Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पाळणा झुलू दे

प — पाषाणभेद, Wed, 12/29/2021 - 13:45
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग किती द्वाड तो धावतो घरात आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग काय काय मागतो खायला प्यायला लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे - पाषाणभेद २९/१२/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3934 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Wed, 12/29/2021 - 14:26 नवीन
छान आहे. पाळणा म्हणूनही गाता येईल.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 12/29/2021 - 15:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 12/29/2021 - 17:01 नवीन
नात म्हणजे अप्रतिम भेट आली देवा कडून थेट नात म्हणजे दुधावरची साय आजोबा ची दुसरी माय........ अनुभवल्या बिगर कळत नाय......
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/29/2021 - 17:28 नवीन
वाह मस्त ! अशा कविता वाचायला मजा येते . आजकाल फार दुर्मिळ झाले आहे असले सुंदर लेखन! बाकी ही कविता लिहिताना आपल्या डोक्यात काही विशिष्ठ चाल होती का ? त्याची एखादी लिन्क असेल तर पाठवा , चालीत वाचायला अजुन मजा येईल !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/29/2021 - 18:44 नवीन
परवा सकाळी जाग येण्याच्या आधी पहिली ओळ सुचली, अन काल खर्डा लिहीला, आज पूर्ण केली. चाल वगैरेची लिंक नाही हो. आपसूक सुचत जाते. तरीही मिटरमधे गायला काही शब्द पुढे मागे करावे लागतात, मी ते लिहीले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/29/2021 - 18:55 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा