Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

प — पाषाणभेद, Fri, 12/17/2021 - 21:39
समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी खंडोबाला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात सोनसाखली मला करण्यास तू जपून आण माझ्या घरधन्याला ||६|| - पाषाणभेद (कोळी) १८/१२/२०२१

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4296 views

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त Sat, 12/18/2021 - 07:14 नवीन
वा पाषाणभेदराव. अतिशय र्‍हद्य, भावपूर्ण पद्यरचना. दादला दर्यावर गेल्यावर मोठीच जोखीम असते, त्यातून त्याची काहीही खबरबात मिळणे शक्य नसते. अश्या स्थितीत त्याच्या व्याकुळ पत्नीच्या मनात उसळणारे भावतरंग काय असतील, त्याची कल्पनाही आपल्यासारख्या शहरी लोकांना करता येणार नाही. ते तुम्ही त्या कोळिणीच्या जणु आंतरंगातच शिरून व्यक्त केले आहेत. खूप खूप छान. असेच लिहीत रहा, आम्ही वाचत राहू. अनेक आभार. शेवटला सोनसाखळीचा उल्लेख तसा मजेशीर वाटला, पण मनात प्रश्नचिन्हही जागवून गेला.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 12/18/2021 - 08:23 नवीन
कदाचित तीचा घो म्हणत असेल दुर टेकडीवरी पेटती निळे ताबंडे दिवे सांगतात ते मजला आता घरी जायला हवे कुसुमाग्रज पण तीला कसे कळणार?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 12/18/2021 - 11:33 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/18/2021 - 11:51 नवीन
आवडली कविता पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 12/18/2021 - 12:45 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Saami Saami Lyrical... :- Pushpa
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/18/2021 - 12:59 नवीन
छान आहे कोळीगीत! अशाच कोळीण स्त्रीची व्याकुळता दाखवणार माझं एक आवडत गाणं आहे. नाख्वा हो उधाण आयलया!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा