Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कझाखस्तानमधील अशांतता

प
पराग१२२६३
Fri, 01/14/2022 - 18:54
🗣 97 प्रतिसाद
कझाख सरकार सरकारने 1 जानेवारी 2022 पासून स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान रद्द केल्यावर त्याचे दर जवळजवळ दुपटीने वाढले. त्याविरोधात जनतेने सुरू केलेल्या शांततापूर्ण निदर्शनांना अचानक हिंस्र स्वरुप आले आणि त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरण्याची भिती निर्माण झाली. अलमातीच्या विमानतळावरही त्या हिंसक निदर्शकांनी अल्प काळासाठी ताबा मिळवला होता. या हिंसाचारात 18 पोलिस आणि 164 सामान्य नागरिकांचे प्राण गेले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कझाख राष्ट्रपती कासिम-जोमार्त तकायेव (Kassym-Jomart Tokayev) यांनी पंतप्रधानांना पदावरून हटवले आणि सरकार तातडीने बरखास्त केले. पाठोपाठ देशात 19 जानेवारीपर्यंत आणीबाणी जाहीर केली. त्याचवेळी हिंसाचार करणारे दहशतवादी असून त्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश सुरक्षादलांना दिले. त्यापाठोपाठ सामूहिक सुरक्षा करार संघटनेच्या (Collective Security Treaty Organisation/CSTO) शांतिरक्षक दलाला तातडीने मदतीला बोलावून घेतले. कोविड-19 संकटाचा कझाख अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पोलिसांची दमननीती आणि देशातील स्रोतांच्या वितरणातील प्रचंड असमतोल या कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढलेला होताच, त्यातच इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे नागरिकांमधील सरकारविरोधी भावना आणखी भडकल्या. देशातील सध्याची अशांतता पाहून कझाख नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रयासाठी जाण्यास सुरुवात केली होती. या परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या आडोशाने दंगलखोरांनीही पलायन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कझाख पोलिसांनी सर्व सीमा बंद करत तपासणी सुरू केली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या काही दंगलखोरांच्या चौकशीतून हे स्पष्ट झाले की, त्यांना अन्य देशांमधून पैसे देऊन तिथे दंगे घडवण्यासाठी आणले गेले होते. देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी बाहेरून मदत मिळत असल्याच्या कझाख राष्ट्रपतींच्या आरोपाला पकडलेल्या दंगलखोरांच्या चौकशीतून पुष्टी मिळू लागली. कझाखस्तानमधील काही सरकारविरोधी गटांनीही सरकार बदलण्यासाठीच आपण या आंदोलकांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले. कझाखस्तानने स्वातंत्र्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी कझाखस्तानसाठी परराष्ट्र धोरणात रशियाबरोबरच्या पारंपारिक, राजकीय, लष्करी आणि आर्थिक संबंधांचे महत्व अनन्यासाधारण राहिले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कझाखस्तानने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढत गेली. आज त्याची अमेरिकेबरोबर व्यूहात्मक भागीदारी आहे. कझाखस्तानात ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे कझाखस्तानात अस्थिरता वाढणे अमेरिकेला नको आहे. मात्र त्याचवेळी मध्य आशियात रशिया असलेला आणि सध्या चीनचा वाढत असलेला प्रभाव याकडे वॉशिंग्टनकडून गांभीर्याने पाहिले जात आहे. मध्य आशियाचे रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे तेथे आपली पकड कायम ठेवण्यासाठी मॉस्को जागरूक आहे. रशियाचा मध्य आशियावर असलेला प्रभाव कमी करण्यासाठी या क्षेत्रातील देश स्वतंत्र झाल्यापासून वॉशिंग्टनहून सातत्याने प्रयत्न होत राहिले आहेत. पुढे अमेरिकेने सैन्य काढून घेण्याची मागणी या देशांकडून होऊ लागली होती. 2014 मध्ये या क्षेत्रात अमेरिकन सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले; मात्र उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझस्तानात मूलतत्ववादी कायम राहिले. त्यांचा प्रभाव मध्य आशियात वाढणे रशियालाही धोकादायक वाटत आहे. म्हणूनच कझाखस्तानच्या विनंतीनंतर मॉस्कोने तातडीने कझाखस्तानला CSTO चे शांततारक्षक सैन्य पाठवले. या मूलतत्ववाद्यांबरोबरच गुन्हेगारी गटही या हिंसाचारात सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच रशिया, अमेरिका, चीन आणि अन्य देशांसाठीही व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या क्षेत्रात प्रत्येकाकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मध्य आशिया भारतासाठीही सामरिकदृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे कझाखस्तानमधील हिंसक परिस्थितीबाबत नवी दिल्लीहून चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच तेथे लवकरात लवकर शांतता पुन:स्थापित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. लिंक कझाखस्तानमधील अशांतता (avateebhavatee.blogspot.com)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 30666 views

🗣 चर्चा (97)
न
निनाद Fri, 01/21/2022 - 00:53 नवीन
झानाओझेनमधील आंदोलकांवर कारवाई झाली आणि सगळीकडे आंदोलन पसरले. पण इतक्या वेगाने हे घडले म्हणजे हे नियोजित कारस्थान होते का? अज्ञात संख्येने परदेशी भाडोत्री देखील जमावाचा भाग होते असा अंदाज आहे. अशा प्रकारची व्यापक चळवळ एका दिवसात निर्माण होत नाही. आणि हा विरोध वणव्यासारखा पसरण्याची कारणे निराळी होती आणि असावीत. लोकांअ असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याचा हा प्रयत्न आहे असे दिसते आहे. जगातील युरेनियम साठ्यांपैकी ४० टक्क्यांहून अधिक आणि या शिवाय तेलाचे मोठे साठे कझाकस्तानच्या मालकीचे आहेत. नैसर्गिक वायूच्या साठ्याच्या संदर्भात कझाकस्तान पहिल्या १५ देशांमध्ये मोडतो. आता असा विचार करायचा की कझाकस्तान सरकार बदलले असता कुणाचा फायदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष्पणे होणार आहे? असा विचार ठेऊन नेटवर शोधले तर याचे धागे दोरे मिळू शकतील. मात्र हे करतांना नेहमीचे प्रपोगंडा वेबसाईटस nytimes.com, wsj.com, cnn.com, aljazeera.com, ndtv.com, theguardian.com, theguardian.com वगैरे बाजूला ठेवायच्या. यांच्या सगळ्या लेखांचा सूर एकसारखा आहे - असतो. या पोपड्या खाली काही वेगळे प्रवाह दिसतात का ते शोधायचे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/21/2022 - 05:26 नवीन
कसं बोललात?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/21/2022 - 05:47 नवीन
हा धागा कझाकस्तानविषयी आहे याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद :) बाकी इथे कझाकस्तानविषयी फार कोणाला काही माहित आहे असे वाटत नाही. निदान मला तरी नाही. पण अगदी कझाकी लोकांना त्यांच्याविषयी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती इथल्या काही सदस्यांना असती तरी त्या सदस्यांनी चर्चा वेगळ्याच दिशेने नेली असती याची मात्र खात्री आहे :)
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 01/21/2022 - 08:28 नवीन
माझ्या मते हे बंड चीन विरुद्ध रशिया अश्या स्वरुपाचे होते. सोवियेत रशिया आणि चीन या दोन देशात परंपरागत सीमा संघर्ष आहे. आता तो संघर्ष कझाख आणि चीन असा असू शकतो. चीनी देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा झपाट्याने वाढवल्यामुळे, चीनने कझाकस्तानमध्ये ऊर्जा उद्योगांचा करण्यात आघाडीची भूमिका घेतली आहे. या लक्षात घेणे आवश्यक आहे की, चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन ने पूर्वीची सोव्हिएत युनियनची सर्वात मोठी स्वतंत्र तेल कंपनी पेट्रोकझाकस्तान सुमारे चार बिलियन डॉलर्सला विकत घेतली आहे. आणखी पैसे तेल चीनच्या सीमेपर्यंत नेणाऱ्या पाइपलाइनवर खर्च केले आहेत. चिनची पेट्रोकझाकस्तान ही आतापर्यंतची सर्वात मोठी विदेशी खरेदी होती. २०१६ पर्यंत, चिनी कंपन्यांनी (उदा. चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन, सिनोपेक आणि इतर) कझाकस्तानच्या पेट्रोलियम क्षेत्रात २० अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सन २००० पासून कझाकस्तानमध्ये चिनी स्थलांतरितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इतके पैसे खर्च झाल्यावर जर देश त्यांच्या धोरणाप्रमाणे वागत नसेल तर अध्यक्ष बदलणे हा सोपा मार्ग आहे. अर्थात या सगळ्यात तेल हातातून गेल्यामुळे रशिया अस्वस्थ होऊ शकतो. लक्ष्यात घ्या की बंड रशियाच्या मदतीने चिरडले आहे. सोव्हिएत युनियनने उइघुर राष्ट्रवादी प्रचार आणि चीन विरुद्ध उईघुर फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा दिला होता. आताची परिस्थिती नक्की काय ते कळले नाही. याचा तिसरा भाग म्हणजे या प्रदेशात अमेरिकेच्या प्रभावाची वाढ आणि कझाकस्तानमध्ये अमेरिकन हवाई तळांची संभाव्य स्थापना रोखण्याचेही चीनचे उद्दिष्ट आहे . या बंडात भारत कुठे आहे याची मात्र पुसटशी खूण ही दिसत नाही! कुरमंगझी तेल क्षेत्रात इक्विटी मिळवण्यात भारत अयशस्वी ठरला आहे. पण कझाक राष्ट्रीय फर्म KazmunayGaz ने ONGC ला सतपायेव आणि मखमबेट फील्डमधील ऑफर दिली आणि अटीराऊ आणि अख्ताऊ प्रदेशातील पेट्रोकेमिकल औद्योगिक प्रकल्पांमध्ये भारताच्या सहभागाची मागणी केली आहे. याचे पुढे काय झाले हे कळत नाही. तज्ञ लोकांनी यावर अजून लिहावे ही विनंती!
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 01/21/2022 - 08:36 नवीन
लोकांना त्या देशा विषयी काहीच माहिती नाही तर त्या देशावरील धागा इथे का? आणि तो पण मराठी मध्ये. भारतात वाढलेली भयंकर महागाई,अर्थव्यवस्था चे वाजलेले बारा. शेतकरी पासून सर्व कष्ट करी वर्ग त्रस्त आहे खासगी नोकरदार त्रस्त आहे.,na आवडते उद्योग पती,त्रस्त आहेत. आणि ही लोक विरोध करतात.त्यांची सहन क्षमता संपली आहे म्हणून काही तरी उदाहरणे देवून ज्या देशा चा भारताचा संबंध नाही तिथे महागाई विरोधी आंदोलन परकीय देश करत आहेत हा प्रचार करायचा . ह्याचा लपलेला अर्थ भारतात जी आर्थिक अनागोंदी आहे लोक त्रस्त आहेत विरोध करत आहेत त्या लोकांच्या मागे परकीय शक्ती आहेत म्हणजे त्या पण मुस्लिम परकीय शक्ती. हेच सुचवण्यासाठी हा धागा आहे लोक इतकी मूर्ख आहेत का की त्यांना काहीच कळत नाही हा गैर समाज मनातून काढून टाका. Bjp समर्थक देश भर विनोद निर्मिती चे मटेरियल बनले आहेत हे अजून त्यांच्या लक्षात येत नाही. अंध नाही तर बहिरे पण आहेत ही लोक.
  • Log in or register to post comments
स
सुखी Fri, 01/21/2022 - 15:10 नवीन
काही सदस्यांच्या कॉमेंट्स फिल्टर करायची सोय आहे का हो? वाचनाच्या ओघामध्ये आधी कॉमेंट वाचून मग वेळ वाया गेल्याचा पश्र्चाताप होतो, अन् विषयाचा बोऱ्या वाजला जातो
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/24/2022 - 04:27 नवीन
बादरायण संबध जोडायचा, वडाची साल पिपंळाला लावायची आणी आपले मत मांडायचे. जणू काही शपथ घेतल्या सारखे. तुम्ही काही लिहा आम्ही धाग्याचे काश्मीर करू. क्रय शक्ती वाढली आहे, झोपडीत ला वन बीएचके मधे राहातोय, सायकल वरचा फटफटी चालवतो. मोबाईल कुणाकडे नाही हे शोधावे लागतेय, पेट्रोल महाग झाले तरी रस्तय्आ वरची कोंडी संपत नाही. अशांतता कुठेही चालू असूदे, त्याचा परिणाम आपल्या देशावर होणार तर नाही या करता अवलोकन करणे जरूरी आसते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/22/2022 - 07:42 नवीन
@ sunil kachure मोगा खान आपल्या भाजप द्वेषाच्या बद्ध कोष्ठाचा निचरा करण्यासाठी एक वेगळा धागा काढा कि. कशाला कोणत्याही धाग्यात घाण करून ठेवताय? कझाकस्तान हा देश भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एके काळी रशियाची मोठी १४१० आणि अगणित लहान अण्वस्त्रे येथे होती ( भारताकडे १५६ आणि पाकिस्तान कडे १६५ अण्वस्त्रे आहेत) आणि ती इस्लामी दहशतवाद्यांच्या हातात पडण्याच्या अगोदर रशियाने ती काढून घेतली होती हा इतिहास आपल्याला माहिती आहे का? कझाकस्तानची ७२ टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे आणि सोव्हिएत युनियनच्या निधर्मी वादापासून फारकत घेतल्यावर तेथे इस्लामी पुरुज्जीवनवाद डोके वर काढू लागला आहे. तुर्कस्तानचे उदाहरण पाहता या देशाकडची अण्वस्त्रे काढून घेतली गेली हि इस्रायल आणि भारतासाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. कझाकस्तानकडून आपण आतापर्यंत ९००० टन युरेनियम विकत घेतलेले आहे आणि अजून १००० टन घेण्याचा करार केलेला आहे. हे युरेनियम आपल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारताचे ८० % युरेनियम कझाकस्तान कडून येते हे आपल्याला माहिती आहे का? जिथे तिथे घाण करण्याच्या अगोदर अभ्यास वाढावा
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 01/24/2022 - 05:43 नवीन
. १. नियमित मिपाकर्स नेहमीच प्रतिसाद देत नसले तरी ते प्रकाशित होणारे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद / चर्चा सर्वसाधारणतः नेहमीच वाचत असतात. २. मी एक नियमित मिपाकर आहे. --- हा धागा मी सुरुवातीपासून ट्रॅक करत आहे; आंतरराष्ट्रीय घडामोडींत मला देखील रस आहे पण धाग्याच्या विषयावर काही प्रतिसाद देण्याइतका माझा अभ्यास नाही म्हणून आतापर्यंत इथे काही लिहिलं नाही. अभ्यासू सदस्यांकडून माहितीपूर्ण / विश्लेषक प्रतिसादांच्या अपेक्षेने, नवीन प्रतिसाद दिसले की हा धागा उघडून पाहतो आहे; पण एकूण प्रतिसादांच्या तुलनेत फारच थोडे काही हाती लागते आहे. या धाग्यावरचे पहिले काही प्रतिसाद पाहून, "विषय काय आहे आणि आपण काय लिहितो आहोत याचा काहीतरी संबंध असायला हवा असं थोडंच आहे" असा विचार करणारेही मिपाकर्स आहेत हे पटायला लागते. --- अवांतर: शरद पवार नामक वृत्तीचे लोक केवळ राजकारणीच असतात असे नाही, ते प्राध्यापक, डॉक्टर आणि अजूनही काही असू शकतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/24/2022 - 06:24 नवीन
हं तर कुठ पर्यंत आलो होतो आपण. वाढती महागाई आणि भारतीय नागरिकांच्या मनात असलेल्या अशांती बाबत. सामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे, विरोधी पक्षाची समर्थ साथ नाही. कोणी कुठे त्याबाबत आंदोलन करीत नाही. कोणी कुठे विरोध करीतही असेल पण त्याच्या बातम्या येत नाही. सरकारी व्यवस्था असे विषय समोर येऊ देत नाही, सर्वच ठिकाणी त्याचं दमन होत आहे असे वाटते. वाढती महागाई ही सध्या भारतीयांची डोकेदुखी आहे. सहन करण्याशिवाय भारतीय जनतेकडे काही पर्याय नाही. सरकारच्या विरोधात सामान्य माणसाने रणशिंग फुंकणे गरजेचे आहे. वैचारिक ज्योत तेवत ठेवली पाहिजे. मोठ्या बदलांसाठी हे छोटे लढे उपयोगाचे ठरतात. हं तर, ही महागाई अजून वाढेल की कसं ? पाच राज्यांच्या निवडणूका असल्यामुळे सध्या डिझेल-पेट्रोलचे दर फार वाढणार नाहीत पण निवड्णूका संपल्यावर पुन्हा येरे माझ्या मागल्या. डिझेल-पेट्रोलचे दर वाढले की इतरही महागाई वाढू लागते. साधारणतः मार्च एप्रीलमधे पेट्रोल प्रतिलिटर १२० ते १२५ रुपये होऊ शकते. ते कसं त्याची चर्चा करुया. देशासाठी तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती ६० डॉलरच्यावर जाणे हे धोकादायक असले तरी १९ जानेवारीला या किंमतींनी पिंपामागे ८८ डॉलरची सीमारेषा ओलांडली लवकरच हा दर १०० डॉलरवर जाऊ शकतो, एव्हाना आपण गलपटायला पाहिजे होतं. अर्थमंत्री सीतारामन हा विषय सोडून सर्व विषयावर बोलल्या. कारण विधानसभा निवडणुका पाहता या विषयावर सत्ताधा-यांना चर्चा नको असते. २०१३-१४ मधे शेठच्या आगमनास पोषक वातावरण ठरले त्याचं कारण आंतरराष्ट्रीय तेल पिंपाचे वाढलेले भाव जवळ जवळ १३५ हा दर होता आणि शेठला सत्तेसाठी ही महागाई उपयोगाची ठरली. भारतीय जनता सतत स्वप्नाच्या मागे असते, तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी त्याचा उपयोग भारतीय जनतेला होईनासा झाला. (माहिती सोर्स अभ्यासू लेख वृत्तपत्र) इंधन दर सरकारच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त होऊनही आता साताठ वर्ष झाली. महागाई नियंत्रणात येत नाही. निवडणुक आल्या की तेल कंपन्या डिझेल-पेट्रोलचे दर स्थीर ठेवतात याचं आपल्याला कायम आश्चर्य वाटतं. अर्थात आपल्याला फटका बसू नये म्हणून सरकार अशी जादू करते हे सर्वसामान्यांना कळायला लागलेले आहे. बाकी दोस्त हो, एकदा निवडणुका संपल्या की पुन्हा महागाईचे स्वागत करायला तयार राहा. आपलं काम जनजागृतीचं. पटलंच पाहिजे असं काही नाही. आपली वाटचाल कझाकीस्तानसारखी होऊ नये असेही वाटते. आपल्याला शांतता प्रिय आहे, बाकी काय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/24/2022 - 06:36 नवीन
ओएनजीसी, इंडियन ऑईलमध्ये फ्युचर्स सौदे करावेत किंवा कसं?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/24/2022 - 06:55 नवीन
इश्क है तो रिस्क है. सध्या मार्केट लै बेभरवशाचं झालं आहे. आपल्या खिशातले पैसे मार्केटमधे चालले आहेत पण परतावा म्हणावा तसा येत नाही. पण सुरक्षित गुंतवणूक म्हणून ब्रँडेड मधे पैसे गुंतवणे हिताचे. आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत काहीही सल्ला देऊ इच्छित नाही. रिस्क है शेठ. आपण आपल्या जवाबदारीवर रिस्क घ्यावी. आज पण मार्केट पडलेले आहे, पैसे है तो लगाओ. =)) अवांतर प्रतिसादाबद्दल धागा लेखकाची क्षमा मागतो. वेळ मिळाला की पुन्हा भारतीय महागाई, अलिप्त केंद्रसरकारआणि कझाकीस्थान या विषयावर मतं व्यक्त करीत राहीन, असा शब्द देतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/24/2022 - 07:12 नवीन
काही सल्ला वगैरे द्या भो
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/24/2022 - 07:16 नवीन
IEX @ 240, SAIL @ 99, Real Estate @153., SBI @ 500 मित्रांनो, आमच्या दोघांच्या शे.बाजार प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. नादी लागू नका. भले भले मार्केटात लटकले आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 01/24/2022 - 15:53 नवीन
आज बाजार तर पुर्ण झोपला. यूक्रेन-रशियात कधीही युद्ध होण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित अजून काही दिवस बाजार आपटेल असे वाटते मात्र ही अवस्था फार काळ राहणार नाही असे वाटते. आज ज्यांनी खरेदी घेतली ते थोडा संयम बाळगल्यास मालामाल होतील हे नक्की. IEX तर मी २६० ला घेतला होता. पण वाट पाहणार. फळ नक्कीच चांगले येणार.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 01:44 नवीन
सर्वच ठिकाणी त्याचं दमन होत आहे असे वाटते. गेला बाजार अजूनही बरखा, रवीश , राजदीप, वागले , कुबेर इत्यादी मंडळी मोकळेचे आहेत पाहिजे ते लिहितात , बोलतात , कसलं दमन ? वाढती महागाई ही सध्या भारतीयांची डोकेदुखी आहे. जणू या आधी नव्हातीच? पूर्वी सिंग साहेब, राव साहेब, राजीव राजपुत्र , इंदिरा अम्मा आणि चाचा हे रोज हवन करून सोन्याचा धूर काढीत होते नाही का ( हवन हे हिंदू संस्कृतीतील असल्यामुळे बोचले असेल पण राजपौत्र राहुलचा आजकाल जनेउ जनेउ करीत उड्या मारीत असतो किँग्रेस काहे भागिवकरण झाले असे गृहीत धर!) सहन करण्याशिवाय भारतीय जनतेकडे काही पर्याय नाही. का हो? निवडणूक आहेत अजून उडवाकी फॅसिष्ठांना .. लोकशाही नामक टायगर अभि जिंदा है विरोधी पक्षाची समर्थ साथ नाही. का बांगड्या भरल्या कि काय त्यांनी ? बर ७५ सारखे तुरुंगात हि नाहीत .. मोकळे आहेत, बंगाल आणि महाराष्ट्रात सत्तेत हि आहेत कि ! करा कि म्हणावं अजून एक क्रांती ! करा फॅशिष्टांचा सुपडा साफ ... चालो बारामती ते दिली व्हाया लखनौ आणि कोलकत्ता ! सरकारच्या विरोधात सामान्य माणसाने रणशिंग फुंकणे गरजेचे आहे. आता काय शिंगात कि फुकणारी जनतेला हवेचे कॉम्प्रेसर मिळण्याची वाट बघताय ! क्षमा करा मंडळी पण आता या " लोकशाही , सगळी मुस्कटदाबी ..." या कांगावा करनार्यांचा कंटाळला आलाय लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे ! सतत एकांगी रडकी टिका .. ती सुधाच कढई कधी इतकी चुकीची , जगात पेट्रोल चे भाव वाढलेत एकटे भारतात नाही तरी कांगावा एकट्या भारतात आणि ते सुद्धा या भाजप सरकार मुळे वाढलेत !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 01/25/2022 - 04:37 नवीन
या " लोकशाही , सगळी मुस्कटदाबी ..." या कांगावा करनार्यांचा कंटाळला आलाय लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे !
शतशः सहमत!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/25/2022 - 07:33 नवीन
लोकशाही ने निवडून दिलेल्या सरकार चा साधा मान ठेव्हाण्याची दानत नाही यांच्याकडे ! ७० वर्षे हुकूमशाही होती का? ते ही लोकशाहीनेच जिंकले ना? त्यांचा मान न ठेवनार्यांच्या दानत बद्दल काय?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 07:42 नवीन
काय मान नाही ठेवला त्यानचा ? उठाव करून नाही आली भाजप सत्तेवर कि आणीबाणी जाहीर करून ? लोकशाही मार्गाने आली सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली हे मान्यच आहे कि पण पुढे एक घराणे अन फक्त आम्हीच राज करणार या काँग्रेसी नीती वर जनता वैतागली
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/25/2022 - 09:25 नवीन
सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली हे मान्यच आहे कि
मग देश ऊभारणी करनारे चांगले की सध्याचे महागाई वाढवून देशाचे नूकसान करनारे चांगले?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 10:40 नवीन
तुम्ही आव आणताय कि महागाई गेल्या ७ वर्षात झाली ! काय वाटेल ते ... मागील वर्षी मिपावर एक सध्या प्रयोगाने मी दाखवून दिले कि पेट्रोल चे दर अनेक देशात वाढले आहेत ..फक्त भारतात नाही त्यावर तुमच्यासारखे मंडळी गप्प!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 01/25/2022 - 09:39 नवीन
सुरवातीची देश उभारणीची कामे काँग्रेस ने केली
खरंतर, "सुरुवातीची अनेक वर्षे काँगेसची सत्ता असूनदेखील देश उभारणीची कामे झाली" असं म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/25/2022 - 18:55 नवीन
नावडतीचे मिठ अळणी.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/26/2022 - 02:26 नवीन
नावडतीचे मिठ अळणी.
Same to you! --- बाकी, आमचं आवडतं-नावडतं असं काही नाही हो; केवळ देशप्रेम व धर्मप्रेम, दुसरं काही नाही; जय माहिष्मती! --- जय हिंद! 🇮🇳
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/26/2022 - 05:34 नवीन
त्याला पक्षप्रेम म्हणतात. देशप्रेम नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/26/2022 - 10:00 नवीन
देशप्रेम आणि संविधान प्रेम असे पाहिजे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 01/25/2022 - 08:47 नवीन
महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे, तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील. 1) साध्याला पायाभूत सुविधांमध्ये भरपूर कामे होताना दिसत आहेत, नवीन महामार्ग, मेट्रो इत्यादींची कामे भरपूर होताना दिसत आहेत त्यामुळेच जनतेला आपला पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय खात्री वाटतेय आणि म्हणूनच बरीचशी जनता शांत आहे. 2) हीच गोष्ट defence च्या बाबतीत, माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सरंक्षण हा आवडीचा विषय असतो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सरंक्षणसंबंधित बरीच मोठी कामे केली आहेत किंवा चालू आहेत. राफेल विमाने, S-400 ची डील नाहीतर भारत चीन सीमेवर वाढवलेल्या पायाभूत सुविधा ह्यात पैसा हा लागणारच. 3) भ्रष्टाचार: मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार झालाच नाही असे कोणीही म्हणणार नाही परंतु झालाच असेल तर तो खालच्या पातळीवर आणि मोठ्या भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण आणखीन तरी उघडकीस आलेलं नाही. हिंदू वर्तमानपत्राने राफेल प्रकरण भरपूर ताणून धरलं होत परंतु खुद्द सुप्रीम कोर्टानेच त्याच्यातली हवा काढून घेतली त्यामुळे सामान्य जनतेचा अजूनही मोदी सरकारवरती विश्वास आहे. 4) सध्याला भारतात अतिशय कमकुवत विरोधी पक्ष आहे, काँग्रेस अजूनही राहुल आणि प्रियांका गांधींना चिकटून बसलेली आहे. आणि लोकांचा ह्या दोघांवर आजीबतही विश्वास नाहीत्यामुळेच भाजप नाही तर कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर जनतेजवळ नाही. त्यात भाजपात घराणेशाही तुलनेत कमी आहे त्यामुळेच सध्यातरी भाजपाच लोकांची पसंती असणार आहे. परंतु समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 10:41 नवीन
रात्रीचे चांदणे सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/25/2022 - 10:59 नवीन
>> महागाई नक्कीच वाढलेली आहे आणि सामान्य जनतेला त्याचा नक्कीच त्रास होत आहे, आभारी आहे. >>तरीपण आंदोलन वगैरे होताना दिसत नाहीत कदाचित ही काही कारणे असतील. आपण जी कारणे सांगितली त्याबद्दलही चर्चा होऊ शकते पण लोक आता केंद्रसरकार आणि मोदींच्या धोरणांवर टीका करायला लागले आहेत. बोलायला लागले आहेत. लोकांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न कोणते आहेत आणि सरकार लोकांना कोणत्या प्रश्नांवर भूलवत आहेत त्याची जनतेला समज येत आहे. मला वाटतं सरकारच्या विरोधात स्वतः जनता रस्त्यावर येईल हे यातलं पहिलं पाऊल वाटत आहे. >>> समजा अशीच चढती महागाई राहिली आणि सध्यातरी अशक्य वाटणारा महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर भाजपा समोर नक्कीच आव्हान उभे राहू शकते. जनतेची यानिमित्ताने महागाईच्या विळख्यातून सुटका होऊन आपण म्हणता तसे देशपातळीवर प्रयोग व्हावा, बाकी आपल्या तरी मनात दुसरं तरी काय आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 14:25 नवीन
महाराष्ट्रासारखा प्रयोग देशपातळीवर झाला तर प्रयोग? कि खेळ १०० + ५२ असे सरळ मत दिले असताना , तीन पायाची मोट जनतेचं कौलाला डावलून बांबूंची तिरडी बांधली आणि म्हणे प्रगल्बह पुरोगामी महाराष्ट्र्र अरे पृष्ठभागात दम होता तर स्वतःचं बळावर १६० मिळवयाचे ना ! जाणत्या राजा च्या मार्गदर्शनाखाली !
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 01/25/2022 - 10:50 नवीन
जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला . येथील आयडी नी संगावेच प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार आणि समजा केला तर तपास कोण करणार. आता मोदी त्या स्थिती मध्ये आहेत. मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे विविध केंद्रीय यंत्रणा मोदी च्या गुलाम आहेत राज्य घटनेशी त्यांना काही देणेघेणे नाही. कोण मोदी सरकार वर भ्रष्टाचार चा आरोप करेल. सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील .
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 01/25/2022 - 10:59 नवीन
जो पर्यन्त देशातील एकमेव मर्द इंदिरा गांधी जी सत्तेवर होत्या तो पर्यंत काँग्रेस वर कोणता भ्रष्टाचार चा आरोप झाला . येथील आयडी नी संगावेच
बोंबला. संजयच्या मारूतीसाठी सरकारी यंत्रणा दावणीला बांधणे, तुलमोहनराव-ललितमोहन मिश्रा आंतरराष्ट्रीय व्यापार परवाने लायसेन्स प्रकरण, नगरवाला प्रकरण वगैरे सगळे प्रकार आणि ते आरोप कोणाच्या कारकिर्दीत झाले होते? तुलमोहन राव- ललितमोहन मिश्रा प्रकरणात सी.बी.आय चौकशी झाली होती त्याचे पुढे काय झाले? ललितमोहन मिश्रांच्या मृत्यूचे गूढ उकलले का? ते नक्की कधी उकलले? संजय गांधींच्या मारूतीला सरकारी बँकांमधून वारेमाप कर्जे दिली जात होती यावर आक्षेप घेणार्‍या आर.बी.आय गव्हर्नर एस.जगन्नाथन यांचे पुढे काय झाले? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच असतील ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/25/2022 - 15:19 नवीन
तुम्ही कुठे त्या कागलकरांच्या नादाला लागताय? कुत्रं वाकडं होईल पण ते शेपूट सरळ होणार नाही! ))--((
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 01/25/2022 - 14:19 नवीन
प्रशासन,सर्व तपास यंत्रणा,स्वतःचा पक्ष ह्याच्या वर पूर्ण command इंदिराजी ची होती आरोप कोण करणार म्हणजे ते तुम्हाला मान्य होते तर मग मोदींची ( तुमचं आणि प्रोफेश्वरनच्या मनातील) का चालत नाहो हो? मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या मालकांना दहशती खाली ठेवले आहे चला हे खरे आहे असे गृहीत धरुयात मग ते एन दि टी व्ही चे मालक , चालक राबिश कुमार आणि राजदीप "सरडा " देसाई कोणत्या तुरंगात खितपत आहेत ? सांगा ? सरकार बदलू ध्या सर्व काळे व्यवहार बाहेर येतील ह हा पुवा गणित साधं आहे तुमचं सारख्यांना लोकशाही मार्गाने ५०-६० वर्षांनंतर निवडून सरकार पचतच नाही पचतच नाही पचतच नाही पचतच नाही
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 01/25/2022 - 21:50 नवीन
हे धोकादायक च आहे. म्हणून इंदिराजी चे उदाहरण दिले. प्रचंड बहुमत लोकशाही साठी हानिकारक च आहे. प्रचंड बहुमतातील सरकार अस्तित्वात असेल तर सर्व सरकारी यंत्रणा जीव मुठीत धरून असतात. सर्व अधिकार केंद्रीय सरकार la असतात. ते काही ही करू शकतात बहुमत च्या जोरावर हवे ते कायदे ,नियम बनवू शकतात .कोणावर पण कारवाई करू शकतात. कोणी अशा सरकार च काहीच वाकडे करू शकत नाही आणि हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/28/2022 - 07:18 नवीन
हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करता येते .न्यायालय पण काही करू शकत नाहीत. मोगा खान चष्मा काढा आणि अभ्यास वाढवा NJAC बद्दल केलेली घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने ४-१ बहुमताने रद्दबातल केली आहे. UPHOLDING JUDICIAL SUPREMACY IN INDIA: THE NJAC JUDGMENT IN COMPARATIVE PERSPECTIVE https://www.google.com/search?q=njac+case+summary&rlz=1C1CHBD_enIN915IN915&oq=NJAC&aqs=chrome.8.35i39j0i512l9.6932j0j15&sourceid=chrome&ie=UTF-8
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/26/2022 - 05:23 नवीन
धागा आवडला. कझाकस्थान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले लोकं पाहुन आनंद झाला ! =)))) असो ह्या निमित्ताने दोन मिनिट शांतता पाळुन कझाकिस्तान चे राष्ट्रगीत ऐकुयात =))))
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 01/26/2022 - 22:12 नवीन
धागा उघडल्याउघडल्या माझे हात शिवशिवलेले पण गंभीर धागा आहे म्हणून गप बसलेलो. काझाकस्तान, काझाकस्तान, यू व्हेरी नाईस प्लेस पूर्ण व्हर्जन-https://youtu.be/PxwylahBfp4
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 01/28/2022 - 07:40 नवीन
नवरा मेला तरी चालेल पण सवत *** झाली पाहिजे..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 01/28/2022 - 07:51 नवीन
मलाही हीच म्हण आठवली होती पण लिहायचे डेरिंग झाले नाही. =))))
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 01/04/2023 - 18:17 नवीन
नवरा मेला तरी चालेल पण सवत *** झाली पाहिजे..
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.. अशी मूळ म्हण आहे. रंडकी याचा अर्थ 'विधवा' असा असल्याने यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. हे उगाचच सोवळे पाळण्यासारखे झाले. एवढे बोलून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/30/2022 - 05:18 नवीन
भारतात एकदाच्या राज्यांच्या निवडणुका संपल्या. राज्याच्या निवडणुका असल्यामुळे डिझेल-पेट्रोलचे १३७ दिवस दर स्थिर राहिले, हा एक वेगळा विक्रम राहिला. पण हा बोळा फार काळ राहु शकणार नव्हता हे चाणाक्ष भारतियांना माहिती होते. पहिली दरवाढ २२ मार्च २०२२ ला सुरु झाली. दिनांक २२ ते २९ अशी सात दिवस डीझेल मागे 'विकासदर' साधारणपणे प्रत्येक दिवशी ८० पैसे प्रती दिवस जवळ जवळ पाच रूपये वाढले. तर पेट्रोल मागे जवळ जवळ पाच रूपये वाढले. वृत्तपत्रीय बातम्यानुसार केंद्र सरकारने डिझेल-पेट्रोलच्या उत्पन्नातून ३.३१ लाख कोटी उत्पादनावरील कराच्या माध्यमातून कमावले. अभिनंदन शेठ. दुसरीकडे घरगुतीगॅसच्या दरातही वाढ झाली आहे. ऑक्टोबर पासून त्याचेही दर स्थिर होते. पण मंगळवार पासून त्याचेही रु. ५० ने वाढ झाली आहे. आपला प्रश्न लोक महागाई विरोधात जागृत होत आहेत का ? काही लोक म्हणायचे करोना पळविण्यासाठी, थाळी, मशाल मोर्चा काढला गेला तसा उद्या, डिझेल- गॅसच्या टाक्या घेऊन उद्या ३१ मार्चला विरोधी पक्ष आणि जनता महागाईचा विरोध करण्यासाठी, केंद्रसरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. अशा शांततेने निदर्शने आणि केंद्रसरकारच्या धोरणाचा निषेध करणा-या भारतीय जनतेस मन:पूर्वक शुभेच्छा. आपापल्या गावात जर असे निदर्शने होणार असतील तर चार मित्रांना घेऊन सहभागी व्हावे, असे सुचवावे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 03/30/2022 - 11:53 नवीन
त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार त्यांचे कर कमी करणार आहे का हो? 😉
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/30/2022 - 16:54 नवीन
राज्यहीतासाठी सहन करा.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/01/2022 - 13:55 नवीन
:))
  • Log in or register to post comments
न
निनाद Sat, 04/02/2022 - 01:21 नवीन
इंधन दरवाढ जागतिक आहे. त्यात सरकार काय करणार? सरकारने त्यांच्या स्तरावर रशियातून स्वस्त तेल मिळवले. इराण बरोबर जुने करार केलेले आहेत. सरकारी कर कमी केले आता अजून ते काय करणार?
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 04/02/2022 - 02:02 नवीन
आँ? असं काय करता निनाद. द्या की थोड्या शिव्या शेठ ला. आमच्या कडे दुप्पट झालेत भाव एका वर्षात शेठ मुळे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा