ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक मतदानकेंद्रावर सॅनिटायझर, थर्मल गन वगैरे गोष्टी असतील. मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. जर मतदाराचे अंगाचे तपमान जास्त आढळल्यास त्या मतदाराला टोकन दिले जाऊन शेवटच्या एक तासात मतदानासाठी परत बोलावले जाईल. ज्येष्ठ नागरीक, अपंग आणि कोविड रूग्णांना पोस्टाने मतदान करायची परवानगी दिली गेली आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवाराला विजययात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/covid-protocols-for-assembly-elections-no-rallies-till-jan-15-polling-time-to-be-increased-by-an-hour/articleshow/88774608.cms
🗣 चर्चा
(172)
स
सुक्या
Sun, 01/16/2022 - 04:22
नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/india-bags-order-from-philippines-for-brahmos-missiles-amidst-chinas-belligerence-in-south-china-sea/articleshow/88904359.cms
भारताची एक शस्र आयातदार देश अशी ओळख जाउन आता शस्र आयातदार/ निर्यातदार अशी होइल. एके काळी सैन्याला दारुगोळा मिळवण्यासाठी सरकार कडे भीक मागावी लागत असे. सरकार कडे पैसे नाही हे कारण देऊन अनेक वर्षे सैन्याचे अधुनिकिकरण थांबवले गेले होते.
त्या अनुशंगाने आता हा बदल नक्कीच सुखावणारा आहे ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 06:25
नवीन
पाकिस्तानची पहिलीवहिली Security Policy जाहीर, हिंदुत्व हा देशासाठी धोका असल्याचा दावा
-------
आता उदारमतवादी हिंदू काय मत व्यक्त करणार?
राजा जयचंदच्या चुकीचे परिणाम, आत्ता दिसायला लागले.
मी तरी, राजा जयचंदच्या पावला वर पाऊल टाकणार नाही...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 08:25
नवीन
शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये?
https://www.tv9marathi.com/agriculture/irregularities-in-auction-by-traders-action-by-market-committee-616682.html
असे होऊ नये, यासाठीच, भाजपने शेतकरी वर्गाला हितकारक, असे कायदे आणले होते.
आता, महाराष्ट्र सरकार, शेतकरी वर्गासाठी, काय उपाय योजना करणार? हे बघणे रोचक ठरेल...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Sun, 01/16/2022 - 08:33
नवीन
पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपने बाबूश मोन्सराट या हरामखोराला उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध. जर उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणून उभे राहणार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेनेशी काही संबंध नसेल तर पणजीतल्या लोकांनी त्याला मत द्यावे असे वाटते.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 09:04
नवीन
+1
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/16/2022 - 09:26
नवीन
पक्षाचाच निषेध. अजूनही काही लोकांचे डोळे ऊघडलेले नाहीत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 12:51
नवीन
उडदामाजी काळेगोरे असणारच
पण, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांपेक्षा, हिंदू हितवादी भाजप, मला तरी आवडते....
बाय द वे,
नौसैनिकाला मारहाण केली, त्या पक्षा बद्दल, तुमची भुमिका काय आहे?
सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे?
हिंदू माणसाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्या पक्षा बद्दल तुमची भुमिका काय आहे?
असो,
घराणेशाहीचा उदो उदो करण्यापेक्षा, थोडेफार वाचन करावे, हे उत्तम. चला आता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, इतिहास वाचायला घेतो..
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 01/16/2022 - 13:19
नवीन
१९४७ नंतर पुढे वाचावा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 14:06
नवीन
बर्र
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 14:16
नवीन
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’ शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!
https://www.tv9marathi.com/politics/amaravati-mla-ravi-rana-criticises-shiv-sena-and-uddhav-thackeray-by-saying-today-shiv-sena-became-congress-sena-616853.html/amp
ही अशी भिजत घोंगडी ठेवण्यापेक्षा, आधीच योग्य तो निर्णय द्यायला हवा होता...
बाबरी मस्जिद पाडली कुणी? आणि श्रेय कुणी उपटले?
आपण, एका रुपयांत मिळणारी, झुणकाभाकर पचवली नसल्याने, आपल्याला असे प्रश्र्न पडणार नाहीत.
- Log in or register to post comments
T
Trump
Sun, 01/16/2022 - 15:14
नवीन
बेकायदेशीर पुतळा असेल तर हटवण्यास काय हरकत आहे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 01/17/2022 - 06:46
नवीन
पण, हे स्पष्टीकरण शासनाकडून वेळीच अपेक्षित होते.
म्हणून तर म्हणालो की, भिजत घोंगडी ठेवू नयेत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 01/17/2022 - 00:07
नवीन
बाबूश मोन्सराट यांना उमेदवारी देणे चुकीचे असेल पण उत्पल यांनी केवळ आपण " मनोहरांचे पुत्र म्हणुन उमेदवारी द्या" हा हट्ट धरणे चुकीचे आहे? मग काँगेस आणि भाजपात फरक तो काय ?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 01/17/2022 - 06:04
नवीन
नक्कीच.
याविषयी वर लिहिलेच आहे. मनोहर पर्रीकरांचे पुत्र हे एकमेव क्वालिफिकेशन असेल तर उत्पलना उमेदवारी द्यायला नको. पण सध्या भाजपने पणजीमध्ये ज्याला उमेदवारी दिली आहे तो मनुष्य गुंड आहे. बलात्कारापासून अनेक आरोप त्याच्या नावावर आहेत. असल्या हरामखोराला उमेदवारी का द्यायची आहे? आणि तो मुळचा भाजपचा थोडीच आहे? काँग्रेसमधून उचलून त्याला पक्षात घेऊन गळ्यातले लोढणे घेतले आहे. त्याच्यापेक्षा उत्पल नक्कीच चांगले उमेदवार नाहीत का?हा फरक आहे.
जर पक्षाने बाबूश मोन्सेराटला उमेदवारी न देता सिध्दार्थ कुंकळीणकरसारख्या पक्षासाठी काम केलेल्याला, मनोहर पर्रीकरांनी आपल्या विधानसभा जागेवर उमेदवार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांमधून निवडलेल्याला उमेदवारी दिली असती तर मी पण उत्पलचा दावा अयोग्य आहे असेच म्हटले असते आणि तो एक बंडखोर असेच म्हटले असते. पण बाबूश मोन्सेराटसारखा हलकट माणसाला उमेदवारी देणे पक्षाचा समर्थक म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मान्य नाही हे नक्कीच. त्याच्यापेक्षा स्वच्छ चारित्र्याचा कोणीही उमेदवार चालेल.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 01/17/2022 - 06:38
नवीन
आणि त्यातही उत्पल जर शिवसेनेत गेले किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना शिवसेनेची कोणतीही मदत घेतली तर मात्र त्यांच्याविषयी असलेली सद्भावना पूर्ण संपेल. आता जी काही थोडीफार सद्भावना (आदर नव्हे) त्यांच्याविषयी आहे ते मनोहर पर्रीकरांचे पुत्र म्हणून आहे. तेच मनोहर पर्रीकर हयात असताना संजय राऊतांनी (आणि उद्धव ठाकरेंनी सुध्दा) त्यांच्याविषयी सामनामधून गटारगंगा वाहिली होती हे पण वर लिहिलेच आहे. एखादा माणूस हयात असताना त्याला शिव्या घालायच्या आणि गेल्यावर मात्र 'तो कित्ती कित्ती चांगला होता' म्हणून गळे काढायचे हे ढोंग आहे. अपेक्षेप्रमाणे राऊत आणि ठाकरे ते करत आहेत. अशा शिवसेनेचा पाठिंबा/मदत उत्पलनी घेतली तर मात्र ती सद्भावना पूर्ण जाईल. शेवटी माझ्यासारख्यांना मनोहर पर्रीकरांना आदर द्यावासा वाटतो. तो त्यांच्या मुलाला आपोआप मिळणार नाही. आणि स्व.मनोहर पर्रीकरांना शिव्या घालणार्यांच्याच बरोबर त्यांचे पुत्र गेले तर मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा या न्यायाने उत्पलही मनोहर पर्रीकरांविषयी आदर वाटणार्यांच्या रोषाचे धनी ठरतील हे पण तितकेच खरे.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Mon, 01/17/2022 - 08:16
नवीन
बाबूश मोन्सराट या अत्यंत हलकट आणि नराधमाबद्दल आठ, दहा वर्षांपूर्वीच ऐकले होते.
गोव्यात पणजी, पर्वरी, फोंडा, मडगाव येथे नातेवाईक आहेत आणि सगळ्यांकडून मोन्सराटला खच्चून शिव्या घालताना ऐकले आहे.
भाजपाने ही घाण घेऊन वर उमेदवारी पण दिली. अवघड आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/16/2022 - 09:04
नवीन
पूलाच्या उद्घाटन प्रसंगी सेना-राष्ट्रवादी संघर्ष चव्हाट्यावर; NCP कडून ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’च्या घोषणा तर सेनेकडून…
https://www.loksatta.com/thane/shivsena-vs-ncp-verbal-fight-during-ignoration-of-kharegaon-bridge-tlsp0122-scsg-91-2762768/lite/
-----
ये तो होना ही था ....
- Log in or register to post comments
ब
बोका
Sun, 01/16/2022 - 17:09
नवीन
एलॉन मस्कला आपापल्या राज्यात येण्याची आमंत्रणे अनेक मंत्र्यांनी दिली आहे. प. बंगाल सुद्धा मागे नाही !
- Log in or register to post comments
स
सुक्या
Mon, 01/17/2022 - 02:01
नवीन
मस्त . . . हे राजकारणी लोक काय खाउन इतके मस्त खोटे बोलतात काय माहीत.
हीच व्हिजन (म्हणजे दीदी ची व्हिजन) टाटा चा प्लांट टाकायच्या वेळेस कुठे गेली होती?
"बेन्गाल मीन्स बिझिनेस्स" हे पन लय भारी . . . ह ह पु वा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 01/17/2022 - 06:49
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 01/17/2022 - 06:42
नवीन
Texas Attack: १० तासांच्या थरारनाट्यानंतर सिनेगॉगमधील ओलिसांची मुक्तता, हल्लेखोर ठार
https://maharashtratimes.com/international/international-news/us-news-suspect-who-took-people-hostage-in-jewish-place-of-worship-identified-as-british-citizen/articleshow/88943875.cms
-------
पाकिस्तानी वंशाची अमेरिकी मेंदूतज्ज्ञ आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेसाठी हल्लेखोराने हा हल्ला केला होता, अशी मागणी हल्लेखोराने केली होती. हल्लेखोराचे नाव महंमद सिद्दीकी होते, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वेबसाइटने दिले आहे.
आफिया सिद्दीकी मूळची पाकिस्तानी नागरिक आहे. तिने बोस्टनमधून मास्टर्स आणि पीएच डी मिळवली आहे. अल् कायदाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तिला अफगाणिस्तानातील गझनी प्रांतात २००८मध्ये अटक करण्यात आली होती. तिला 'लेडी अल् कायदा' नावाने ओळखले जाते.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 01/17/2022 - 09:37
नवीन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याबद्दल श्री.रा.रा संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर 'आम्ही काय करावे हे संजय राऊतांनी सांगायची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे बघावे' असे प्रत्युत्तर केजरीवालांनी दिले.
एक गोष्ट कळत नाही. आपण काय करावे हे न बघता इतर सगळ्या जगाने काय करावे हे सांगण्यात संजय राऊत एकदम तज्ञ आहेत. मला स्वतःला केजरीवाल हा मनुष्य अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. गेल्या ७-८ वर्षात मिपावर मी ते वेळोवेळी लिहिलेही आहे. तरीही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतः पक्ष शून्यातून उभा करणे आणि दिल्लीत दोनदा विधानसभा निवडणुक अगदी दणक्यात जिंकणे ही गोष्ट त्यांनी साध्य केली आहे. त्यांचे हे श्रेय कोणीच नाकारू शकत नाही. शिवसेनेने स्वबळावर मुंबई महापालिकेतही एकदाही बहुमत मिळवलेले नाही आणि निघालेत दिल्लीत ९०% विधानसभा जागा जिंकणार्याने काय करावे हे सांगायला. स्वयंभू असलेला कोणताही नेता एकाबरोबर युती करायची, त्याच्या नावावर आमदार निवडून आणायचे आणि मग सत्तेसाठी विरूध्द बाजूला जायचे असले आयत्या बिळातील नागोबाप्रमाणे प्रकार करणार्या ठाकरे आणि संजय राऊत या उपटसुंभांना हिंग लाऊनही विचारणार नाही हे अगदी समजण्यासारखे आहे.
जे काही असेल ते. मला आप आवडत नाही आणि शिवसेना तर त्याहूनही आवडत नाही. तरीही हे सगळे विरोधी पक्ष आपापसात लहानसहान कारणाने भांडत आहेत आणि २०२४ मध्ये मात्र मोदींविरोधी सगळ्या विरोधी पक्षांची मोठी आघाडी बनणार अशा गोष्टी चालू आहेत.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Mon, 01/17/2022 - 18:44
नवीन
बर आहे या फुकटातल्या करमणुकीवर कर नाही भरावा लागत ते.
राउतराव अजुन इम्रान खानला कसे काही शिकवायला गेले नाहीत?
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 01/17/2022 - 10:38
नवीन
संत रविदास जयंतीनिमित्ताने पंजाबमधील अनेक मतदार बाहेर असल्याने १४ फेब्रुवारी ही मतदानाची तारीख बदलायची मागणी होत होती. तशी मागणी सगळ्याच पक्षांनी केली होती. त्याप्रमाणे निवडणुक आयोगाने ती मागणी मान्य करून मतदान १४ ऐवजी २० फेब्रुवारीला घेण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 01/17/2022 - 10:53
नवीन
मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करायचा राज्य सरकारने डिसेंबर महिन्यात निर्णय घेतला होता. त्याविरोधात भाजप नगरसेवक कोर्टात गेले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता मुंबई महापालिकेत २३६ प्रभाग असतील. त्यामुळे प्रभागांच्या सीमांची पुनर्रचना करावी लागेल. त्यासाठी राज्य सरकारने कसलेही काम चालू केले आहे (कुठली समिती/कमिशन नेमले आहे) अशाप्रकारची बातमी मी तरी वाचलेली नाही. तेव्हा यापुढे ते काम सुरू झाले तरी नागरिकांच्या सूचना/अभिप्राय/मते वगैरे मिळून काम पूर्ण करायला महिना दीड महिनाही गेला तरी आश्चर्य वाटू नये. मग या प्रभागांच्या सीमांविरोधात कोणी कोर्टात गेल्यास महाविकास आघाडी सरकारसाठी अगदी सोन्याहूनही पिवळे. कारण मग त्या परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुक टाळायचे कारण मिळेल. मग लवकरच पाऊस सुरू होईल त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरशिवाय ही निवडणुक न घ्यायचे कारण मिळेल.
सध्या ज्या प्रकारे कारभार आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यावरून आणि मुंबई महापालिकेत कित्येक वर्षे सत्ता असल्याने प्रस्थापितविरोधी मतांचा जोरदार फटका आपल्याला बसून शिवसेनेचा अभूतपूर्व पराभव होईल ही शक्यता नक्कीच असल्याने महाविकास आघाडी ही निवडणुक शक्य तेवढी लांबणीवर टाकायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. जर प्रभागांची संख्या वाढवायची होती तर ते काम, हरकती वगैरे सगळ्या गोष्टी डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन मग वेळापत्रकाप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुक घेण्याच्या दृष्टीने काम सुरू करणे शक्य होते. त्यासाठी मग हा प्रभागांची संख्या वाढवायचा निर्णय मे-जून किंवा फार तर जुलै महिन्यात घ्यायला लागला असता. तो तेव्हा न घेता डिसेंबरमध्ये घेतला याचाच अर्थ निवडणुका शक्य तितक्या लांबवायच्या हा महाविकास आघाडी सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतच आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचे निमित्त करून निवडणुक पुढे ढकलावी म्हणावे तर पाच राज्यात विधानसभा निवडणुक होत असल्याने आणि त्यात गोवा-युपीमध्ये शिवसेनाही मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याने (तिथे त्यांना काळं कुत्रही विचारत नाही ही गोष्ट वेगळी) त्या कारणाने मुंबईतल्या निवडणुका पुढे कशा ढकलणार? तेव्हा हे आता प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम आहे हे कारण आयते मिळाले आहे असे दिसते. या निवडणुका पावसाळा होण्यापूर्वी झाल्या तर आश्चर्य वाटेल.
अर्थात या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाहीत. जर नेमेची येणार्या पावसाळ्यानंतर लगेच निवडणुक घ्यावी लागली तर सालाबादप्रमाणे पाणी तुंबणे वगैरे गोष्टी होऊन त्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला तर तो त्रास आठवणीत अधिक ताजा असल्याने (फेब्रुवारीत निवडणुक झाली असती तेव्हा जितका असता त्या तुलनेत) त्याचा जास्त फटका शिवसेनेला बसायची शक्यता मात्र आहेच.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 09:59
नवीन
भाजप सत्ते बाहेर राहील...
महापौर शिवसेनेचा पण अधिकार मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, यांच्याकडे राहतील ...
येत्या विधानसभा आणि लोकसभेच्या साठी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला आत्ता चुचकारतील...
भावी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदासाठी, महापौरपदाचे प्यादे बळी देतील...
अर्थात, ह्याची सगळी भरपाई, विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी, दोन्ही कॉंग्रेस, शिवसेनेकडून सव्याज वसूल करतील...
शिवसेनेची धोरणे पसंत नाहीत, पण .... असे हाल व्हायला नकोत ...
हिंदू की मराठी, ह्यात, माझा कल तरी हिंदू हितवादी असल्याने, भाजप शिवाय मला पर्याय नाही ... धर्म प्रथम ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 09:49
नवीन
१९९६ बालहत्याकांडातील आरोपी सीमा आणि रेणुका गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे
https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-pronounce-judgement-on-death-penalty-of-renuka-shinde-and-seema-gavit-in-1996-children-murder-case-sgy-87-2766012/
ह्या राजवटीत, साधू हत्याकांड होते पण फाशीची शिक्षा झालेले सुटतात...
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी नाहीत .... हे माझे वैयक्तिक मत आहे....
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Wed, 01/19/2022 - 04:53
नवीन
दयेच्या अर्जावर वेळेत निर्णय घेतला नसल्यामुळे फाशीची शिक्षा अमलात आणण्याची वेळ टळून गेली होती. थोडी सबुरी दाखवत चला आपले प्रेम व्यक्त करताना.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Wed, 01/19/2022 - 05:01
नवीन
"मी पुन्हा येईन" वर विश्वास ठेवणाऱ्यांना पहाटेचा शपथविधी फियस्को झाल्यापासून तडफड होतेय बिजेपि समर्थकांची. चालायचेच. निचरा होणे गरजेचे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 01/19/2022 - 05:20
नवीन
आग्या चला होऊन जाऊद्या
१) फडणवीस आणि भाजप ने तो पहाटेचा खेळ करून आपली पत/ इज्जत घालवली हे अगदी १००% मान्य - त्यामागचे कारण काही का असेना
२) पण मग हे सांगा कि त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली? स्वतःच्या पक्षाशी अशी जाहीर बेईमानी करून?
पक्ष बदलणं हे वेगळे आणि असा चक्क खोटे पण करणे हे , वेगळे,
एकवेळ राष्ठ्रवादीतच काकांना ना शह देऊन पक्षाची रणनीती जाहीर पने बदलली असती तरी समजले असते ( राष्ट्रीय मध्ये अंतर्गत लोकशाही आहे हे गृहीत धरलाय !)
द्याल उत्तर ? हेच जर उद्य्या दुसऱ्या एखाद्या रुजलेलय लोकशाहीत कोणी एखाद्या वरिष्ठ नेत्याने केले असते तर त्यःची जवळ जवळ संपली असती !
का आपला "इमोशल हाय त्यो " म्हणून एका चॉकलेट मध्ये विषय संपवयाचा !
मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 01/19/2022 - 06:55
नवीन
त्यात ५०% सहभागी असलेले माननीय अजितदादा यांना काय बरे शिक्षा मिळाली?
आपली ती सर्दी आणि दुसऱ्याचा करोना असतो साहेब
जरा समजून घ्या कि.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Wed, 01/19/2022 - 07:01
नवीन
अशे प्रश्न विचारायचे नसतात चौकस२१२. अजितदादा म्हणजे अजितदादा आहेत. त्यांनी कुठलेही धंदे केले तरी ते कायम धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात. अगदी अजितदादा पण मी कुठे काय केले वगेरे अभिर्भावात असतात. पहाटेचा तो शपथविधी कुठल्याही भाजप समर्थकाला पटला नव्हता. तशी नाराजी अगदी फडणवीसांपर्यंत गेली होती. फडणवीस यांनी पण ती चुक मान्य केली आहे.
पण अजितदादा मात्र आपण त्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंतत्री पदाची शपथ घेतली होती हे विसरुन त्यावर भाष्य करत असतात. त्यांच्या समर्थकांना ती एक खेळी वाटते. बाकी त्या घटने नंतर अजित पवार एक बिनभरवशाचा माणुस आहे, काकांपुढे त्याला काहीही किंमत नाही हेच अधिरेखित झाले.
बाकी शिक्षा वगेरे मिथ आहे. त्यांना कुणी तिथे जबर्दस्ती आणले नव्हते. पण त्या पक्षात जाब विचारला की मार पडतो .. खुप उदाहरणे आहेत ... .
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Wed, 01/19/2022 - 09:28
नवीन
मी जर राष्ट्रवादी चा कार्यकर्ता असतो तर निश्चित जाब विचारला असता ! तुम्ही?
मीही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसल्याने जाब विचारू शकत नाही.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Wed, 01/19/2022 - 05:15
नवीन
दयेच्या अर्जावर नक्की कोणी निर्णय घेतला नाही, कोर्टानुसार तर अमलबजावणी न झाल्यामुळें फाशी रद्द करून जन्मठेप केली आहे.
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 01/19/2022 - 08:54
नवीन
बातमी पुर्ण वाचल्यावर कळले की फाशीच्या अमल्बजावणील राज्य सरकारने विलम्ब लावला म्हणुन आरोपी बहीणी याचिका करु शकल्या.
राज्य सरकारला राज्यपालान्चे अधिकार कमी करणे व त्यासाठी नियम बदलणे यासाठी वेळ आहे.
घटनेनुसार राज्यपाल हे पद राज्यान्वर अन्कुश ठेवायला केले आहे. त्यातुन देशभर केन्द्र सरकारचा राज्य सरकारन्बरोबर समन्वय राहील आणी देश एकसन्ध राहील.
जेव्हा राज्यपाल पद काढुन टाकावे असे राज्य सरकार म्हणतात तेव्हा ती मात्र घटनेची पायमल्ली नसते. सन्विधान धोक्यात नसते.
कीती दुटप्पी राजकारण आहे हे.
विरोधी पक्शाना केन्द्रात निवडुन न येण्याची एवढी खात्री आहे कि राज्यात निरन्कुश सत्ता मिळवायला आटापिटा चाललाय. पण भविष्यात केन्द्रात मोदी विरोधक आणि राज्यात भाजपा आली तर काय करणार?
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 01/18/2022 - 10:24
नवीन
भक्त विहरी है पात्र लय भारी आहे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 01/18/2022 - 13:33
नवीन
खीक्क. आम्हीही ह्या एकपात्री प्रयोगाचा आनंद घेतोय. :)
- Log in or register to post comments
स
सुखीमाणूस
Wed, 01/19/2022 - 08:32
नवीन
मतप्रदर्शन करते आहे. पात्र नक्किच सच्चे आहे.
इथे काही जणाना बरेच अवतार घेउन comments करायला यावे लागते आणि ते जास्त करुन मन्द गुलाम असतात.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 14:11
नवीन
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी
गेल्या आठवड्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेतबाबत कारवाईची मागणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुमारे डझनभर वकिलांनी धमकीचे फोन आल्याचा दावा केला. शिख फॉर जस्टिसच्या वतीने त्यांना इंग्लंडच्या क्रमांकावरून हे कॉल आले होते....
-------
कॉंग्रेसने केलेल्या चुकीचे परिणाम आहेत.
घराणेशाहीचे समर्थन करणार्या, मतदारांना हे समजेलच असे नाही ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 14:18
नवीन
मुंब्र्यात महापालिका सहाय्यक आयुक्तांवर फुटलेली काच घेऊन हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी अद्याप मोकाट
https://www.loksatta.com/thane/tmc-official-attacked-in-mumbra-sgy-87-tlsp0122-2765996/
------
मुंब्रा स्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोहम्मद सलीम कुरेशी याने हा रस्ता त्याच्या मालकीचा असल्याचा दावा करत याठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे अडथळे उभारले होते....
ह्याच राजवटीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील हल्ला झाला होता.....
---------
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 14:21
नवीन
नागपुरातील अल्पवयीन मुलीला युवकाने पळविले; दोन वर्षांनी परतली ती बाळासहच!
https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/a-minor-girl-from-nagpur-was-abducted-by-a-youth-she-came-back-after-two-years-with-the-baby-617972.html
------
काळजी घ्या....
- Log in or register to post comments
न
निनाद
Tue, 01/18/2022 - 23:02
नवीन
पोस्को लावला पाहिजे त्या वसीम खान कय्युम खानला?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 01/18/2022 - 14:53
नवीन
मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, नाना पटोले यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
------
https://maharashtratimes.com/maharashtra/bhandara/maharashtra-congress-president-nana-patole-controvercial-criticism-on-pm-narendra-modi-at-bhandara-zp-panchayat-samiit-election-ralley/amp_articleshow/88953382.cms?utm_source=orionnews&utm_medium=referral&utm_campaign=news2
---------
परमपूज्य राहूल गांधी, तर म्हणतात की कॉंग्रेस "अहिंसावादी" आहे ....
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 01/18/2022 - 15:01
नवीन
पंजाब निवडणूकीसाठी मुख्यमंत्री पदासाथी भगवंत मान यांचे नाव आप ने जाहिर केले आहे. आता काँग्रेस ने सिद्धू यांचे नाव जाहिर करावे आणि भाजपा ने देखील एखादा असाच उमेदवार पहावा म्हणजे कॉमेडी शो बघीतल्याची मजा येईल.
- Log in or register to post comments
T
Trump
Tue, 01/18/2022 - 16:16
नवीन
यांची काय कथा आह?
सिद्धूची माहीती आहे.
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 01/18/2022 - 20:42
नवीन
हे तेच महोदय आहेत ना ज्यांनी फेसबुक लाईव करुन संसदेच्या सेक्युरीटीची माहीती सार्या जगाला दिली होती?
नवीन नवीन खासदार झाले होते तेव्हा . . .
- Log in or register to post comments
T
Trump
Wed, 01/19/2022 - 08:37
नवीन
हो. लोकसत्तामध्ये वाचले.
त्यांनी सुध्दा सुरवात विनोदक म्हणुनच केली होती.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 01/18/2022 - 17:45
नवीन
इथे पण फेकूपणा
- Log in or register to post comments
न
निनाद
Tue, 01/18/2022 - 23:09
नवीन
हिंदुत्वविरोधी दंगलीत दिलबर नेगी यांची निर्घृण हत्या करणाऱ्या ताहिर, शाहरुख, फैजल आणि अन्य ३ जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे!
दंगलखोरांच्या जमावाने दिलबर नेगी यांचे हात-पाय कापले होते. प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की दंगलखोरांनी दगडफेक केली, हिंदुविरोधी घोषणा दिल्या आणि अनेक दुकाने आणि घरे जाळली. त्यांनी असेही नमूद केले की दंगलखोर एका इमारतीत घुसले आणि इमारतीत लपून बसलेल्या मृताची हत्या केली. इमारतीसह त्याचा मृतदेह जाळण्यात आला.
भारतीय न्यायालयातून हिंदू विरोधी लोक सहज सुटून जातात का?
यांचे वकील कोण आहेत?
- Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 01/19/2022 - 04:07
नवीन
काही तर याच फोरम वर सुद्धा आहेत. भारताचे पंतप्रधान वर्ल्ड फोरम मध्ये बोलत असताना त्यांचा टेलिप्रोम्प्टर बंद पडला असल्याबद्दल आपल्याच देशाच्या पंतप्रधानांना टोमणे मारणारी कुजकी सडकी जमात आहे ती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »