(ऐसे(ही) ऐकिले आकाशी)
पेरणा http://misalpav.com/node/49655
अनन्त्_यात्री सरांच्या कळकळीच्या विनंती चा मान ठेऊन दारू हा विषय सोडून विडंबन पाडत आहे
ऐसे(ही) ऐकिले आकाशी
(१) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून ग्रहकक्षांच्या कातीव रेषा वितान अवकाशाचे व्यापून- अचूकतेची लय सांभाळीत- परस्परांशी अंतर राखून- कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो, फिराल तुम्ही अथकपणाने विश्वांताचा क्षण आला तरी अमुच्या आभासी पण तरिही अभेद्य ऐशा बेड्या घालून?" (२) केव्हातरी एकदा म्हणे दारू हा विषय सोडून पिठूर केशरी चंद्रधगीने स्फटिकतळ्यातील मासोळीला म्हटले बिलगून जललहरीतून, "झगमगणारे लोलक दाहक त्वचेवरून देशील का काढून? मावळतीवर जेव्हा तारे- भल्या पहाटे फिक्कट होतील- तेव्हा त्यांना तेज त्यातले थोडे थोडे देईन वाटून" स्वयंघोषित विडंबन(?) कार पैजारबुवा,💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर
Mon, 12/13/2021 - 13:28
नवीन
मस्त...
आवडली
पैलवानबुवा,
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 12/13/2021 - 13:26
नवीन
जमलंय
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 12/13/2021 - 13:36
नवीन
विडंबना मध्ये मुख्य कवितेतील बहुतांश भाग तसाच ठेवलेला दिसत आहे , मुख्य कविताच(?) विटंबीत आहे असे काहीसे सुचवायचे आहे की काय आं !
=))))
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 12/13/2021 - 15:35
नवीन
इथे मिपावर नामचीन कवि "मा.आँ" जैसे असता
कशास अमुच्या "विटंबीत" कवितेला(?) वेठिस धरिता?
- Log in or register to post comments