख दिए हैं, तो आकुल उड़ान में विघ्‍न न डालो। नुकताच हँप्पी बड्डे झाला, मुलीने सटर फटर गोष्टिंबरोबर दोन कवीता संग्रह पण दिले. पैकी एक वरील कवीता वाचताना सहज वाटले की वरिष्ठ नागरीकांची सुद्धा कदाचित हिच आपेक्षा की आम्हाला आमचं जगू द्या. विचार करत असताना वरील ओळी सुचल्या. प्रतिसादा करता धन्यवाद. तुम्ही तर मुक्त विहारी .....
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 01/17/2022 - 12:10 नवीन
डेबूजी झिंगराजी जानोरकरांचे सहधर्मी निघालात! दृष्टिकोन आवडला!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/17/2022 - 12:33 नवीन
कविता वाचताना मला तर माणिकदेव बंडुजी इंगळे यांची आठवण आली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/17/2022 - 13:20 नवीन
कहा राजा भोज कहा गंगू तेली, थोडा वेळ तर्रर्र च्या झाडावर चढवल्या बद्द्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/17/2022 - 13:14 नवीन
धन्यवाद अनंत यात्री. धाग्यावर मग तो कुणीही लिहीलेला असू द्या तो वाचताना कधी कधी। semaphore flag code आणि International Morse Code सारखा वाटतो. डिसायफर करता येत नाही. धन्यवाद माऊली.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/18/2022 - 06:41 नवीन
ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा वा छान कल्पना
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 01/18/2022 - 07:41 नवीन
वाचकांचा प्रतिसाद लेखकास हुरूप देतो, like Boost or Bournvita. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Tue, 01/18/2022 - 09:07 नवीन
या झोपडीत माझ्या, आमच्या पिताश्रींना अभ्यासक्रमात असलेली कविता, आजही तोंडपाठ आहे त्यांना. तीच आठवली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 48 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 1 minute ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 2 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 4 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 8 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा