Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शीर्षक सुचले नाही

च — चांदणे संदीप, Tue, 12/21/2021 - 07:48
झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9850 views

💬 प्रतिसाद
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/22/2021 - 06:34 नवीन
बैलाचे शेण हे शीर्षक शोभून दिसेल =))))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 12/22/2021 - 07:35 नवीन
"मोबाईल बंद नसतांना" हे शिर्षक ठेवा.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 12/22/2021 - 07:42 नवीन
"आई""माय" हे शीर्षक शोभेल बहुदा. भापो. होतं असं कधी कधी!
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Wed, 12/22/2021 - 09:26 नवीन
रतीबाच्या कविता ?????
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 13:43 नवीन
विशेष काय प्रेरणा नव्हती म्हणून आणि लिटरली झोप येत नव्हती म्हणून खरडली कविता...म्हणून रतीबाची म्हटलं. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/22/2021 - 09:58 नवीन
"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 12/22/2021 - 10:34 नवीन
म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल म्हणून म्हणतो चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय राती अर्ध्या राती जागं रहायच नाय
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 13:44 नवीन
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल.... हे भारीच! सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 12/22/2021 - 11:12 नवीन
कविता. अशी अवस्था अनुभवताना जवळपास असेच विचार येतात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Wed, 12/22/2021 - 12:51 नवीन
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
कविता आवडली. विशेषतः वरील कडवे!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 12/22/2021 - 13:16 नवीन
छान आवडली रचना. आधी अस्वस्थता आणि आर्त अपेक्षा !
+१
"हवा सांगणारा हात" हे शिर्षक कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 12/22/2021 - 13:28 नवीन
एकदम सुरेख रचना.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 12/22/2021 - 13:44 नवीन
एक मायेचा माथ्याला, मायेचा हात माहिती होता,हे नवीन छान वाटले. सगळं नीट होईल, शीर्षक :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 13:46 नवीन
एक मायेचा माथ्याला, मायेचा हात माहिती होता
एक मायेचा, माथ्याला असं पाहिजे होतं ते. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर Wed, 12/22/2021 - 14:57 नवीन
कवितेच्या प्रसव वेदना कशी येईल झोप सदना | पोस्ट ली कविता मिसळपाव चला आता येईल झोपेचा गाव | आता स्वप्नांचा डाव मांडणे.. मालवा हो (सं )दीप चांदणे ||
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 12/22/2021 - 17:25 नवीन
हा हा ... भारीच बाजीगर सर. मूळ कवितेबरोबर हे देखील आवडलं. मालवा हो (सं )दीप चांदणे - हे खासंच.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 12/23/2021 - 07:48 नवीन
धन्यवाद चामुंडाराय जी.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 13:46 नवीन
मालवून कसं चालेल! सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 12/23/2021 - 10:07 नवीन
बाजीगर साहेब, मस्त हो मस्त !

🤝

  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 12/22/2021 - 17:15 नवीन
'शीर्षक सुचवा' असे शीर्षक नसून 'शीर्षक सुचले नाही' असे आहे. बाकी कविता आवडली.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 12/23/2021 - 08:31 नवीन
सही पकडें हैं!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 12/23/2021 - 10:08 नवीन
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 12/22/2021 - 17:29 नवीन
छान आजकाल रात्री झोपताना मोबल्या नेटाने नीट नंद ... स्वारी ... बंद करावा लागतो झोप येण्यासाठी !!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 12/22/2021 - 18:54 नवीन
कविता आ‍वडली बाकी नावांत काय आहे
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/23/2021 - 13:48 नवीन
शेक्सपियर का कोणतरी हेच्च सेम म्हटलाय बहुतेक. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 12/28/2021 - 03:55 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा