Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

किचनमधून ती सांगते

श — श्रीगणेशा, Sat, 12/18/2021 - 13:02
किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो किचनमधून ती सांगते, वरण करते आहे मी धावत जाऊन, फोडणी करून देतो किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो -- घरून काम करताना.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4640 views

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/20/2021 - 01:49 नवीन
भटार खान्यातून ते सांगतात मी कढई टाकत आहे, धावत जाऊन मी जिलब्या टाकून येतो !
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 12/20/2021 - 02:54 नवीन
किचनमधून ती सांगते, गॅस संपला आहे मी मोबाईल हातात घेऊन, स्विगी ओपन करतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/20/2021 - 03:33 नवीन
बेडरुम मधून ती सांगते, झोप झाली आहे, मी धावत जाऊन, बेड टी घेउन येतो, सोफ्या वरुन ती सांगते, कचरे वाली आली आहे, मी धावत जाऊन, दाराबाहेर डस्टबीन ठेवून येतो बाथरुम मधुन ती सांगते, अंघोळ झाली आहे, मी धावत जाऊन, टॉवेल देवून येतो परत सोफ्यावरुन ती सांगते, भुक लागली आहे, मी धावत जाऊन, ब्रेकफास्ट घेवून येतो मग परत सोफ्यावरुन ती सांगते, "आई" ची वेळ झाली आहे, मी धावत जाऊन, रिमोट देवून येतो, ती दरवाज्यातून सांगते, भिशीला जायचे आहे, मी धावत जाऊन, कार सुरु करतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/20/2021 - 04:47 नवीन
बाथरुम मधुन ती सांगते, अंघोळ झाली आहे, मी धावत जाऊन, टॉवेल देवून येतो
छान ! चालू द्या...! ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 12/20/2021 - 08:36 नवीन
इन्वेंटरी मीटिंग मध्ये स्टॉक मॅच का होत नाही यावर खडाजंगी चालू असताना माझ्या तोंडून फिस्स- खिक्क याचा मिश्र आवाज बाहेर पडला आणि लोक माझ्याकडे डोळे वटारून बघायला लागले!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/20/2021 - 03:44 नवीन
मी बाथरुम मधुन सांगतो, टॉवेल राहिला आहे ती सोफ्यावरुन सांगते, मग तु तसाच बाहेर ये, मी डायनिंग टेबल वरुन सांगतो, खायला हवे आहे, ती सोफ्यासरुन सांगते, झोमॅटो वरुन ऑर्डर दे, मी फोन करुन सांगतो, आज ऑफिस मधे जास्त काम आहे, ती सोफ्यावरुन सांगते, किल्ली ने दार उघडुन आत ये, मी सोफ्याच्या मागुन सांगतो, आज वनडे फायनल आहे, ती सोफ्यावरुन सांगते, मोबाईल वर बघता येते, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/20/2021 - 04:52 नवीन
>>>किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो. मीही. काही वास. मिक्सरचा आवाज. काही तळलेले असेल. असं अनपेक्षित, अपेक्षित सर्व असतं. मनाची तयारी असतेच. कधी कधी, थांबा घेऊन येतेय. असेही थेट स्पष्ट असते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 12/20/2021 - 05:21 नवीन
धन्यवाद सर्वांचे. कैच्याकैकवितेची दखल घेतल्या बद्दल! पैजारबुवांनी तर केवळ प्रतिसाद म्हणून दोन नवीन कविता लिहिल्या आहेत _/\_ दोन्हीही कविता खूप आवडल्या आणि घरोघरी मातीच्या चुली हे पाहून थोडा धीर आला :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Mon, 12/20/2021 - 08:28 नवीन
भटार खान्यातून ते सांगतात मी कढई टाकत आहे, धावत जाऊन मी जिलब्या टाकून येतो !
मान्य आहे _/\_ लिहिताना "शब्दांच्या जिलब्या" हा विचार मनात होताच पण मोह आवरला नाही प्रकाशित करण्याचा, म्हणूनच कैच्याकैकविता हा टॅग वापरला. जिलब्या टॅग हवा होता. असो. त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या कितीतरी सरस कविता वाचायला मिळाल्या _/\_
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Mon, 12/20/2021 - 08:54 नवीन
मी सांगतो मला कविता सुचतेय.. ती सांगते काय पाडायच्या त्या जिलब्या मीपावर पाड इथंच लोक हायत रेम्या डोक्याचे. कवतीक करतील
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 12/20/2021 - 09:10 नवीन
सगळीकड तोच जांगडगुत्ता. पळापळी करतोय म्हणून शांती हाय नायतर शांती काय करल सागंता यायचं नाय. लगे रहो मुन्नाभाई आपल्या घरी पण का येगळ नाई तु जिलब्या कयाला बे पाडतो ती कढाई ठेवते म्हणून.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 12/20/2021 - 10:53 नवीन
मिपावरुनी ते सांगतात, "दवणें"ची कविता आली आहे मी लॉगिन करुन लगेच विडंबन पाडून येतो =))))
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 02/09/2022 - 17:32 नवीन
मस्त आहे की!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा