Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

प — पाषाणभेद, Sun, 01/09/2022 - 07:21
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9014 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sun, 01/09/2022 - 11:44 नवीन
तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून तरून जायचे सामर्थ्य मिळो.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 01/09/2022 - 12:23 नवीन
वो था तो कोई गम न था। नही है तो आँखे नम होती है। उसकी यादोमे अक्सर राते गमगीन होती है। नसीहत जो कभी मुसीबत लगती थी। आज वही मुसीबत मे राहत लगती है। रोकता था टोकता था। अक्सर मन सोचता था ये ऐसा क्युं है। आज नही है तो दिल उसीको खोजता क्युं है। बरगद का साया था। हर राझ सिखाया था। परवरीश मे जिसने अपना तन मन धन गवांया था। था वो तो हर मुकाम मुक्कमल हुआ। जिंदगी के हर पादान पर पहाड सा खडा हुआ। बाप बनके देखो बाप क्या चिज होती है। उसकी यादोमे आज भी आँखे नम होती है। मै भी एक बाप हूँ। आज भी कमी महसुस होती है। कभी अकेला होता हूँ तो अटलजी की कवीता याद आती है। " उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे।"
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sun, 01/09/2022 - 12:30 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 01/09/2022 - 13:19 नवीन
ह्या कठीण प्रसंगातून सावरण्याचे धैर्य तुम्हांस मिळो हीच सदिच्छा. सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Sun, 01/09/2022 - 17:20 नवीन
न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले हे खरं आहे भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sun, 01/09/2022 - 17:21 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली! तुम्हाला ह्या दुःखद प्रसंगातून तरून जायचे सामर्थ्य मिळो. +१
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sun, 01/09/2022 - 17:44 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली. खूप त्रासदायक असतं पुरुषांसाठी असं दुःख व्यक्त करणे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/09/2022 - 18:44 नवीन
या कठिण समायातुन तरुन जाण्यासाठी आपणास बळ मिळो ही परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो. _/\_
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sun, 01/09/2022 - 18:48 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/10/2022 - 06:56 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 पितृछत्र हरपल्याच्या दुःखद प्रसंगातून तरून जाण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 01/10/2022 - 07:52 नवीन
भावपूर्ण श्रध्दांजली, त्यांना सदगती लाभो ही इश्वर चरणी प्रार्थना पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 01/10/2022 - 10:26 नवीन
निमित्ताने आपण गेल्या जून महिन्यात मिपावर प्रकाशित केलेली.. कविता आठवली
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 01/10/2022 - 16:53 नवीन
कविता चांगली आहे असं आत्ता म्हणण्याचे मन होत नाही . या दुःखातून मी गेलेलो असल्याने त्याची कल्पना मला आहे . आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत . श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Mon, 01/10/2022 - 19:41 नवीन
आपल्याला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 01/10/2022 - 20:09 नवीन
माफ करा. माझे वडील गेल्या मे महिन्यातच गेले आहेत, पण दु:खाचे कढ संपत नाहीत अन मग शब्दांचे रूप घेवून ते येतात. आपल्या आपूलकी बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/14/2022 - 18:29 नवीन
___/\____
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा