Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सडा अठवणींचा

क — कर्नलतपस्वी, गुरुवार, 12/23/2021 - 05:04
सडा अठवणींचा बकुळीच्या झाडाखाली सडा अठवणींचा पडला तुझ्या नी माझ्या अव्यक्त प्रेमाचा गंध की रे मुरला किती केली फुले गोळा किती ओवल्या तीथेच माळा सख्या तुझ्या वियोगच्या इथेच लागल्या रे झळा आली प्रेमाची झुळक सांगितला तीने निरोप जीव एकवटून सारा तन, मन धावले तडक नका बघू दिवास्वप्ने नका मनोमनी जळू दर तीन महिन्यांनी इथेच यायचा कल्हईवाला काळू -कसरत २४-१२-१९६५

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5504 views

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा गुरुवार, 12/23/2021 - 10:45 नवीन
छान जमलीय कवितेची कसरत !
नका बघू दिवास्वप्ने नका मनोमनी जळू दर तीन महिन्यांनी इथेच यायचा कल्हईवाला काळू
हा शेवट वाचून मनोमन वाईट वाटले !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 12:32 नवीन
कविता आवडली. बकुळीवरून हे एक नितांतसुंदर गाणे आठवले. नक्की ऐका. सं - दी - प
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 12/23/2021 - 17:11 नवीन
बकुळीचं झाड! वयाचा अंदाज नाही पण साधारण सव्वाशे दिडशे कुणी म्हणतात सहाशे वर्ष पण गेली पासष्ठ वर्षे तर मी त्याचा व तो माझा साक्षीदार गावातल्त्याय बकुळी चा सुगंध आज अखेर हरपला. नावाला फक्त एक झाड.पण या झाडाची नाळ गावातल्या पिढ्यां पीढ्यांशी जोडली आहे. आज झाड मुळासकट काढलं, हे ऐकलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. दुष्ट माणसानं झाडाच्या खोडावर घातलेले घाव व त्यांचे झालेले तुकडे याचा पण फोटो शेअर केला. कधीकाळी याच खंडाच्या पाठीमागे लपंडाव रंगायचा. रहावल नाही एक मुक्तक लिहून काढले. त्याच बरोबर वसंत बापटाची ही कवीता आठवली. वाटलं आपल्या गावातल्या बकुळीच्या झाडाखाली बसून लिहीली असावी....... या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले इथेच माझ्या स्वप्नांसाठी, एक रेशमी झुला झुले इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी झाडाखालच्या असंख्य आठवणी, पाणी दिसू नये म्हणून त्यातलीच एक पण थोडी वेगळी आपल्या बरोबर शेअर केली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/25/2021 - 06:47 नवीन
झाडाच्या खोडावर घातलेले घाव व त्यांचे झालेले तुकडे याचा पण फोटो शेअर केला
वाईट! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 12/28/2021 - 03:55 नवीन
अरेरे...
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 12/23/2021 - 17:19 नवीन
संदीप चांदणे, चौथा कोनाडा प्रतीसादा बद्दल धन्यवाद. प्रतीसादा मधे काही टंकलेखन चुका तशाच राहिल्या. आहेत वाचताना दुरुस्ती करावी. क लो आ
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 12/25/2021 - 18:12 नवीन
इतक्या चांगल्या काव्यात शेवटच्या कडव्याचे काय काय होते?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 12/26/2021 - 06:03 नवीन
धन्यवाद पाभे, इथेच दिसला चंद्र मला रे इथेच फुलले मनी चांदणे तुझ्या प्रितीचे रोप सख्या रे इथेच की ते रुजले रे आसे काही लिहावं असं काही झालच नाही पण बालपणीच्या खुप आठवणी. पितळी भाड्यानं कल्हई लावून घेणे हे अनिवार्य असायचे. दर तीन महिन्यांनी इथेच तो यायचा आपल्या मुलाबाळांना घेऊन. मग खड्डा करणे, हाताने फिरणारी फुकंणी पुणे, त्यावर निखारा फुलणे व कल्हई चा धूर, आ हा हा काय वास यायचा. तीथे बसून धुराचा आनंद घेणे सिगरेट वीडीच्या आनंदा पेक्षा कमी नसायचा, म्हणून तीच आठवण सागंत कवीता संपवली. काय करणार खोटेपणा जमत नाही.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 12/26/2021 - 06:13 नवीन
फुकंणी पुरणे असे वाचावे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 12/28/2021 - 03:55 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा