Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मोकळ्या करा पखाली

च — चांदणे संदीप, Fri, 12/03/2021 - 15:03
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7437 views

💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप Fri, 12/03/2021 - 15:06 नवीन
खूप आधीच ही कविता लिहीली होती. पण प्रकाशित करायला मनच होत नव्हते. का हे असे शब्द मनावर घिरट्या घालून मला लिहायला भाग पाडतात असेही वाटते कधीकधी. अतिशय दु:खद अशी पार्श्वभूमी या कवितेला आहे ही सल आयुष्यभर बोचत राहणार आहे. पण शेवटी, एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हेही न विसरणे तितकेच आवश्यक आहे म्हणून हा कविता प्रकाशनाचा प्रपंच. - सं - दी - प
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/03/2021 - 15:18 नवीन
काय बोलणार. भावनांशी सहमत. दुसर्‍या लाटेत काय काय झाले हे वळून बघतांना देखील त्रास होतो, इतके ओळखीतले गेलेत. :-( अवांतरः अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/08/2021 - 10:01 नवीन
++++++++++++1111111111111
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 12/09/2021 - 13:38 नवीन
अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. >> वा!! याला पण +१ :)
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 12/03/2021 - 16:26 नवीन
आपल्या काळजाचे आपणच माळी ,छान रुजलीय कविता!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 12/03/2021 - 17:18 नवीन
"रूजवात करा फुटव्यांची" ऐवजी "रुजवणी करा फुटव्यांची" योग्य वाटते (रुजवात = समक्ष भेट/वार्तालाप घडवून आणणे)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/04/2021 - 02:45 नवीन
सुरेख एकदम
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/04/2021 - 08:55 नवीन
त्या अर्थाने कविता आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 12/09/2021 - 14:58 नवीन
भारी... ------- दुःख नाही.. खंत नाही.. स्पुर्ती साठी प्रवास असतो केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधील श्वास असतो.. - वि. वा.
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… Sat, 12/11/2021 - 12:12 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/11/2021 - 16:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Sat, 12/11/2021 - 20:59 नवीन
रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली
खूप छान! कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/19/2021 - 05:58 नवीन
चांदणे ते चांदणे कविता त्यांच्या भारी आम्हा सुचती केवळ विडंबने तरी
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/12/2023 - 15:03 नवीन
'विशिष्ट पार्श्वभूमि असलेली' कविता - ती पार्श्वभूमि नेमकी काय हे ठाऊक नसूनही भावली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा