Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(चकणा जरा)

प — प्रसाद गोडबोले, Sat, 12/11/2021 - 14:24
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे. जास्त चकणा खाल्ल्याने फक्त आठव्या पेग नंतर आपला "वकार युनुस" होतो अन नंतर अतिषय हुच्च दर्जाची बिर्याणी खाण्याच्या आनंदास आपण मुकतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5451 views

💬 प्रतिसाद
च
चित्रगुप्त Sat, 12/11/2021 - 15:31 नवीन
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/11/2021 - 17:16 नवीन
हे हे =)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 12/11/2021 - 16:07 नवीन
कधी बसायचे?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/11/2021 - 17:15 नवीन
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 12/11/2021 - 20:45 नवीन
चिअर्स. विडंबन आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sat, 12/11/2021 - 20:53 नवीन
विडंबन जमले आहे. आवडले, अगदी "चकणा जरा" शिर्षकासहित!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 12/12/2021 - 13:19 नवीन
पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/12/2021 - 15:02 नवीन
सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 12/13/2021 - 04:19 नवीन
वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा